सबवे रेस्टोरेंटची अपयशाकडून यशाकडे जाण्याचा प्रवास…

Subway Success Story

सबवे रेस्टोरेंट हे खवय्येगिरी जगतातील असे नाव आहे ज्याची माहिती आज प्रत्येकाला आहे, जी माणसे खाण्याचे शोकीन आहेत किंवा नाहीत त्यांच्या हृदयापर्यंत पोहचण्यासाठी,  कंम्पनीच्या मुख्य कर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत केली.

इतकी मेहनत करीत असतांना सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.

Subway Success Story

सबवे रेस्टोरेंटची अपयशाकडून यशाकडे जाण्याची गाथा – Subway Success Story

चला जाणून घेऊया सबवे चा सुरवातीपासून शेवट पर्यंतचा प्रवास कश्या प्रकारे एका मुलाने एका छोट्याशा सैंडविच च्या दुकानाला एक ब्रेडचे रूप दिले.

सबवे ची सुरवात फ्रेड डेलुका सोबत – Fred DeLuca of Subway Founder

आज पूर्ण जगात प्रसिद्ध असलेले सर्वात मोठ्या रेस्टोरेंटला ‘चैन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सबवे चा जन्म जवळपास ५३ वर्षांपुर्वी “फ्रेड डेलुका” नामक व्यक्ती द्वारा करण्यात आला.

सबवे चा सर्व प्रथम पाया रचणारा व्यक्ती हा ‘फ्रेडच’ होते.

फ्रेड च जीवनमान – Fred Deluca Biography

फ्रेड यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला असल्यामुळे त्यांची परिस्थिती खूपच बेताची होती.

त्यांच्याजवळ इतकाही पैसा नव्हता की ते स्वता: चा उदरनिर्वाह स्वता: करू शकतील.

अश्या प्रकारची हालाखीच्ची पस्थितीती असताना देखील ते खंभीर राहले आणि सतत संघर्ष करत आपले प्रयत्न सुरु ठेवले.

अश्या प्रकारे सघर्ष करत करत त्यांनी ४५००० पेक्षा अधिक फ्रेंचाइजी तत्वावरील रेस्स्टोरेंट निर्मिती केली.

फ्रेड यांनी बालपणापासून आपल्या उराशी बाळगत असलेल्या स्वप्नाला मुठमाती दिली

फ्रेडडेलुका यांनी सैन्डविच बनवण्याची सुरवात आपल्या जीवनात सर्वप्रथम एका छोट्याशा दुकानातून केली होती.

फ्रेड यांना त्यांच्या लहानपणापासूनच ‘डॉक्टर’ बनण्याची खूप इच्छा होती.

परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असल्याकारणामुळे ते डॉक्टरकीचे शिक्षण घेऊ शकले नाही.

डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी पुष्कळ पैशांची गरज होती जे की फ्रेड यांच्याकडे नव्हते.

फ्रेड हे आपल्या खालावलेल्या आर्थिक परिस्तिथी सोबत संघर्ष करीत असताना पाहून त्यांच्या जवळील एका मित्र ‘पीटर’ याने त्यांना एक हजार डॉलरची मदत केली.

याचबरोबर एक छोटेशे दुकान सुरु करण्याचा सल्ला देखील त्याने दिला. जेणेकरून आपला मित्र फ्रेड काही पैशे कमाऊ शकेल आणि त्या मिळालेल्या पैशातून आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करू शकेल.

फ्रेड यांना असे वाटत होते की, आपण शिक्षणापासून काही काळ दूर राहणे हेच आपल्यासाठी योग्य आहे.

अश्याप्रकारे फ्रेड यांनी लहानपणापासून आपल्या उराशी बाळगत असलेल्या स्वप्नाला पूर्णविराम दिला.

फ्रेडडेलुका यांनी या ठिकाणी बनविले सर्वात पहिले सैन्डविच:

फ्रेड यांची आर्थिक परिस्थिती बेताची असतांना त्यांच्या जवळील मित्र पीटर याने त्यांना ‘एक हजार डॉलर’ ची मदत केली होती.

फ्रेडडेलुका यांनी या पैशांच्या गुंतवणुकीतून एक छोट्येशे रेस्टोरेंट सुरु करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ते स्वस्त आणि स्वादिष्ट असे फास्टफूड लोकांना विकू शकतील.

अश्याप्रकारचा दृढनिश्चय त्यांनी आपल्या मनाशी बाळगून २८ ऑगस्ट १९६५ साली पहिले सैन्डविच स्टोर सुरु केले होते, त्या रेस्स्टोरेंटला त्यांनी “पीटर सुपर सबमरीन” असे नाव दिल होत.

फ्रेड यांनी आपल्या रेस्टोरेंटला दिले असलेले नाव त्यांना काही कारणांमुळे बदलावे लागले होते.

कारण त्यांनी जे नाव आपल्या रेस्टोरेंटला दिले होते,  ते एका “पिज्जा मरीन” च्या नावाबरोबर बऱ्याच प्रमाणात मिळत होते.

