भारतात सापडला एक रंग बदलणारा मासा,विष साठवून ठेऊ शकतो आपल्या मणक्यात, अश्याच आणखी आश्चर्य चकित करणाऱ्या गोष्टी आल्या समोर

Scorpion Fish Information in Marathi 

भारतात नाही तर सर्व जगात जर आपल्याला कोणीही विचारले की रंग बदलणाऱ्या प्राण्याचे नाव सांगा तर आपण लगेच सरडा म्हणजेच गिरगीट असे उत्तर देतो. कारण प्रत्येकाला माहीत आहे की रंग बदलण्यात सर्वात जास्त हुशार कोणी असेल तर तो रंग बदलणारा सरडा असतो. पण भारतात पहिल्यांदा असाही एक प्राणी आढळला आहे जो आपला रंग बदलवू शकतो जे की सराडा करत असतो.

आपण आजच्या लेखात याविषयी माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये या प्राण्याविषयी आपल्याला सविस्तर वाचायला मिळेल, तर आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडणार तर चला पाहूया रंग बदलणारा तो कोणता प्राणी आहे आणि आणखी कोणत्या गोष्टी करण्यात तो समर्थ आहे.

असा दुर्लभ मासा जो आपला रंग बदलण्यात आहे माहीर -Scorpion Fish Information in Marathi 

Scorpion Fish Information
Scorpion Fish Information

भारतात पहिल्यांदा असा एक मासा पाहण्यात आला आहे जो स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीराचा रंग बदलु शकतो. आणि या दुर्लभ प्रजातीला सेंट्रल मरीन फिशरीज इंस्टीट्यूट (CMFRI) च्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे, या माश्या ला त्यांनी स्कॉर्पियनफिश (Scorpionfish) असे नाव दिले आहे. सर्वात आधी हा मासा मन्नार च्या खाडीत एका गवताळ भागात लपलेला आढळला आणि तेथून या माश्या ला आणल्यानंतर यावर थोड्या प्रमाणात रिसर्च केल्यावर माहिती झाले की हा एक विषारी मासा आहे आणि देशात या प्रकारच्या माश्या चा शोध प्रथमता झाल्याचे फिशरीज इन्स्टिट्यूट ने सांगितले आहे.

हा मासा केवळ ४ सेकंद मध्ये आपला रंग बदलू शकतो, हा मासा त्याच्या शरीरात असलेल्या पिगमेंट आणि विषा चा वापर करून आपला रंग बदलतो. हा मासा तेव्हाच आपला रंग बदलतो जेव्हा या माश्याला स्वतःवर संकट आल्याचे कळते. या माश्याचे शास्त्रीय नाव स्कॉर्पिनोस्पिसिस नेगलेक्टा (Scorpaenospsis Neglecta) म्हणून आहे, आणि या माश्याची विशेषतः रंग बदलण्याची तर आहेच सोबतच हा मासा आपल्या मणक्यात विष स्टोर करून घेऊ शकतो आणि संकटाच्या वेळी हे विष शेपटीच्या माध्यमातून बाहेर काढू शकतो.

सेंट्रल मरीन फिशरीज इंस्टीट्यूट (CMFRI) च्या ऑफिशियल ट्विटर वरून या माश्याचे फोटो शेयर करून त्यांनी ही विशेष माहिती दिली आहे. भविष्यात या माश्या च्या साहाय्याने नवीन प्रजातींवर शोध घेण्यास मदत होणार आहे. असे या ट्विट ला पाहून लोकांचे मत आहे. आशा करतो आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल आपल्याला ही माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन माहितीपर लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top