आपण पाहातो की आज पर्यंत जगभरात नेहमीच नवनवीन शोध लागत आले आहेत सध्या सुध्दा ब.याच बाबींवर संशोधन सुरू आहे, नवनवीन शोध पाहुन आपल्याला देखील आश्चर्य झाल्याशिवाय राहात नाही आणि पुढे देखील नवेनवे शोध लागत राहातील आणि आपल्याला सुखद आश्चर्याचे धक्के बसत राहातील.
खरतर असे म्हंटल्या जाते की “गरज ही शोधाची जननी आहे” आणि ते तंतोतंत खरे देखील आहे कारण गरज उत्पन्न झाल्याशिवाय आपण त्या गोष्टीचा शोध घेण्याचा ध्यास कसा घेउ? बरेचसे शोध लागल्याने माणसाचं आयुष्य बदलतच गेलं, जगणं अधिकाधीक सुसहय होत गेलं. आज आपण नव्याने लागलेल्या शोधांकडे आ वासुन बघत राहातो आणि मनातल्या मनात शब्द बाहेर पडतात “अरेच्चा आता असही व्हायला लागलं? आणि आपल्या आश्चर्याला पारावार उरत नाही.
रेडीओचा जेव्हां शोध लागला तेव्हां आजही त्यावेळेसचे लोक आपले अनुभव सांगतांना म्हणतात की आम्हाला असं वाटायचं की ईतक्या छोटया रेडीओमधे लोक गेले कसे असतील? त्याचप्रमाणे पुढे टि व्ही आला आणि आपण आनंदीत झालो पण ज्यावेळेस टिव्ही ची निर्मीती झाली तेव्हां टिव्ही घेणं प्रत्येकाला मुळीच परवडणारं नव्हतं. घरात त्यावेळी टिव्ही असणं हे श्रीमंतीचं लक्षण मानल्या गेलं.
असा हा टिव्ही घराघरात पोहोचला कसा आणि त्याचा निर्माता कोण याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत.
“टिव्ही” चा शोध कसा लागला आणि त्याचा निर्माता कोण? – TV cha Shodh Koni Lavla
जर तुम्ही 90 च्या दशकातले असाल तर तुम्हाला कल्पना असेल की सुरूवातीला टिव्ही घेणे ही प्रत्येकाच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती.
आपण राहात असलेल्या परिसरात एका किंवा दोघांकडे टिव्ही असायचा आणि संपुर्ण परिसरातली मंडळी त्यांच्या घरी टिव्ही बघण्याकरता जमा व्हायची. पुर्वी टिव्ही वर एकच डीडी नॅशनल चॅनल असायचं आणि तेच घराघरातुन बघीतल्या जायचं.
टिव्ही अर्थात टेलिव्हिजन बनवण्यात अनेक वैज्ञानिकांचा हात आहे. काही काही आविष्कार असे असतात की त्याची निर्मीती करण्यात कुणा एकाचा हात नसतो टिव्ही च्या बाबतीत ही तसेच काहीसे आहे कारण 90 च्या दशकात अनेक वैज्ञानिक यावर रिसर्च करत होते परंतु जर असं कुणी विचारलं की संपुर्ण परफेक्ट टिव्ही ची निर्मीती कुणी केली तर त्याचे श्रेय आपल्याला “फिलो फॅरेन्सवर्थ आणि जॉन लॉगी बेयर्ड” यांना दयावे लागेल.
90 च्या सुरूवातीला वैज्ञानिक असे उपकरण बनवण्यात उत्सुक होते की ज्यात आवाजासोबत चित्र देखील दिसु शकेल पण त्यात त्यांना यश मिळत नव्हतं त्याच सुमारास फिलो देखील यावरच संशोधन करत होते त्यांना माहित होते की हे काम कसे करायचे आहे सर्वात आधी इमेज ला अर्थात फोटो ला समानांतर रेषेत तोडावे लागेल त्यानंतर त्याला धरून ठेवत इलेक्ट्रॉन च्या रूपात प्रकाशित करावे लागेल आणि त्यानंतर त्याला स्क्रिन वर दिसण्याकरता पुन्हा जोडावे लागेल! फिलो जवळ त्यासुमारास आवश्यक असणा.या यंत्रांची आणि संसाधनांची कमतरता होती आणि त्याच्याजवळ इतका पैसा देखील नव्हता की तो ते खरेदी करू शकेल त्याने त्याची कल्पना काही व्यापाऱ्याजवळ व्यक्त केली.
काही जण त्याच्या शोधावर पैसा लावण्यास देखील तयार झाले आणि 25 ऑगस्ट 1934 ला पहिल्यांदा कुण्या वैज्ञानिकाने प्रतिमेला स्क्रिनवर दाखवण्यात यश मिळवले पण फिलोने फक्त चित्र दाखवण्यात यश मिळवलं त्यात आवाज नव्हता.
“जॉन लॉगी बेयर्ड” हे ते नाव आहे ज्यांना पहिला टेलिव्हिजन बनवण्याचा मान मिळाला आहे कारण फिलो ने फक्त प्रतिमेला टेलिव्हिजन वर दाखवण्यात यश मिळवलं पण जॉन ने 1930 च्या सुमारास एक असा टिव्हि बनवला ज्यात चित्रासोबत आवाज देखील प्रकाशित केल्या जाउ शकेल.
यानंतर टेलिव्हिजन ने खुप लोकप्रियता मिळवली आणि यावर त्यानंतर अनेक वैज्ञानिकांनी काम केलं आणि याला अधिकाधीक चांगले करत गेले. तुम्ही स्वतः पाहु शकता की पुर्वी ब्लॅक अँड व्हाईट यायचा त्यानंतर कलर टिव्ही, पुढे एल सी डी आणि आता एल ई डी चा काळ आपण अनुभवतो आहोत.
यात आश्चर्य नाही की काही काळानंतर कागदासारखा टि व्ही आपण भिंतीवर चिटकवु आणि पाहू कारण आपण पाहात आलो आहोत की टि व्ही चा आकार दिवसेंदिवस कमीच होत गेला, संशोधनाअंती कमी जागा व्यापणारा आणि मोठया स्क्रिन चा टि व्ही उदयाला आला आहे.
टेलिव्हिजन च्या बाबतीत आपल्याला आवडतील अश्या काही गोष्टी
- एक भारतीय दिवसातुन जवळपास 7 तास टिव्हि पाहातो
- दुरदर्शन च्या पहिल्या कार्यक्रमाचे प्रसारण 1959 ला सुरू झाले
- आज प्रत्येक घरात टिव्हि आहे पण सुरूवातीच्या काळात अवघ्या दिल्लीत केवळ 18 टिव्हि होते.
- सर्वात आधी टिव्ही रिमोट 1950 ला आला
- जगातला पहिला कलर टिव्हि 1954 ला आला.