Wednesday, July 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

साईबाबा धूप आरती

Sai Baba Dhoop Aarti

नमस्कार मित्र/ मैत्रिणींनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून साईबाबा धूप आरतीचे लिखाण करणार असून त्या आरतीचे महत्व समजून घेणार आहोत. तसचं, साईबाबा यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तरी, आपण या लेखाचे महत्व समजून इतरांना देखील सांगा.

साईबाबा धूप आरती – Sai Baba Dhoop Aarti

Sai Baba Dhoop Aarti
Sai Baba Dhoop Aarti

आरती साईबाबा ।  सौख्यदातार जीवा । चरणरजातला ।

घावा दासां विसांवा, भक्तां विसांवा ।। आ. धु. ।।

जाळुनियां अनंग ।  स्वरुपरुपीं राहे दंग ।  मुमुक्षुजनां दावी । 
निज डोळां श्री रंग ।। आ0 ।। 1 ।।

जया मनी जैसा भाव ।  तया तैसा अनुभव ।  दाविसी दयाघना ।
ऐसी तुझी ही माव ।। आ0 ।। 2 ।।

तुमचें नाम ध्यातां ।  हरे संसृतिव्यथा ।  अगाध तव करणी । 
मार्ग दाविसी अनाथा ।। आ0 ।। 3 ।।

कलियुगीं अवतार ।  सगुणब्रहम साचार ।  अवतीर्ण झालसे ।
स्वामी दत्त दिगंबर ।। द0 ।। आ0 ।। 4 ।।

आठां दिवसां गुरुवारीं ।  भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ।। आ0 ।। 5 ।।

माझा निजद्रव्यठेवा ।  तव चरणरजसेवा मागणें हेंचि आतां । 
तुम्हां देवाधिदेवा ।। आ0 ।। 6 ।।

इच्छित दीन चातक ।  निर्मल तोय निज सुख ।
पाजावें माधवा या ।  सांभाळ निज आपुली भाक ।। आ0 ।। 7 ।।

मित्रांनो, आपण धूप आरती करण्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेवूया. हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या इष्ट देवतेची आराधना करण्यास आणि त्या इष्ट देवतेची मनोभावे आरती करण्यास विशेष महत्व दिल आहे.

त्यामुळे, आपल्या देशांत ही परंपरा वैदिक काळापासून चालत आली आहे. तसचं, या इष्ट देवतेची पूजा करण्यापासून आरती म्हणण्यापर्यंत प्रत्येक भक्तांची वेगवेगळी पद्धत आहे. त्यानुसार भाविक आपल्या इष्ट देवतेची पूजा आणि आरती करीत असतात.

आरती करण्यामागे लोकांची अशी धारणा असते की, आरतीचे पठन केल्याने आपल्या आसपास पसरलेल्या नकारात्मक उर्जा आणि वाईट शक्तींचा नाश होतो आणि आपण एकाप्रकारे अध्यात्मिक जगतात प्रवेश करीत असतो.

आरती म्हटल्याने आपल्या मनाला शांती लाभते तसेच देवाची स्तुती केल्याचा लाभ देखील आपणास मिळतो. आरतीचे पठन केल्यानंतर आपण पाहतो की, मंदिरात किंवा आपल्या घरी धूप जाळला जातो. तसचं, धूप आरती देखील म्हटली जाते. याबाबत देखील लोकांच्या विविध मान्यता आहेत.

जेंव्हा आपण धूप जळतो तेंव्हा तो कुठलाच भाग शिल्लक न ठेवता पूर्णतः जाळून जातो. धूप जाळल्यानंतर एका प्रकारचा सुगंध निर्माण होतो आणि तो आपल्या सभोवतालच्या परिसरात दरवळू लागतो.

धूपाच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण प्रसन्न होवून जाते. याचप्रमाणे, धूपाचे ज्वलन केल्याने आपण आपल्या सर्व वाईट वृत्तींचा कापुराच्या अग्नीत त्याग करून स्वत:ला भगवंतांच्या चरणात समर्पित करतो.

मंदिरात दरोरोज साईबाबा यांच्या मूर्तीची मनोभावे पूजा केली जाते. तसचं, त्यांची महिमा म्हणून साईबाबा आरतीचे पठन करण्यात येते. आरतीच्या शेवटी साईबाबांच्या चरणी भाविक आपले अवगुण अर्पण करून स्व:ताला पूर्णतः साईबाबांच्या चरणी समर्पित करण्यासाठी धूप आरती म्हणत असतात. मित्रांनो, धूप आरतीचे विशेष असे महत्व असून आपण नियमित तिचे पठन केलं पाहिजे.

Editorial team

Editorial team

Related Posts

Hanuman Aarti in Marathi
Aarti

हनुमंताची आरती

Hanuman Aarti in Marathi राम भक्त हनुमान यांना या भूलोकावर अनेक नावांनी संबोधलं जाते. तसचं, त्यांच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा...

by Editorial team
April 21, 2021
Parshwanath Aarti Marathi
Aarti

जैन सामुदाय चे २३ वे तीर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची आरती

Parshwanath Aarti Marathi जैन सामुदाय हा भारतातील अति प्राचीन समुदाय असून या सामुदायात एकूण २४ तीर्थकार  होवून गेले आहे. त्यांपैकी...

by Editorial team
February 17, 2021
Navnath Aarti
Aarti

नवनाथ महाराजांची आरती

Navnath Aarti Marathi नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नवनाथ महाराज यांचे मूळ गुरु गुरु आदिनाथ महाराज असून, त्यांचा दत्त संप्रदायाशी निकटचा...

by Editorial team
September 26, 2020
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved