कासवाची संपूर्ण माहिती

Kasav chi Mahiti

मला वाटतं, असा एकही व्यक्ती नसेल की ज्याने आपल्या बालपणात ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली नसेल, जर आपण ऐकलेली असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असेल की त्यामध्ये काय होते? जर कोणी ऐकली नसेल तर मी थोडक्यात सांगेल की ससा आणि कासव यांच्यात एक दिवस धावण्याची शर्यत लागते. आणि या शर्यतीत जिंकतो कासव. ससा ही शर्यत हरतो.

पण या गोष्टी ची आठवण द्यायचे एकच कारण आहे की आजच्या लेखात आपण जो ती शर्यत जिंकतो त्या कासवाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत, कासवांविषयी थोडक्यात बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर चिंता करू नका आपल्याला माहिती नसेल तर, आपण या लेखात कासवा विषयी थोडक्यात माहिती पाहूया.. तर चला पाहूया कासवांविषयी थोडक्यात माहिती.

कासवाची संपूर्ण माहिती – Tortoise Information in Marathi

Tortoise Information in Marathi
Tortoise Information in Marathi
हिंदी नाव: कछुवा
शास्त्रीय नाव: Testudinidae

कासवाला चार पाय, दोन डोळे, एक छोटी शेपटी असते. कासवाची त्वचा कोरडी असते. याच्या शरीरावर टणक असे कठीण कवच असते. कासवाला छोटी मान असते.

डोक्याचा आकार चपटा व त्रिकोणी असतो, कासवाचे पुढील पाय मोठे असतात.

कासवाच्या पायांना बोटे असतात. त्यांमध्ये पातळ पडदा असतो.

रंग: कासवाचा रंग काळपट राखाडी असतो.

अन्न : जमिनीतील किडे, कीटक, पाण्यातील किडे, कीटक गांडूळ असे, कासवाचे अन्न असते.

निवासस्थान : कासव हे पाण्यात व नदीच्या तलावाच्या काठावर राहते.

इतर माहिती : कासवाला असणाऱ्या बोटांमधील पडद्याचा उपयोग कासव पाण्यात असताना पोहण्यासाठी करतो.

हा प्राणी फूप्पसाच्या साहाय्याने श्वसन करतो. कासव हा प्राणी जमिनीवर गतीने चालतो.

कासव या प्राण्याला मंदिराच्या गाभाऱ्यात पूजनीय स्थान मिळाले आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात पितळेचे किंवा दगडाचे कासव असते नदीकाठी, तळ्याच्या तलावाच्या, समुद्राच्या काठी जमिनीत थोडासा खड्डा खणून त्यात मादी कासव आपली अंडी घालते.

एकाच वेळी मादी कासव एक किंवा अनेक अंडी घालतात. सर्वसाधारणपणे कासवाची वयोमर्यादा ८० ते ९० वर्षे असते.

कासव या प्राण्याची हाडे मऊ व लवचिक असतात.

आपल्या जीवाला धोका असे जाणवल्यावर कासव आपल्या अंगावरील कवचात हात, पाय, शेपटी व मान आत घेतो.

Kasav Information in Marathi

आपल्याला सर्वांना माहिती असेलच की पृथ्वीवर सर्वात जास्त दिवस जगणारा प्राणी हा कासव आहे. याचे वय १५० वर्ष – २०० वर्ष असते.

म्हणजे आपण मनुष्य असून सुध्दा आपण आपल्या वयाची शंभरी सुध्दा गाठू शकत नाही आणि कासव सरळ २०० वर्ष.

कमाल आहे बुवा! काही लोकांचे असे मत आहे की समुद्र मंथनाच्या वेळेस भगवान विष्णूंनी कासवाच्या अवतारात येऊन समुद्र मंथन करण्यास मदत केली होती त्यामुळे कासवाचे जीवन एवढे जास्त आहे.

कासव हा पृथ्वीवर आताचा प्राणी नाही आहेत हा या पृथ्वीवर करोडो वर्षांपासून आहे.

एवढेच नाही तर पाण्यातील मासे, मगर यांच्या आधी कासव पृथ्वीवर होते,

हे सिध्द झालेलं आहे. काही वर्षाच्या आधी शास्त्रज्ञांना १२ करोड वर्षांपूर्वीचे कासवांचे जीवाश्म सापडले होते.

यावरून हे सिध्द होते की कासवांचे अस्तित्व पृथ्वीवर खूप दिवसांपूर्वी पासून आहे.

पृथ्वीवर कासवांच्या एकूण ३५० प्रजाती आढळतात पण यापैकी बऱ्याच प्रजाती आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

कासव हा असा प्राणी आहे जो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवर सुध्दा राहू शकतो, यालाच आपण उभयचर असे म्हणतो.

अंटार्क्टिका सोडलं तर जगात प्रत्येक ठिकाणी कासव पाहायला मिळतात.

पृथ्वीवर असणाऱ्या बहुतेक प्राण्यांना त्यांचे अन्न चावण्यासाठी दात असतात पण कासव असा प्राणी आहे ज्याला दात नाही आहेत,

कासवाच्या तोंडामध्ये एक पट्टी सारखी हड्डी असते, आणि याचा वापर ते त्यांचे जेवण चावण्यासाठी करतात.

कासवांमध्ये एक आणखी चांगली गोष्ट म्हणजे ते त्यांचे शरीर आकुंचित करू शकतात म्हणजेच त्यांचे पाय आणि डोके संकटाच्या वेळी ते आतमध्ये घेऊन संकटांचा सामना करू शकतात.

तसे पाहता कासव हा खूप हळू चालणाऱ्या प्राण्यांमध्ये सुध्दा अग्रेसर आहे, एका तासाला कासव २७० मीटर अंतर पार करतो. म्हणजेच एका दिवसात जास्तीत जास्त ७ किलोमीटर.

आतापर्यंत सर्वात जास्त वेगाने धावणाऱ्या कासवाची गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे, त्या कासवाने एका तासाला एक किलोमीटर अंतर पार केले आहे.

आणि हा आतापर्यंतचा कासवांचा सर्वात जास्त वेग नोंदवल्या गेला आहे.

कासवांची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे शरीर हे खूप मजबूत अश्या कवचाने बनलेलं असतं,

एवढं मजबूत की कोणीही सहजरित्या त्याला नुकसान पोहचवू शकत नाही. आपण यावरून चांगल्या प्रकारे समजू शकता की त्या कवचाला बंदुकीची गोळी सुध्दा काहीही करू शकत नाही.

तर ही होती कासवांविषयी थोडक्यात माहिती बऱ्याच लोकांना माहिती असेलही पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही माहिती नवीन असावी.

आशा करतो लिहिलेली ही माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला लिहिलेली माहिती आवडली असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here