शार्क हा मासा ची माहिती

Shark chi Mahiti

आपल्याला सर्वांना माहीत असलेला जलचर प्राणी म्हणजे मासा होय. माशांचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे शार्क मासा होय.

शार्क हा मासा ची माहिती – Shark Information in Marathi

Shark Information in Marathi
Shark Information in Marathi
हिंदी नाव: शार्क मछली
इंग्रजी नाव: Celachimorpha

शार्क माशाला डोळे, तोंड, पृष्ठभाग, वक्षपर, अधरपर, कल्ले, पुच्छपर व पाश्वरेषा हे अवयव आहेत. या माशाचे हृदय दोन कप्प्यांचे असते. शार्क माशांची त्वचा खरखरीत असून या माशाचे शरीरलांबट व निमुळते असते. शार्क हा मासा समुद्रात राहतो.

शार्क माशाचे अन्न – Shark Food

समुद्रातील लहान-लहान कीडे, लहान लहान मासे, साप हे शार्क माशाचे प्रमुख अन्न आहे.

इतर माहिती: शार्क मासा हाशीत रक्ताचा प्राणी आहे. या माशाला असणाऱ्या परांचा उपयोग पाण्यात पोहण्यासाठी हे मासे करतात व आपल्या पुच्छपरांचा उपयोग पाण्यात पोहताना दिशा बदलण्यासाठी हे मासे करतात. शार्क माशांच्या शरीरावर खवले असतात; परंतु हे खवले स्पष्ट दिसत नाहीत. शार्क मासे सहसा खाऱ्या पाण्यात आढळतात. आकाराने हे मासे खूप मोठे असतात.

उपयोग: माणसे शार्क माशाचा उपयोग खाण्यासाठी करतात. शार्क माशात ‘अ’ जीवनसत्त्व असते. हे मासे खाल्ल्याने शरीराला ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. शार्क माशापासून तेल तयार करतात. तेलाचा उपयोग खाण्यासाठी, साबण, सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी होतो. तसेच टाकाऊ माशांचा उपयोग खत म्हणून केला जातो.

शार्क माशाचे दात मोठे, तीक्ष्ण आणि आतल्या बाजूला वळलेले असतात. काही शार्क मासे नरभक्षकही आहेत. शार्क मासे एखादे भक्ष्य जबड्यात पकडल्यावर त्याचा तुकडा पडेपर्यंत ते भक्ष्य सोडत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here