कर्ज घेतलेली व्यक्ती मरण पावली तर बँक कर्जाची रक्कम कोणाकडून वसूल करते जाणून घ्या या लेखातून!

Loan Recovery after Death

प्रत्येकाचे बँकेमध्ये खाते उघडलेले असते. आणि त्या खात्यावर बँकेचे आपल्याला कर्ज सुध्दा काढता येते, पण कधी विचार केला का की कर्ज घेणारी व्यक्ती मरण पावली तर बँक त्या कर्जाची भरपाई कोणाजवळून करते. जुन्या काळी जेव्हा सावकाराजवळून कर्ज घेतल्या जात होतं तेव्हा सावकाराजवळ कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या जमिनीची कागदपत्रे ठेऊन घेतलेली असत. पण आता सावकाराकडे कर्ज घेण्याची वेळच येत नाही आता प्रत्येकाचे बँकेत खाते आहे, आणि जर कोणाला कर्जाची आवश्यकता पडली तर तो बँकेतून कर्ज काढतो.

पण बरेच लोकांना हा प्रश्न पडला असेल की जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक त्या कर्जाची परतफेड कोणाजवळून करते. तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत की कर्ज घेणारी व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते कर्ज बँक कोणाजवळून वसुली करते? तर चला पाहूया..

 कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक वसुली कशी करते – How to Recovery of Loan after Death of Principal Borrower in Marathi 

Recovery of Loan after Death of Principal Borrower
Recovery of Loan after Death of Principal Borrower

बँक कुठल्याही व्यक्तीला कर्ज देते तेव्हा कर्ज देताना काही नियम आणि अटी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसमोर ठेवत असते. आणि त्या नियम आणि अटींना पूर्ण केल्या शिवाय बँक कोणालाही कर्ज देत नाही. आणि आपण जर त्या नियम आणि अटी व्यवस्थित वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की, त्यामध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची जर मृत्यू झाली तर कोणत्या गोष्टींचे अधिकार बँकेला असतात, वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कर्जाला बँक तीन प्रकारे वसूल करू शकते.

जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज घेतल्यानंतर मरण पावते तेव्हा त्या व्यक्तीच्या कर्जाची असलेले रक्कम बँक विमा कंपनीकडून आलेली रक्कम स्वतःजवळ ठेवून घेते. त्यानंतर बँकेची पैसे वसुली करण्याची दुसरी पद्धत म्हणजे कर्जदार व्यक्तीने जर जागेचे किंवा जमिनीचे कागदपत्र तसेच दागिने गहाण ठेवून कर्ज घेतलेलं असेल तर बँकेला हया सर्व गोष्टींचा लिलाव करून रक्कम वसूल करण्याचे अधिकार सुध्दा असतात, आणि बँक असे करतेही. आणि जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा विमा सुध्दा काढलेला नाही त्याने कोणत्याच प्रकारची जागा किंवा दागिने गहाण ठेवलेले नाहीत अश्या वेळेला बँक तीन व्यक्तींकडून कर्ज वसूल करते.

पहिली व्यक्ती वैयक्तिक कर्जाची साक्षीदार असणारी व्यक्ती. दुसरी व्यक्ती म्हणजे वैयक्तिक कर्जा मध्ये सह कर्जदार असणारी व्यक्ती. बँकेला पूर्ण अधिकार असतात की ती या व्यक्तींकडून पैसे वसूल करू शकते. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची वारस असणारी व्यक्ती. ह्या तीन व्यक्तींकडून बँक कर्जाची रक्कम वसूल करू शकते. म्हणजे कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही बँक त्या कर्जदाराच्या वारसदाराकडून किंवा सहकारी व्यक्तींकडून कर्जाची रक्कम वसूल केल्या जाते.

तर या लेखामुळे आपल्याला कळण्यास मदत झाली असेल की एखाद्या कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक कोणाकडून त्या कर्जाची वसुली करते. आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here