जगातील पाच आगळे वेगळे गावं, पहा काय वेगळ आहे या गावात

आपण जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टींची यादी याआधीही पाहिली आहेच, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच वेगळ्या आहेत, आणि या गोष्टिंपैकी आपण बरेचशा गोष्टी पाहिल्या सुद्धा आहेत,

आपल्या माझी मराठी साईट वर आपल्याला बरेचशा अनोख्या गोष्टींची माहिती झालेली असेल, आजही आपण आजच्या लेखात आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे, तो असा कि जगातील असेही बरेचशे ठिकाण आहेत कि त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.

आजच्या लेखात आपण जगातील असे काही पाच गावं पाहणार आहोत जे काहीतरी कारणासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत, आणि ते कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत ते आपण आज पाहूया,

तर चला जाणून घेवूया कोणते आहेत ते गाव.

जगातील पाच आगळे वेगळे गावं, पहा काय वेगळ आहे या गावात – Unique Villages

Unique Villages
Unique Villages

१) कुंग-फू विलेज.

कुंग-फू विलेज नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले चीनचे एक गाव आहे, हे गाव चीनच्या तिआंझु मध्ये आहे. या गावतील प्रत्येक नागरिक हा कुंग-फू शिकलेला आहे, म्हणून या गावाला कुंग-फू विलेज असे नाव पडले.

या गावाला जगभरातून बरेच लोक कुंग-फू शिकण्यासाठी येतात. आणि येथे येऊन कुंग-फू शिकतातही. या गावामध्ये लहानात लहान मुलाला सुद्धा कुंग-फू येतं. आणि ते कोणाशीही या कुंग-फू च्या भरवश्यावर लढू शकतात.

२) एकच किडनी असलेल्या लोकांचे गाव.

हे नेपाळ मधील होकसे नावाचे गाव आहे, या गावाला एकच किडनी असलेल्या लोकांचे गाव म्हटले जाते, या गावात प्रत्येक व्यक्ती हा एकाच किडनीवर जिवंत आहे. या गावातील लोकांनी आपली एक किडनी काढून विकली आहे,

या गावात साक्षर लोकांची कमी आहे, म्हणून काही लोकांनी या गावातील लोकांना असे सांगितले कि किडनी विका आणि पैसे घ्या, पैशांचा मोह दाखवून येथील लोकांना शरीरातील किडनी पुन्हा उगवणार असे सांगत लोकांच्या किडन्या काढून घेतल्या, तेव्हापासून या गावातील लोक फक्त एका किडनीवर जिवंत आहेत.

३) सडक चा रस्ता नसलेले गाव.

जगात असेही एक गाव आपल्याला पाहायला मिळते, जिथे एकही रस्ता नाही, आणि ते गाव नीदरलँड या देशात आहे. नेदरलँड्स मधील गीथर्न या गावात आपल्याला सडक असलेला एकही रस्ता पाहायला मिळत नाही.

रस्ता नसल्यामुळे या गावात कोणाकडे बाईक किंवा चार चाकी वाहन सुद्धा नाही, आता येथे रस्ता का नाही तर हे गाव पाण्याच्या वरती वसलेले आहे, च्यामुळे या गावात सगळीकडे पाणीच पाणी आहे लोकांना बाहेर कुठेही जायचे असेल तर ते नावेचा वापर करतात.

मग येथे रस्ता असण्याचे काही कारण नाही.या गावाला सुद्धा भेट देण्यासाठी तसेच या गावाचे सौंदर्य पाहण्यासाठी जगातून लोक येथे येतात.

४) निळा कलर असलेले गाव.

स्पेन मध्ये जुजकार नावाचे एक गाव आहे, जे पूर्णच्या पूर्ण निळा रंग गाव आहे, येथे प्रत्येकाचे घर हे निळ्या रंगाचे आहे, आता प्रत्येकाच्या घराला निळा रंग का दिल्या गेला, यामागे एक गोष्ट सांगितल्या जाते,

सोनी कंपनीला एक 3D चित्रपटाचे निर्माण करायचे होते तेव्हा त्यांनी या गावातील घरांना निळा रंग दिला होता, आणि तेथे त्या चित्रपटाचे निर्माण केले.

सोबतच हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. मग तेव्हापासून येथील घरांना निळाच रंग दिल्या जातो.आणि या अनोख्या गावाला पाहायला जगभरातून बरेचशे पर्यटक येतात.

५) सगळ्यात ओले असलेले गाव.

जगात सगळ्यात जास्त पाउस हा मेघालय मध्ये असलेल्या मावसिनराम गावामध्ये होतो, येथे पूर्ण वर्षात ३८.९ फुट पावसाची नोंद केल्या जाते. आणि या गावाला पृथ्वीवरचे सगळ्यात ओले गाव म्हणून ओळखल्या जाते.

येथील लोकांनी त्या वातावरणात राहण्यासाठी स्वतःला तयार केलेले आहे, येथील लोक बांबूने बनलेले रेनकोट नेहमी घातलेले असतात. कारण येथे कोणत्याही हवामानात पावसाची शक्यता असते.

तर असे आहेत जगातील काही आगळे वेगळे गाव, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top