“अभ्यासाचा कंटाळा येतोय! मग वाचा ह्या टिप्स कंटाळाच निघून जाईल.”

Abhyas Kasa Karava

अभ्यास म्हटलं कि त्याचा कंटाळा येणे साहजिकच आहे. बरेचदा आपल्याला अभ्यासाचा येवढा कंटाळा येतो कि काय कराव सुचत नाही, तसेच वर्गातील काही मंडळी तर परीक्षा तोंडावर आल्या नंतर आपले पुस्तक उघडण्याचे कष्ट घेतात.

मग वेळेवर त्यांनी पुस्तक उघडले कि त्यांना एखाद्या नवीन ग्रहावर आल्या सारखे भासते ज्यामध्ये सगळच नवीन दिसत.

आणि त्यांना कळत नाही आता नेमक कराव तरी काय?

तर त्यावर असं काही रामबाण उपाय उपलब्ध नाही आहे. तुम्हाला त्यासाठी अभ्यास हा सुरुवात पासूनच करावा लागेल.

जेणेकरून वेळेवर आपल्याला डोंगर कोसळल्यासारखे वाटणार नाही.

तर मित्रांनो,

आजच्या या उपयुक्त लेखात आपण त्या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत. ज्या अभ्यासाला आणखी सोपी तसेच मजेशीर बनवू शकतात!

तर चला जाणून घेऊया काही टिप्स ज्या आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Study Tips in Marathi

“अभ्यासाचा कंटाळा येतोय! मग वाचा ह्या टिप्स कंटाळाच निघून जाईल.” – Study Tips in Marathi

१)  अभ्यासाचे नियोजन करा – How to Study Management

नियोजन म्हणजे आपण एखाद्या गोष्टीविषयी केले गेलेले आयोजन होय. अभ्यासाच्या बाबतीत सर्वात महत्वाची बाब म्हणजे अभ्यासाचे नियोजन करणे होय.

आपल्याला ठरवावे लागेल कि कोणत्या वेळेला कोणता विषय वाचायचा आहे. तसेच कोणत्या विषयावर आपल्याला जास्त भर द्यावा लागेल.

अश्या प्रकारे आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकता. तसेच वेळेनुसार ठरवून घ्यावे कि कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा लागेल जेणेकरून आपण प्रत्येक विषयाला ठराविक वेळेत वाचून बाजूला ठेवू शकाल.

२)  फ्लो-चार्ट आणि आकृत्यांचा वापर करा – Flowchart Charts and Diagram 

अभ्यासाला बसल्या नंतर एखाद्या विषयाचा अभ्यास करताना आपण फक्त वाचण्यावर किंवा लिहिण्यावर भर न देता त्या विषयाच्या संबंधित फ्लो-चार्ट तसेच आकृत्यांचा वापर करून आपण त्याविषयी अधिक प्रकारे जाणून घेऊ शकता. फ्लो-चार्ट आणि आकृत्यांमुळे आपल्या मेंदूंला त्याविषयी लवकर शिकायला मदत होते तसेच लवकर आठवण ठेवायला सुद्धा मदत होते. त्यासाठी अभ्यासाला बसल्यानंतर कधीही फ्लो-चार्ट आणि आकृत्यांची मदत घ्या.

३) ग्रुप करून अभ्यास करू शकता – Group Study

बरेचदा आपल्या सोबत सुद्धा असे झाले असेलच कि ! आपल्याला एखद्या प्रश्नाचे उत्तर माहिती असते पण आपल्याला ते लवकर आठवत नाही, आणि काही वेळे नंतर आपल्याला त्याचे उत्तर आठवते.

तर असे होऊ नये म्हणून आपण आपल्या मित्रांचा ग्रुप करून अभ्यास करू शकता.

जेणेकरून आपण केलेल्या संभाषणामुळे आपल्याला कोणतीही गोष्ट आठवण ठेवण्यास मदत होईल.

४) मागील परीक्षेच्या पेपरांचा सराव करा – Previous Year Question Paper Solved

अभ्यास करण्यासाठी सगळ्यात प्रभावी मार्ग असा कि आपण झालेल्या मागील परीक्षेच्या पेपरांचा सराव करावा, ज्याच्या मदतीने आपण आणखी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. त्यामुळे तुम्हाला एक अनुमान येऊन जाईल कि परीक्षेत कश्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. आणि त्यावर आपण ठरवू शकतो कि त्या प्रश्नांचे उत्तर कश्या प्रकारे लिहायचे आहेत. त्यासाठी झालेले पेपर जमा करून त्यांचा सराव करावा.

५) पोषक आहार घ्या! – Healthy Food

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण घेत असलेला आहार! योग्य आहारामुळे आपल्या मेंदूलाच नाही तर आपल्या शरीराला सुद्धा योग्य चालना मिळते. म्हणतात न “You are what you eat” याचा अर्थ असा कि आपण जो आहार घेतो तसेच आपण होतो.

