मेंढी विषयी माहिती

Sheep in Marathi

भारतात मेंढी ही पाळीव प्राणी आहे. धनगर जातीचे लोक जास्त मेंढी हा प्राणी पाळतात.

मेंढी विषयी माहिती – Sheep Information in Marathi

Sheep Information in Marathi
Sheep Information in Marathi
हिंदी नाव भेड़
इंग्रजी नाव Sheep
शास्त्रीय नाव Ovis aries (ओवीस एरीस)

मेंढी विषयी माहिती – Sheep Information in Marathi

मेंढीला चार पाय, दोन डोळे, दोन कान, मेंढीला खूप लहान शेपटी असते. मेंढीचे कळप असतात. मेंढी ही पांढरी, पांढरी-काळी, काळी, तपकिरी प्रकारच्या रंगाची असते.

मेंढीचे अन्न – Sheep Food

प्रामुख्याने मेंढीचे अन्न हे झाड-पाला, फळ हे आहे.
तसेच ती हिरवे गवत, झाडाची हिरवी पाने पण खाते. मेंढी ही शाकाहारी प्राणी आहे. तसेच धान्याची भरड सुद्धा हे प्राणी खातात.

जाती :-

भारतात मेंढ्यांच्या 35 हून जास्त प्रजाती आढळतात. बकरी आणि मेंढी ह्या एकाच कुटुंबातील आहेत.  त्यापैकी बिकानेरी, दख्खनी, काश्मिरी, कच्छी ह्या आणि अशा विविध मेंढ्यांच्या जाती आहेत.

तसेच युरोप मध्ये मेंढ्या भरपूर प्रमाणात आढळून येतात. तेथील शेतकरी मेंढ्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात करतात. मेंढीचे आयुष्य ८ ते १० वर्ष एवढे राहते. काही 20 वर्षापर्यंतही जगू शकतात.

मेंढीचे वजन – Sheep Weight

मेंढीचे वजन २२ ते ३० किलोग्रॅमपर्यंत असू शकते.

उपयोग :-

मेंढी केसाळ प्राणी आहे. मेंढीचा मुख्य उपयोग म्हणजे तिच्यापासून लोकर कमविणे हा आहे.
मेंढीच्या अंगावरील केस काढून त्यांचा उपयोग गरम कपडे बनवण्यासाठी केला जाते. त्यालाच लोकर म्हणतात. मेंढीचे लोकर हे खूप उष्ण असते.

जेवढी सशक्त मेंढी असेल तेवढी लोकर जास्त मिळते.
मेंढीपालन करणाऱ्या लोकांना धनगर म्हणतात.

अनेक शेतकरी शेतातील पीक निघाल्यानंतर शेत नांगरून मेंढीचा कळप शेतात बसवतात. त्यामुळे  कळपाने केलेल्या  विष्ठेचा उपयोग शेतात खत म्हणून करतात. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारून. जमिनीतील उत्पन्न वाढण्यास त्याची मदत होते.

थंडीपासून बचावासाठी ज्या लोकरीचे कपडे वापरतात, ती लोकर मेंढीपासून मिळते.
मेंढीचे लोकर हे खूप उष्ण असते. मेंढीच्या अंगावरील  ती लोकर काढून  विकतात व त्या पासून ब्लँकेट इ. अनेक प्रकारचे गरम कपडे  बनवल्या जातात.

मेंढीपालन व्यवसायासाठी सरकार कर्ज देते. मेंढीपालन हा शेतकऱ्यांसाठी जोडधंदा आहे.
भारतात अनेक ठिकाणी मेंढ्यांचे मांस हे खाण्यासाठी सुद्धा वापरले जाते, पण प्रामुख्याने मेंढ्या ह्या लोकर कमविण्यासाठी पाळल्या जातात.

मेंढी विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Sheep

1) बकरीसोबतच कोणत्या एका प्राण्याचं कुटुंब एक आहे?

उत्तर: मेंढी.

2) मेंढीपासून दुध, मांस याबरोबरच कुठली महत्वपूर्ण गोष्ट मिळते?

उत्तर: लोकर

3) लोकरचा उपयोग कशासाठी केला जातो?

उत्तर: गरम कपडे तयार करण्यासाठी.

4) मेंढीपालनासाठी सरकारकडून काही योजना राबविल्या जातात?

उत्तर: सरकार कडून पशुपालनासाठी अनेक योजना राबविल्या जातात त्यामध्ये मेंढीपालनासाठी सुद्धा योजना असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top