मोबाईल मध्ये नॉन रिमूव्हल बॅटरी का बरं वापरतात?

New Phones with Removable Battery

वेळेनुसार मोबाईल सुध्दा बदलू लागलेत, सुरुवातीला मोबाइलचा शोध लागला होता तेव्हापासून तर आतापर्यंत मोबाईल मध्ये खूप फरक पाहायला मिळत आहे. बटनांपासून तर टच स्क्रीन पर्यंत. जस जशी वेळ बदलत आहे त्याप्रमाणे वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित होत आहे. आणि तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला प्रगती होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवीन फिचर नवीन डिझाईन नवीन मॉडेल प्रत्येक गोष्टीत बदल, तेच मोबाईल च्या क्षेत्रात सुध्दा, आपल्याला पाहायला मिळते.

नवीन स्मार्टफोन आपल्याला मार्केट मध्ये पहायला मिळतात. पण सुरुवातीला मोबाइल मध्ये रिमूव्हल बॅटरी चा वापर केल्या जात असे. पण आताच्या नवीन स्मार्टफोन मध्ये आपल्याला नॉन-रिमूव्हल बॅटरी चा वापर होताना दिसतो. तर बरेच जणांना हा प्रश्न पडला असेल की नॉन रिमूव्हल बॅटरी मोबाईल मध्ये लावण्यामागच काय कारण असेल, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की का नॉन रिमूव्हल बॅटरी चा वापर स्मार्टफोन मध्ये केला जातो. तर चला पाहूया..

म्हणून मोबाईल मध्ये नॉन रिमूव्हल बॅटरी वापरतात – Why Upcoming Phones with Removable Battery

New Phones with Removable Battery
Upcoming Phones with Removable Battery

स्मार्टफोन मध्ये नॉन रिमूव्हल बॅटरी बसविण्याच्या मागे अनेक कारणे आहेत, पहिले जेव्हा आपण मोबाईल चा वापर करत होतो तेव्हा मोबाईल ला काही प्रॉब्लेम आला (हँग वगैरे पडल्यास) तर आपण लगेच मोबाईल ची बॅटरी काढून त्याला ठीक करत होतो, आणि जवळ जवळ आपला प्रॉब्लेम दूर होत होता. पण आताच्या आलेल्या मोबाईल मधील नॉन रिमूव्हल बॅटरी मुळे आपल्याला पावर स्टार्ट च्या बटनावर अवलंबून राहावे लागते.

नॉन रिमूव्हल बॅटरी मोबाईल मध्ये लावण्याचे बरेच असे कारणे आहेत. जेव्हा एखाद्या ग्राहकाच्या मोबाईल ची बॅटरी खराब होत होती तेव्हा ग्राहक बाजारात जाऊन त्या बॅटरी ला बदलवून घेत असत आणि बाजारातील बॅटरी खराब असल्याने कधी कधी मोबाईल चा विस्फोट होत असे आणि अश्या घटना आपल्या सुध्दा निदर्शनात आल्या असतील. आणि अश्या घटनांमुळे कंपनीचे नाव खराब होत असे.

यावर कंपनीने उपाय काढत मोबाईल मध्ये नॉन रिमूव्हल बॅटरी देणे सुरू केले, आणि नॉन रिमूव्हल बॅटरी खराब तर होतच नाही पण खराब झालीच तर ग्राहक त्या बॅटरी ला बदलण्यासाठी कंपनीच्या सर्व्हिस सेंटर ला जातील आणि त्यामुळे ग्राहकांना योग्य ती सर्व्हिस मिळेल आणि त्यामुळे कंपनीला पण थोडासा प्रॉफिट पण मिळतो.

आजकालच्या स्मार्टफोन मध्ये नॉन रिमूव्हल बॅटरी असल्याने त्यांची साईज ही थोडीशी स्लिम येत आहे सोबतच याचा असा एक फायदा आहे की त्यामुळे मोबाईल ची फुटण्याची संभाव्यता कमी होते.

तर आता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती झाले असेल की का मोबाईल मध्ये नॉन रीमुव्हल बॅटरी वापरली जाते, आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top