फ्रेड यांना पहिल्या रेस्टोरेंट मधून आलेले अपयश:   

आपले रेस्टोरेंट सुरु झाल्याच्या काही महिन्यानंतर फ्रेड यांनी जाहीर केल की,  माझे स्टोर खूप तोट्यात जात आहे.

अश्या स्वरुपात नुकसान होत असतांना देखील त्यांनी स्टोर सुरूच ठेवले शिवाय आणखी एक स्टोर उघडले होते.

या आपण सुरु केलेल्या ‘फास्टफूड’ रेस्टोरेंट सोबत फ्रेड यांनी बराच वेळ घालवला.

फ्रेड यांना मिळालेले पहिले यश व दुसर रेस्टोरेंट:

फ्रेड यांना आपल्या पहिल्या स्टोर पासून जेव्हा तोटा होत होता त्याच वेळेला त्यांनी दुसरे स्टोर सुरु केले होते.

दुसऱ्या रेस्टोरेंट पासून त्यांना मिळणारा नफा हा जास्त प्रमाणात नसला तरी त्यापासून मिळणारा नफा हा फ्रेड यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरेसा होता.

या रेस्टोरेंट पासून त्यांना फक्त ६ डॉलर चा फायदा झाला होता.

फ्रेड यांचे यशस्वी ठरलेले तिसरे रेस्टोरेंट, ज्याचे नाव ठेवले सबवे (SUBWAY):

फ्रेड यांच्या मनात त्यांच्या रेस्टोरेंटबद्दल दृढ आत्मविश्वास होता जो की कमी होण्याचे नावच घेत नव्हता.

त्यांच्या याच ठाम असणाऱ्या आत्मविश्वासामुळे त्यांनी १९६८ साली तिसरे रेस्टोरेंट सुरु केले ज्याला नाव दिले “सबवे”.

सबवे रेस्टोरेंट सुरु होताच पुष्कळ चांगले परीणाम दिसू लागले होते,  हेच त्यांच्या यशस्वी मार्गाकडे जाण्याचे त्यांना यशस्वी मार्ग दिसत होते.

सबवे रेस्टोरेंट मार्फत फ्रेड यांना झालेली पहिली कमाई ही, सात हजार डॉलर होती. त्यांना अश्या स्वरूपात होत असलेला नफा लक्षात ठेवून त्यांनी सबवे ची फ्रेंचाइजी देणे सुरु केले.

फ्रेड यांनी सुरु केलेल्या सबवे रेस्टोरेंटला लोकांकडून चांगल्या स्वरुपात प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्या रेस्टोरेंट ला खूपमोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळने सुरु झाले होते.

यानंतर फ्रेड यांनी कधीच मागे वळून बघितल नाही आणि पाहता पाहता वर्ष १९७८ पर्यंत त्यांच्या सबवे रेस्टोरेंट चे जवळ पास १०० स्टोर सुरु करण्यात आले होते.

स्टोर सुरु करण्याचा त्यांचा हा क्रम हळूहळू वाढतच राहिला आणि त्यांनी १९८७ साला पर्यंत त्यांची ही संख्या एक हजार पर्यंत पोहचली.

भारतात सबवेची सुरवात:

संपूर्ण जगात आपल्या प्रसिद्धीचा झेंडा फडकविल्यानंतर  फ्रेड यांनी २००१ मध्ये भारतात यशस्वी रित्या आपले पहिले पाऊल ठेवले.  वर्तमानकाळाचा विचार केला तर आता त्यांचे भारततील ६८ छोट्या मोठया शहरात जवळजवळ ५९१ सबवे रेस्टोरेंट सुरु झालेले आहेत.

फ्रेड यांनी त्यांचे शिक्षण केले पूर्ण – Fred Deluca Education

सबवेचे उत्पन्न आता खूप मोठया प्रमाणात वाढले होते.  यामुळे फ्रेड यांना त्यांचे राहिलेले शिक्षण घेण्याची काहीच गरज नसताना देखील त्यांनी २००२ साली कॉलेजमध्ये जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.

फ्रेड यांनी ब्राईड पोर्ट नावाच्या युनिव्हर्सिटी मध्ये आपले ग्रजुएशन पूर्ण केले.

सबवेचे वर्तमानातील सीईओ:

फ्रेड हे सबवे सोबत जास्त काळापर्यंत आपले जीवन व्यतिथ करू शकले नाही.

२०१५ मध्ये फ्रेड यांना ल्युकेमिया नावाची बीमारी झाली आणि त्या बीमारीतच त्यांचा मृत्यू झाला.

फ्रेड यांच्या मृत्यूनंतर सबवेची जबाबदारी त्यांच्या बहिणेने सांभाळली आणि तूर्तास सुनैन ह्या सबवेच्या सीईओ आहेत.

फ्रेडडेलुका यांना मिळालेल्या यशाचे मुख्य कारण म्हणजे त्यांची आपल्या कामाच्या प्रती असलेली आवड आणि त्यांचा मित्र पीटर होय.

फ्रेड यांनी आपले सबवे रेस्टोरेंट ला या ठिकाणी आण्यासाठी दिवसरात्र भरपूर मेहनत केली आहे.

परिणामस्वरूप आज सबवे पूर्ण जगात सर्वात मोठे रेस्टो रेंट चैन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here