म्हणून आपला आहार योग्य ठेवा. ज्यामध्ये फळे, माशे, मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, मसूरची दाळ, इत्यादी

या आहारामुळे आपल्या मेंदूला योग्य चालना मिळेल. तसेच मेंदूला आणखी कार्यक्षम होण्यास मदत मिळेल.

आपला मेंदू जर चांगल्या प्रकारे तयार झाला तर आपल्याला अभ्यासात मदत होईल.

६) कन्सेप्ट समजून घ्या – Understand Concepts

बरेच विध्यार्थी फक्त जे वाचले ते रटण्यात भर देतात पण त्यांनी काय वाचले ते समजून घेत नाहीत,

त्यामुळे बरेचदा त्यांचा गोंधळ होतो. आणि या गोंधळामुळे ते वाचलेले लक्षात ठेवू शकत नाहीत.

त्यासाठी प्रत्येक गोष्ट पोपटासारखी न करता त्या विषयाला समजून घेऊन व्यवस्थित प्रकारे लिहून पाहावी. जेणेकरून तो कन्सेप्ट नेहमीसाठी तुमच्या लक्षात राहील.

७) नोट्स तयार करा – Make a Notes

आपल्याला एखाद्या विषयाविषयी काही लक्षात राहत नसेल किंवा समजत नसेल तर आपण पुस्तकातून  तसेच इंटरनेट ची मदत घेऊन त्या विषयाविषयी माहिती काढून नोट्स तयार करू शकता, जेणेकरून आपल्याला अभ्यास करतांना मदत होईल. आणि पेपर मध्ये त्या विषयी लिहायला सोपी जाईल.

असे केल्यामुळे अभ्यासातील बरेच प्रश्न आपल्याला सोडवल्या जातील.

८) झोपेच्या अगोदर नोट्स वाचूनच झोपा.

असे म्हटल्या जाते कि आपण रात्री जे हि वाचून किंवा बघून झोपतो आपला मेंदू रात्री त्याविषयी विचार करून त्या गोष्टीला आपल्या अवचेतन मनामध्ये जतन करून ठेवण्याची ताकद ठेवतो.

आणि एक वेळ अवचेतन मनामध्ये जतन झालेली गोष्ट मनुष्य कधीही विसरत नाही त्यासाठी रोज झोपण्या पूर्वी आपल्या सगळ्या नोट्स वाचून झोपा. जेणेकरून आठवण ठेवण्यात आपल्याला कमी कष्ट लागतील.

९) पुरेपूर झोप घ्या – Sleep Properly

अन्नाशिवाय मनुष्य हा २-३ आठवडे जिवंत राहू शकतो. पण झोपेविषयी असे नाही मनुष्याच्या शरीराची रचनाच अशा प्रकारे केली गेली आहे, ज्यामध्ये मनुष्याला प्रत्येक गोष्ट हि तेवढीच आवश्यक आहे जेवढी त्याच्या शरीराची मागणी आहे.

तसेच मानवाच्या शरीराला सरासरी ७-८ तासाच्या झोपेची आवश्यकता असते. जसे आपण आपल्या फावल्या वेळात आपली आवश्यक कामे आटपून घेतो.

त्याचप्रमाणे आपला मेंदू आपण झोपल्यानंतर तो त्याचे कार्य करत असतो.

जर मेंदूला त्याचे काम करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळाला नाही तर तो गोंधळून जातो आणि त्यामुळे आपण लगेच काही गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही.

त्यासाठी किमान ७-८ तास झोप घ्या जेणेकरून तुमचा मेंदू व्यवस्थितरित्या कार्य करेल.

आणि तुम्हाला अभ्यासात त्या गोष्टीची मदत होईल.

१०) सराव करत रहा – Practice

“Practice Make Man Perfect” म्हणजे जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे अव्वल व्हायचे असेल तर आपल्याला सरावाची नितांत आवश्यकता असते. असे म्हणतात कि सरावाने कोणतीही गोष्ट साध्य होते. आणि ते गोष्ट खरीहि आहे.

त्यासाठी आपण जास्तित जास्त भर हा झालेल्या अभ्यासाच्या सरावावर दिला पाहिजे. जेणेकरून आपल्याला अभ्यास करण्यास मदत होईल.

त्यासाठी सराव करत राहा.

आशा करतो आजच्या लेखातून आपल्याला काहीतरी नवीन शिकण्यास मिळाले असेल, जर आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रपरिवारात शेयर करा.

आणि आपला अभिप्राय  अवश्य नोंदवा कारण आपला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वाचा आहे. 

THANK YOU!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top