गाड्यांच्या नंबर प्लेट वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? हे आहे त्यामागील कारण!

Types of Number Plates

असा एकही मनुष्य नसेल जो एकविसाव्या शतकात जगतोय, आणि त्याला चारचाकी वाहनाविषयी माहिती नसेल, काही महान लोकांनी तर भूतकाळात अश्या भविष्यवाणी केलेल्या आहेत कि एकविसावे शतक हे संपूर्ण तंत्रज्ञानाचे असणार, आणि ते आपल्याला आता खरं होताना दिसतय, पहा ना कधीकाळी मैल अंतरावर पायी जावे लागायचे आणि आता एका बटनावर आपल्याकडे वाहन येते आणि आपण पाहिजे तेथे जाऊ सुद्धा शकतो,

हेच आपल्या डोळ्या समोर खरे होताना आपल्याला आता भविष्यात दिसणार आहे, एलोन मस्क यांनी अश्या कारची निर्मिती आता केलीच आहे, तरीही भविष्यात यापेक्षाही अधिक तंत्रज्ञान आपल्याला पहायला मिळणार आहेच, आपण आजच्या लेखात याच चार चाकी वाहनांवर ज्या नंबर प्लेट राहतात त्या का असतात आणि कोणत्या नंबर प्लेट कोणासाठी असतात? ह्या सर्व बाबींना आपण आजच्या लेखात पाहणार आहोत तर चला पाहुया,

गाड्यांच्या नंबर प्लेट वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? हे आहे त्यामागील कारण! – Why Indian Vehicles have different Colour Number Plates

Types of Number Plates
Types of Number Plates

नंबर प्लेट चे वेगवेगळे प्रकार – Types of Number Plates

१) लाल रंगाची नंबर प्लेट – Red Number Plate

Red Number Plate
Red Number Plate

या प्रकारची नंबर प्लेट आपल्याला फक्त देशाचे राष्ट्रपती आणि वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल यांच्या वाहनांवर आपल्याला पाहायला मिळते. देशाच्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीमत्वांच्या वाहनांवर या रंगाची नंबर प्लेट आपल्याला पाहायला मिळते. पण तेच पंतप्रधानांच्या वाहनावर आपल्याला पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट पाहायला मिळते.

२) पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट – White Number Plate

White Number Plate
White Number Plate

या प्रकारची नंबर प्लेट आपल्याला वैयक्तिक असलेल्या वाहनांवर पाहायला मिळतात, आपण या वाहनांचा वापर कमर्शियल गोष्टींसाठी करू शकत नाही, हि नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असते आणि या प्लेटवर लिहिलेला नंबर हा काळ्या रंगामध्ये असतो. देशाच्या पंतप्रधानांच्या वाहनावर सुद्धा या रंगाची नंबर प्लेट आपल्याला पाहायला मिळते.

३) पिवळ्या रंगाची नंबर प्लेट – Yellow Number Plate

Yellow Number Plate
Yellow Number Plate

या प्रकारची नंबर प्लेट आपल्याला कमर्शियल वाहनांवर पाहायला मिळतात, या रंगाची नंबर प्लेट चा वापर आपल्याला प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पाहायला मिळते, जसे आपण ओला, उबर यांचा वापर करतो, किंवा बसेस, टॅक्सी, यावर सुद्धा आपल्याला याच प्रकारच्या प्लेट पाहायला मिळतात.

४) निळ्या रंगाची नंबर प्लेट – Blue Number Plate

Blue Number Plate
Blue Number Plate

 

या प्रकारची नंबर प्लेट आपल्याला परदेशातील प्रतिनिधी किंवा राजदूत यांच्या वाहनांवर पाहायला मिळते,या प्लेटवर पांढऱ्या रंगामध्ये नंबर लिहिलेला असतो. आणि सोबत ज्या देशाचे प्रतिनिधी त्या देशाचा कोड लिहिलेला असतो. आणि अशी वाहने फक्त आपल्याला विदेशातील प्रतिनिधी आणि राजदूत यांच्या वाहनांवर पाहायला मिळतात.

५) हिरव्या रंगाची नंबर प्लेट – Green Number Plate

Green Number Plate
Green Number Plate

या प्रकारची नंबर प्लेट आपल्याला इलेक्ट्रिक वाहनांवर पाहायला मिळते. ज्या वाहनांमधून शून्य उत्सर्जन होते अश्या वाहनांवर आपल्याला हिरव्या रंगाची नंबर प्लेट पाहायला मिळते. आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी या रंगाची प्लेट उपलब्ध असते.

६) बाण असलेली नंबर प्लेट – Arrow Number Plate

Arrow Number Plate
Arrow Number Plate

या प्रकारची नंबर प्लेट आपल्याला सैन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पाहायला मिळते. या प्रकारच्या नंबर प्लेट वर सुरुवातीला एका बाणाचा वापर केला जातो, त्यानंतर ते वाहन कोणत्या वर्षी विकत घेतलेले असते. सिरीयल नंबर नंतर समाप्त होणारे लेटर वाहनाचा क्लास दर्शवते.

७) काळ्या रंगाची नंबर प्लेट – Black Number Plate

Black Number Plate
Black Number Plate

या प्रकारची नंबर प्लेट असलेले वाहन कमर्शियल गोष्टींसाठी सुद्धा वापर केला जातो, या नंबर प्लेटवर पिवळ्या रंगाने नंबर लिहिलेला असतो, असे वाहन भाड्याने देऊन त्याचा वापर कमर्शियल गोष्टींसाठी सुद्धा बरेचदा केला जातो. या कारचा वापर करताना आपल्याला कमर्शियल ड्रायविंग लायसन्स नसले तरीहि चालतं.

तर अश्या प्रकारे वाहनांना वेगवेगळ्या रंगाच्या प्लेट पाहायला मिळतात, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच आणखी लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top