एक असाही प्राणी जो काहीही न खाता वर्षानुवर्षे जिवंत राहतो, इथे जाणून घ्या त्या प्राण्याचे नाव

 Salamander Information in Marathi 

पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात मानव वस्ती तर आहेच. पण मानवाच्या सोबत असंख्य प्राणी सुध्दा आपल्याला पाहायला मिळतात. मग ती मुंगी असो की हत्ती. प्रत्येक प्राणी जिवंत राहण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व पृथ्वीवर टिकून ठेवण्यासाठी तो स्वतःच्या अन्नाच्या शोधात भटकत असतो, आपण मनुष्य सुध्दा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर मेहनत करत असतो.

कारण आपण जर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी समर्थ नसलो तर आपले या पृथ्वीवरील अस्तित्व नष्ट होऊन जाईल. पण आपल्याला माहिती आहे का,की असाही एक प्राणी या पृथ्वीतलावर आहे जो काहीही न खाता वर्षानुवर्षे जिवंत राहु शकतो. माहिती नसेल तर काळजी नका करू आम्ही आपल्याला या लेखातून त्या प्राण्याविषयी सांगणार आहोत, तर चला पाहूया वर्षानुवर्षे जिवंत राहणारा प्राणी.

असाही एक अजिबोगरीब प्राणी जो काही न खाता जीवन जगतो – Information About Salamander in Marathi Language 

Salamanders
Salamanders

 

या प्राण्यांचे नाव आहे सैलामैंडर. दक्षिण पूर्व युरोप च्या बोस्निया आणि हर्जेगोविना या दोन देशांत हा प्राणी आढळतो. हा प्राणी पाणी असलेल्या गुंफांमध्ये पाहायला मिळतो. तो काही न खाता सुध्दा बरेच वर्ष जिवंत राहू शकतो. वैज्ञानिकां नुसार हा प्राणी ७ वर्ष त्या गुफेतील पाण्यामध्ये एकाच ठिकाणी पडलेला आढळला. वैज्ञानिकांचे असे मत आहे की त्यांच्या त्वचेमुळे आणि त्यांच्या अविकसित डोळ्यांमुळे त्यांना कुठेही हलता येत नसणार. अश्या घटना खूप कमी पाहायला मिळतात की एखादा प्राणी एकाच ठिकाणी कित्येक दिवस काहीही न खाता न हलता राहतो.

सैलामैंडर हा प्राणी १०० वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. स्लोवेनिया पासून क्रोएशिया पर्यंतच्या क्षेत्रात सैलामैंडर आपली जागा कमीत कमी १२ वर्षानंतर बदलतो. तेही त्याच्या सोबतीची भेट झाल्यावर. हंगेरियन नेचुरल हिस्ट्री म्यूजियम च्या ज्यूडिट वोरोस यांच्या नुसार जेव्हा मुसळधार पाऊस पडतो आणि गुफांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते तेव्हा ह्या प्राण्यांना पाहिल्या गेले आहे.  नाहीतर या प्राण्यांना शोधण्यासाठी पाण्यात जाणाऱ्या व्यक्तींचा सहारा घ्यावा लागला असता. पण आता काही गोष्टींच्या आधारे एवढं सांगितल्या जात की हे प्राणी तेथे आहेत की नाही.

ज्या गुफांमध्ये हा प्राणी राहतो त्या गुफेत त्यांना खायला मिळणे खूप कठीण असतं. म्हणून गुफेत एकाच ठिकाणी पडून ते तिथे असलेल्या छोट्या कीटकांना खातात. त्या कीटकांमुळे त्यांच्या पोटाला सहारा मिळतो. पण एकाच ठिकाणी असे पडून राहणे आणि कोणत्याही प्रकारची हालचाल न करणे ही गोष्ट बाकी प्राण्यांपेक्षा खूप वेगळी आहे.

तर वरील लेखात आपण अश्या प्राण्याविषयी पाहिले जो एकाच ठिकाणी कित्येक वर्षे पडून राहू शकतो. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top