इतिहासकालीन ऐतिहासिक कुतुबमिनार चा इतिहास.

Qutub Minar Information in Marathi

भरतात अनेक ठिकाणे आहेत जेथे गेल्यावर इतिहासाची आठवण होते, मग त्यामध्ये अजिंठा वेरूळ लेण्या असोत, किंवा जगातील सात आश्चर्या पैकी एक ताजमहाल असो. ह्या वास्तू आपल्याला इतिहासामध्ये आपला भारत कश्या प्रकारे होता, या गोष्टीचे दर्शन घडवून देतात, तर आजच्या लेखात सुद्धा आपण एका अश्या वास्तू विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर चला पाहुया कुतुबमिनार विषयी संपूर्ण माहिती.

कुतुब मिनार म्हटलं कि आपल्याला दिल्लीची आठवण होते, दिल्लीपासून दक्षिण दिशेला १८ किलोमीटर अंतरावर मेहरौली जिल्ह्यात कुतुब मिनार म्हणून जगप्रसिद्ध उंच मनोरा आहे. हा उंच मनोरा पाहण्यासाठी जगातून अनेक पर्यटक येतात तसेच आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा काही पर्यटक या मनोऱ्याला पाहायला येतात. प्रेक्षणीय स्थळ म्हणून कुतुब मिनार ला ओळखल्या जात.

इतिहासकालीन ऐतिहासिक कुतुबमिनार चा इतिहास – Qutub Minar Information in Marathi

Qutub Minar Information in Marathi
Qutub Minar Information in Marathi

कुतुब मिनार विषयी थोडक्यात – Qutub Minar in Marathi

कुतुब मिनार कुठे आहे (Qutub Minar Kuthe Aahe) दिल्ली
कुतुब मिनार ची स्थापना कधी झाली १३ व्या शतकात
कुतुब मिनार ची निर्मिती कुणी करून घेतली कुतुबुद्दीन ऐबक
कुतुब मिनार ची उंची किती आहे (Qutub Minar Height) ७२.८७ मीटर

कुतुब मिनार ची आताची उंची ७२.५७ मीटर इतकी आहे, तळाचा व्यास १४.४२ मीटर इतका आहे, तसेच वरील टोकाचा व्यास २.७५ मी इतका आहे, तर हे होते कुतुब मिनार चे क्षेत्र. आता पुढे पाहूया याची निर्मिती कशी झाली आणि कोणी केली.

अशी झाली कुतुब मिनार ची निर्मिती – Qutub Minar History in Marathi

हिंदुच्या सत्तावीस नक्षत्रांच्या मंदिरांना तसेच जैन देवतांचे देवालयांना पाडून या देवालयांचे वास्तुसामाग्रीतून मनोऱ्या चे निर्माण केले आहे, असा उल्लेख बरे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.

कुव्वतुल इस्लाम हि दिल्लीची पहिली मशिद तेव्हाच्या दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने या मशिद चे निर्माण केले होते, या मशिद विषयी सांगायचे कारण इतकेच कि या मशिदेच्या जवळच कुतुब मिनार मनोऱ्याच्या बांधकामाला ११९९ ला सुरुवात झाली होती.

या मनोऱ्याचे बांधकाम सुलतान कुतुबुद्दीन ऐबक ने सुरु केले होते. या मनोऱ्याला उभारण्यामागे कारण असे होते कि या जवळच्या मशिदि मध्ये नमाज साठी तेथून सगळ्यांना आवाज देता येईल आणि सोबतच या मनोऱ्याला सुलतान कुत्बुद्दीन ऐबक चा प्रराक्रमाच्या विजयाचा स्तंभ म्हणून सुद्धा याची उभारणी केल्या गेली होती.

जोपर्यंत सुलतान कुतुबुद्दीन ऐबक जिवंत होता तोपर्यंत कुतुब मिनार चा फक्त पहिला मजला बनला होता, त्यानंतर सुलतान कुतुबुद्दीन ऐबक चे १२१० ला निधन झाले, आणि नंतर दिल्लीच्या गादीवर नवीन सुलतान शम्सुद्दीन अल्तमश आला आणि त्याने मिनार चे पुढील काम पूर्ण केले, मिनार चे पूर्ण काम हे १२३० मध्ये झाले.

यानंतर हि कुतुब मिनार च्या काही मजल्यांची दुरुस्ती केल्या गेली, फिरोज शाह तुघलक ने मिनार च्या चौथ्या मजल्याचे काम करून त्यावर पाचवा मजला सुद्धा चढविला, सोबतच त्याला वरच्या बाजूने गोल घुमट दिला. कुतुब मिनार चे पहिले तीन मजले तांबड्या आणि पिवळ्या रंगाची आहेत, आणि बाकीचे दोन संगमनेर च्या दगडांनी बनलेले आहेत, आणि तांबड्या रंगाच्या वाळूचे दगडांनी आपल्याला दिसत.

कुतुब मिनाराविषयी असलेले काही मतभेद.

कुतुब मिनार च्या निर्मितीविषयी अनेक मतभेद आहेत, काही इतिहासकारांच असे म्हणणे आहे कि कुतुब मिनार आधी हिंदू वास्तू असून त्या वासू मध्ये थोडेशे बदल करून तिला पूर्ण केले. या मनोऱ्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी ११७८-११९२ मधेच केलेलं होत, म्हणून त्याला “पृथ्वीलाट” असेही म्हटल्या जातं.

काही इतिहासकारांच्या मते सुरुवातीला या ठिकाणी गुप्तवंशाचे नक्षत्रांच्या अभ्यास करण्यासाठी आजूबाजूला नक्षत्रांचे मंदिरे होती आणि या मंदिरांच्या मधोमध हा मनोरा उभा केला होता. विक्रमादित्याच्या काळातील वेधशाळेचा हा मुख्य निरीक्षण स्तंभ असावा असे ऐतिहासिक संशोधनवादी पुरुषोत्तम नागेश वोक यांनी मांडले आहे.

पण वास्तुशैलीच्या दृष्टीने ह्या गोष्टी पाहिल्या तर विवाद्य ठरतात, पूर्वीच्या काळी मुस्लिमांनी गझनी येथे सुद्धा कुतुब मिनार सारखे दिसणारे दोन मनोरे उभारलेले दिसले आहेत, आणि तेच जर हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळी असे काही स्तंभ पाहिले असता त्यांची शैली आणि कुतुब मिनार ची शैली हि खूप भिन्न भिन्न दिसून येते.

तर अश्या प्रकारे या मनोऱ्याला वेगवेगळ्या दृष्टीने पाहिल्या जात, बाकी काहीही असो या मनोऱ्याचे दृश्य हे खूप चांगल्या प्रकारे दिसतं आपणही जर कधी दिल्लीला गेलात तर या ठिकाणाला भेट द्या आणि एन्जॉय करा.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here