गुगल ची सुरुवात केली होती तीन जणांनी पण कंपनीची सुरुवात करणाऱ्या संस्थापकांमध्ये नाही त्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव

Unofficial Third  Founder of Google

आज प्रत्येकाजवळ एक स्मार्ट फोन उपलब्ध आहे, आणि त्या स्मार्टफोन मध्ये इंटरनेट जर एखादी कोणतीही गोष्ट आपल्याला शोधायची असल्यास आपण लगेच इंटरनेटवर सर्च करतो आणि आपल्याला क्षणार्धात ती गोष्ट आपल्या सापडते सुध्दा आणि जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे गुगल म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट शोधायची असली तर आपण गुगल नावाच्या सर्च इंजिन चा वापर करता. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये आज गुगल चा क्रमांक लागतो.

पण आपल्याला माहिती आहे का की गुगल ला निर्माण दोन जणांनी केलेलं नसून तीन जणांनी केलेलं आहे आपल्याला असलेल्या माहिती नुसार गुगल चे निर्माण करणारे दोघे संस्थापक आहेत. पण हे सत्य नसून गुगल ला बनविणारे तिघे मित्र होते. आपण हे वाचून थोडेसे गोंधळून गेले असाल पण हे सत्य आहे. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की गुगल ला निर्माण करण्यात कोणत्या तिसऱ्या व्यक्तीचा हाथ आहे. तर चला पाहूया.

हे आहे गुगल च्या तिसऱ्या संस्थापकाचे नाव – Scott Hassan Third Founder of Google

Scott Hassan Third Founder of Google
Scott Hassan Third Founder of Google

आपल्या माहिती साठी १९९६ साली गुगल हा एक रीसर्च प्रोजेक्ट म्हणून सुरू झाला होता. आणि या प्रोजेक्ट ची सुरुवात गुगल चे आजचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी बिन यांनी मिळून केली होती पण सर्वांना फक्त या दोन व्यक्तींविषयीच माहिती आहे की यांनी गुगल ला सुरू केले होते पण गुगल ला सुरू करण्यात या दोघांसोबत तिसऱ्या व्यक्तीचा सुध्दा तेवढाच वाटा होता जितका या दोघांचा. कारण तिघेही चांगले मित्र होते आणि पीएचडी चे सोबत करणारे स्टुडंट सुध्दा.

आणि गुगल सारख्या रिसर्च प्रोजेक्ट चे मेन लीड प्रोग्रामर ती तिसरी व्यक्ती होती आणि त्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. “स्कॉट हसन”. जे गुगल आज जगात आपली प्रसिद्धी गाजवत आहे त्या गुगल चे सर्वात जास्त कोड हे स्कॉट हसन यांनी तयार केलेले आहेत. स्कॉट कोडिंग मध्ये बऱ्यापैकी हुशार होते आणि त्यांनी त्याचा वापर गुगल साठी सुध्दा केला होता, पण आपल्या मनात एक प्रश्न उभा राहिला असेल की कोणत्या कारणामुळे स्कॉट चे नाव गुगल च्या संस्थापकांमध्ये नाही आहे.

कारण गुगल ची कंपनी म्हणून सुरुवात १९९८ ला झाली आणि हा रिसर्च प्रोजेक्ट संपण्याच्या अगोदरच स्कॉट यांनी आपला पाय या प्रोजेक्ट मधून बाहेर काढला, कारण त्यांना स्वतःचे करियर हे रोबोटीक मध्ये करायचे होते. म्हणजेच गुगल ला कंपनी म्हणून रजिस्टर होण्याच्या अगोदर त्यांनी या प्रोजेक्ट मधून स्वतःला वेगळं केले त्यामुळे त्यांचे नाव गुगल च्या संस्थापकांमध्ये नाही आहे. स्कॉट यांनी २००६ ला स्वतःची कंपनी सुरू केली आणि त्या कंपनीचे नाव ठेवले विलो गॅरेज.

गुगल कंपनी ने स्वतःचे डोमेन १५ सप्टेंबर १९९७ ला रजिस्टर केले आणि त्यांनंतर १९९८ साली गुगल एक कंपनी म्हणून उदयास आली. त्यानंतर लॅरी पेज आणि सर्जी बिन यांनी आपल्या मित्राच्या एका छोट्या गॅरेज मध्ये गुगल ची सुरुवात केली आणि त्यांच्या एका पीएचडी करणाऱ्या मित्राला गुगल चा पहिला कर्मचारी  बनविले आणि गुगलच्या त्या पाहिल्या कर्मचाऱ्याचे नाव होते क्रेग सिल्वर्स्टन. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत आपण गुगल ची प्रगती पाहत आहातच. खूप कमी दिवसात गुगल ने मोठी उपलब्धता प्राप्त केली आहे पण या उपलब्धतेमागे खूप मोठी मेहनत कंपनीच्या संस्थापकांनी घेतली आहे.

तर वरील लेखात आपण पाहिले की गुगलच्या त्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव ज्याने गुगल च्या सुरुवातीला गुगल व्हे निर्माण करण्यास मदत केली होती. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असणार आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here