“भारताच्या १० टॉप युटूबर्स विषयी”

Indian Top 10 Youtubers List

स्वतःमध्ये असलेल्या कला गुणांना वाव देऊन आपल्या आवडीचे काम करायला कोणाला आवडत नाही. YOU TUBE  हे एक माध्यम आहे जिथे जगाला आपण आपल्या मध्ये असणाऱ्या कलेला दाखवू शकतो.

आज पर्यंत बर्याच लोकांनी या गोष्टीचा वापर करुन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि YOU TUBE च्या दुनियेत काही भारतीय आहेत ज्यांनी आपल्या कलेमुळे एक वेगळीच प्रसिद्धी मिळवली आहे.

आज भारतामध्ये त्यांचे लाखो-करोडो फॅन्स आहेत, तर चला जाणून घेवूया त्या सर्वांची नावे.

“भारताच्या १० टॉप युटूबर्स विषयी” – Top 10 Youtubers in India

Top 10 Youtubers in India

१०) विद्या अय्यर – Vidya Iyer

विद्या अय्यर यांचा जन्म २६ सप्टेंबर १९९० मध्ये चेन्नई ला झाला होता, आता त्या अमेरिकेत वास्तवास आहेत.

आजच्या दिवसात त्यांचे YOU TUBE वर ६.४५ मिलियन सब्स्क्रायबर आहेत.

विद्या अय्यर ह्यांनी त्यांच्या मध्ये असलेल्या कलेला वाव दिली आणि त्यांनी त्यांचे प्रोफेशन सोडून संगीत निवडले आणि आज त्या भारतीय YOU TUBE च्या दुनियेतल्या सफल YOU TUBER आहेत.  त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षी पासूनच गाणे म्हणण्यास सुरुवात केली होते. आज त्यांच्या

YOU TUBE चॅनेल वर करोडो व्हुव आहेत.

९) हर्ष बेनिवाल –Harsh Beniwal

हर्ष बेनिवाल यांचा जन्म 13 फेब्रुवारी १९९६ ला दिल्ली मध्ये झाला. त्यांना सुरुवातीपासून च अभिनय करण्याची आवड होती. त्यांनी २०१५ मध्ये स्वतःच YOU TUBE  चॅनेल सुरु केले.

त्यांनतर लोकांमध्ये त्यांच्या कलेला लोकप्रियता मिळाली. त्यांचे YOU TUBE  वर ७.२९ मिलियन सब्स्क्रायबर आहेत. आणि सोबतच करोडो व्हुव सुद्धा आहेत.

८) निशा मधुलिका – Nisha Madhulika

वयाच्या ५० व्या वर्षी स्वतःच YOU TUBE  चॅनेल सुरु करून आज लाखो लोग ज्यांच्या टिप्स घेऊन पदार्थ बनवतात.

अश्या ६१ वर्षाच्या निशा मधुलिका ह्या उत्तर प्रदेशच्या राहणाऱ्या आहेत, त्यांनी स्वतःच्या नावानेच आपले YOU TUBE  चॅनेल सुरु केलेले आहे.

आज त्यांच्या YOU TUBE  चॅनेल वर ८.१३ मिलियन सब्स्क्रायबर आहेत. आणि सोबतच करोडो व्हुव सुद्धा आहेत.

७) अजेय नागर – Ajey Nagar

अजेय नागर यांचा जन्म १२ जुन १९९९ फरीदाबाद हरियाणा मध्ये झाला. अजेय चे “CARRY MINATI” नावाचे YOU TUBE  चॅनेल आहे. त्यांनी YOU TUBE  वर तीन चॅनेल सुरु केलेले आहे. त्यापैकी सर्वात जास्त सब्स्क्रायबर हे “CARRY MINATI” या चॅनेल वर आहेत.

एखाद्या वायरल विडीवो वर प्रतिक्रिया तसेच गेम्स या सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याचे त्यांचे चॅनेल आहे. त्या चॅनेल वर ९.५४ मिलियन सब्स्क्रायबर आहेत. कमी वयामध्ये चांगली प्रगती करणाऱ्यांपैकी अजेय नागर हे एक YOU TUBER आहेत.

६) डॉ. विवेक बिंद्रा – Dr. Vivek Bindra

विवेक बिंद्रा यांचा जन्म ५ एप्रिल १९७८ मध्ये दिल्ली येथे झालेला आहे. आज ते २५ पेक्षा जास्त देशातील लोकांना व्यवसायाचे प्रशिक्षण तसेच प्रोत्साहन देत आहेत. त्यांचे YOU TUBE वर असणाऱ्या चॅनेल द्वारा ते लोकांना विडीओ च्या माध्यमातून प्रेरित करण्याचे काम करत आहेत.

त्यांचे १०.८ मिलियन सब्स्क्रायबर आहेत, तसेच त्यांच्या प्रत्येक विडीओ वर लाखो करोडो व्हुव आहेत.

आपल्याला जर व्यवसायाविषयी मार्गदर्शन हवे असेल तर आपण त्यांच्या चॅनेल ला भेट देऊ शकता.

