असा लागला ट्राफिक सिग्नल चा शोध. यामुळे ठेवल्या गेले हे तीन रंग

Traffic Signal Invention History

गाड्यांचे होर्न आणि गर्दीचे साम्राज्य अधिकतर आपल्याला कुठे पाहायला मिळते? ट्राफिक सिग्नल वर. एखादा आपली बाईक जेथून जागा मिळेल तेथून काढून घेतो. तर एखादा चौकातील सिग्नल ची वाट पाहत तेथेच एका जागी शांततेने उभा राहतो.

काही वेळानंतर ट्राफिक चे सिग्नल हिरवे होतात आणि सर्व आप आपल्या वाहनांना ट्राफिक मधून बाहेर काढतात, पण आपण जेव्हा ट्राफिक सिग्नल वर उभे असता तेव्हा आपल्या डोक्यात हा विचार येतो का? कि ट्राफिक सिग्नल चा शोध कुठे लागला, आणि हा शोध लागलाच तर यामध्ये तीन रंगच का ठेवण्यात आले?

आपल्याला याविषयी माहिती आहे का? असेलही किंवा नसेलही. पण आपण आजच्या लेखात याच ट्राफिक सिग्नल विषयी काही गोष्टी पाहणार आहोत, ज्या आपल्याला माहिती नसतीलही, कि सर्वात आधी ट्राफिक सिग्नल चा वापर कोणत्या देशात आणि कुठे झाला होता? आणि यामध्ये असणाऱ्या तीन रंगांची काय विशेषतः आहे.

तर चला जाणून घेवूया.

असा लागला ट्राफिक सिग्नल चा शोध. यामुळे ठेवल्या गेले हे तीन रंग – Short Note on Traffic Signals in Marathi

Short Note on Traffic Signals
Short Note on Traffic Signals

ट्राफिक सिग्नल चा शोध कसा लागला? – Traffic Signal Invention

एका अश्या ठिकाणाचा विचार करा जेथे कोणतेही नियम किंवा प्रशासन नाही, सर्व लोक स्वतःला वाटेल तसे वागत आहे, स्वतःला वाटेल तसे जगत आहेत, त्या ठिकाणी काय होईल? लोकांच्या मनात भीतीच उरणार नाही आणि लोक हवे तसे कधीही कुठेही निघतील,

तसेच सुरुवातीला झाले जेव्हा ट्राफिक विषयी कोणतेही नियम कायदा नव्हता तेव्हा लोक रस्त्यावर हवे तसे चालत, हवे तिथे थांबत आणि या गोष्टींमुळे अनेक जणांचे जीव गेले, त्यानंतर एका व्यक्तीने यावर उपाय काढत ट्राफिक सिग्नल चे निर्माण केले, त्या व्यक्तीचे नाव होते जेके नाईट. जेके रेल्वे मध्ये एक इंजिनियर म्हणून काम करत होते.

त्यांनी १० डिसेंबर १८६८ साली लंडन च्या ब्रिटिश सभागृहा बाहेर या ट्राफिक सिग्नल ला सर्वप्रथम लावले होते. सुरुवातीला या सिग्नल च्या लाईट मध्ये फक्त दोन लाईट्स चा समावेश होता एक लाल रंगाचा आणि दुसरा हिरवा.

तेव्हा रात्री हे लाईट्स दिसावे म्हणून त्यांच्या मध्ये गॅस चा वापर केल्या जात असे. पण काही दिवसानंतर या लाईट्स मध्ये बदलाव करत एका आणखी लाईट ची भर पडली तो म्हणजे पिवळा रंग असेलेला.

ट्राफिक सिग्नल च्या लाईट्स मध्ये तीन रंग का वापरतात? – Why Are Traffic Lights Red, Yellow, and Green?

आपल्याला माहिती आहे कि ट्राफिक सिग्नल मध्ये ३ रंग असतात, एक लाल, एक हिरवा आणि तिसरा रंग म्हणजे पिवळा रंग. पण आपल्याला माहिती आहे का? कि या तीन रंगांचेच लाईट्स का वापरले जातात.

कारण कि बाकी रंगांपेक्षा हे रंग आपल्या डोळ्यांना रात्री सुद्धा स्पष्ट दिसतात, पण बाकी रंग आपल्या डोळ्यांना या रंगांएवढे स्पष्ट दिसत नाहीत.

लाल रंगाच्या लाईट यासाठी वापरल्या जातो कि हा लाईट दुरून स्पष्ट दिसतो, सोबतच लाल रंग या गोष्टीला दर्शवतो कि समोर धोका आहे. आपण थांबून जावे.

हिरवा रंग शांतीचे प्रतिक मानल्या जात. आणि ट्राफिक सिग्नल मध्ये याचा वापर यासाठी केला जातो कि समोर कोणताही धोका नाही आहे, आपण समोर जाऊ शकता.

पिवळा रंग या साठी वापरला जातो कि आपण आपले वाहन सुरु करून ठेवावे आपल्याला समोर जाण्यासाठी सिग्नल मिळू शकते. सोबतच या रंगाला उर्जेचे प्रतिक मानल्या जाते.

या लेखाची आपल्याला ट्राफिक सिग्नल विषयी माहिती समजण्यासाठी मदत झाली असेलच, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top