५) संदीप माहेश्वरी  – Sandeep Maheshwari

आपल्या प्रभावी बोलण्याने सर्वांना प्रोत्साहित करणारे संदीप माहेश्वरी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८० ला  दिल्ली मध्ये झाला.

त्यांच्या जीवनात आलेल्या अपयशा पासून शिकून ते लोकांना प्रेरित करण्याचे काम करत आहेत. ते हि कोणतीही रक्कम न घेता.

बरेच लोकांच्या जीवनात त्यांच्या प्रोत्साहित बोलण्याने एक बदल घडून येत आहे.

भारतातील नंबर एक प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तींमधील एक संदीप माहेश्वरी.

यांचे एकूण १३.५ मिलियन सब्स्क्रायबर आहेत,  त्यांची एक वेगळी गोष्ट म्हणजे ते YOU TUBE द्वारे येणाऱ्या पैशांना ते स्वीकारत नाहीत, आज पर्यंत लाखो लोक त्यांच्या पासून प्रेरित होऊन आपले जीवन व्यतीत करत आहेत.

४)गौरव चौधरी – Gaurav Chaudhary

गौरव चौधरी यांचा जन्म ७ मे १९९१ मध्ये राजस्थान मधील अजमेर येथे झालेला आहे. आता ते दुबई ला त्यांच शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिथे वास्तवास आहेत.

त्यांचे YOU TUBE वर टेक्निकल गुरुजी नावाचे चॅनेल आहे. त्या चॅनेल वर त्यांचे १५.१ मिलियन सब्स्क्रायबर आहेत.

ते त्यांच्या चॅनेल द्वारे टेक्निकल गोष्टींशी माहिती लोकांसोबत शेयर करतात. त्यांचे YOU TUBE वर आणखी एक चॅनेल आहे, त्यामध्ये ते त्यांचे प्रवासाचे विडीओ लोकांसोबत शेयर करतात. आणि आज भारतातील ते चवथ्या क्रमांकाचे सर्वात प्रसिध्द युटूबर आहेत.

३) आशिष चंचलानी – Ashish Chanchlani

आशिष चंचलानी यांचा जन्म मुंबई च्या उल्हास नगर मध्ये ७ नोव्हेंबर १९९३ ला झाला आहे.

त्यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी त्यांचे सिविल इंजीनीरिंग चे शिक्षण मधेच सोडले.

आणि अभिनयाच्या क्षेत्रात आपले पाउल पुढे केले. त्यांनी त्यांच्या YOU TUBE चॅनेल ची सुरुवात २००९ मधेच केली होती.

आज त्यांच्या YOU TUBE  चॅनेल ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. YOU TUBE वर त्यांचे १५.८ मिलियन सब्स्क्रायबर आहेत. त्यांच्या विडीओ मध्ये गमतीदार गोष्टींचा समावेश असतो.

२) भुवन बाम – Bhuvan Bam

भुवन बाम यांचा जन्म आपल्या देशाची राजधानी दिल्ली मध्ये २२ जानेवारी १९९४ ला झाला आहे.

भुवन बाम हे भारतातील पहिले YOU TUBE स्टार आहेत, ज्यांचे सर्वात पहिले YOU TUBE वर १० मिलीयन सब्स्क्रायबर झाले होते, आता त्यांचे YOU TUBE वर १६.८ मिलियन सब्स्क्रायबर आहेत, तसेच त्यांनी स्वतःच्या YOU TUBE  चॅनेल ची सुरुवात २०१५ मध्येच केली होती.

ते एक चांगले संगीतकार, गायक आणि गीतकार आहेत. त्यांच्या YOU TUBE चॅनेल चे नाव BB KI VINES असे आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना फिल्मफेयर चा बेस्ट शोर्ट फिल्म अवार्ड सुद्धा मिळाला आहे.

१) अमित भडाना  –  Amit Bhadana

अमित भडाना यांचा जन्म हरियाणाच्या फरीदाबाद येथे ७ सप्टेंबर १९९१ ला झाला आहे. ते YOU TUBE वर मनोरंजन, सामाजिक, तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारे विडीओ बनवतात.

अमित भडाना यांचे YOU TUBE वर १८.३ मिलियन सब्स्क्रायबर आहेत. आणि ते भारतातील पहिले YOU TUBE स्टार आहेत ज्यांचे सर्वात आधी १५ मिलियन सब्स्क्रायबर पूर्ण झाले होते.

ते अक्षय कुमार आणि अमीर खान यांना त्यांच्या जीवनातील आदर्श व्यक्तिमत्व मानतात.

आज त्यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर संपूर्ण भारतातून YOU TUBE  च्या दुनियेत स्वतःला नंबर एकच्या जागेवर आणून ठेवले.

आजच्या लेखात आपण पाहिले भारतातील YOU TUBE च्या दुनियेतल्या स्टार्स लोकांविषयी थोडक्यात माहिती,

अशा करतो आपल्याला या लेखाद्वारे भारतातील सर्वात प्रसिध्द YOU TUBE  स्टार्स च्या जीवनाविषयी माहिती झाले असेल.

आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

आणि  आमच्या majhimarathi.com ला अवश्य भेट द्या.

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here