वाळ्याची माहिती आणि फायदे

Vala Plant

आपल्याला सर्वांना परिचित व उन्हाळ्यात हवीशी वाटणारी वनस्पती म्हणजे वाळा होय, वाळा या वनस्पतीमुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तसेच हे वाळा माठात टाकल्याने पानी थंड आणि चवीला छान अस लागत. याचा औषधी म्हणून सुद्धा वापर केला जातो. तशी वाळ्याची बरीच माहिती आहे आणि ते आता आपण समोर पाहणार आहोत.

वाळ्याची माहिती आणि फायदे – Vala Plant Information in Marathi

Vala Plant

शास्त्रीय नाव : (व्हेटिवेरिया जिजेनिआयडिस्) Vetiveria zizanoides
इंग्रजी नाव : (व्हेटिव्हर्) Vetiver

वाळा हा दिसण्यास गवतासारखा असतो. याची गवतासारखी बेटे असतात, याचे कांडे हे सर्वसाधारणपणे १ ते २ मीटर उंच वाढते. त्याला एक प्रकारचा असा छान सुगंध येतो. या वनस्पतीच्या मुळ्या उपयोगात आणतात. याची पाने लांब, वरच्या बाजूने गुळगुळीत व पृष्ठभागावर लव असणारी अशी असतात. या पात्यांच्या मधोमध एक दांडा उगवतो; त्याला फुले येतात. वर्षा ऋतूत ही फुले येतात. आणि नंतर फळे येतात.

वाळ्याची लागवड छोटा ही नागपूर, तसेच भारताच्या दक्षिण भागात आणि नदयांच्या काठी व पाणी असणाऱ्या भागात केली जाते.

वाळ्याचे औषधी उपयोग – Vala Plant Benefits

चला तर पाहूया याचे औषधी उपयोग.

  1. वाळा हा बाहेरून वापरण्यासाठी आणि पोटातून घेण्यासाठी औषध म्हणून वापरला जातो.
  2. शरीरातील दाह कमी करण्यासाठी तसेच त्वचेचा रंग उजळ होण्यासाठी याच्या लेपाचा वापर केला जातो.
  3. घरातील उष्णता उन्हाळ्यात कमी करण्यासाठी वाळ्याचे पडदे लावतात.
  4. वाळा, नागरमोथा व धने यांचे चूर्ण थंड पाण्यात कालवून तो लेप उन्हाळ्यात घामोळ्या आल्या असतील तर त्यावर लावला जातो, तसेच उन्हाळ्यात शरीराची आग होत असेल तर वाळा व चंदन यांचा लेप करून तो शरीराला लावावा.
  5. मळमळ, अजीर्ण यावर पाचक म्हणून वाळा वापरला जातो. तसेच जुलाब, उलटी होत असेल तर वाळा, मध व खडीसाखर यांचे मिश्रण देतात.
  6. धने, वाळा, नागरमोथा, बेल, लाजाळू व सुंठ यांचा काढा मधाबरोबर घेतल्यास अपचन, जुलाब, ज्वर अशा रोगांना आराम मिळतो. त्याचप्रमाणे कफनाशक म्हणून वाळा वापरला जातो.
  7. दमा, उचकी व खोकला या विकारांत वाळ्याचे चूर्ण वापरतात.
  8. वाळ्यातील जो कडू रस असतो त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
  9. काही प्रसूत स्त्रियांच्या दुधामध्ये दोष असतो, तसेच दुधाचे प्रमाण कमी असते. तर अशा वेळी वाळा दधातील दोष दूर करण्याचल दूधाचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो.
  10. ज्येष्ठमध, वाळा, मनुका व चंदन या काढा मध व साखर यांच्याबरोबर घेतल्यास रक्तामधील दोष नाहीसे होण्यास मदत होते.
  11. उन्हाळ्यात उन्हाळी लागणे, अंगाची आग होणे, पित्त होणे यावर वाळ्याचे सरबत प्यावे ज्यानेकरून आराम मिळतो. तसेच उन्हाळ्यातील होणाऱ्या मूत्रविकारात वाळा उपयोगी पडतो.
  12. तसेच आयुर्वेदातसुद्धा वाळ्याचा उपयोग केला जातो.
  13. वाळा व पिंपळमूळ यांचे समभाग चूर्ण गाईच्या तुपातून घेतल्यास हृदयरोगसुद्धा कमी होतो.

विविध उपयोग :

उन्हाळ्यात वाळ्याचा छोटा गठठा करून माठात टाकतात. त्यामुळे पाण्याला सुगंध येतो, आणि त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी छान लागते.

वाळ्याच्या मुळ्या उपयोगी असतात याला एक प्रकारचा सुगंध येतो. वाळा हा शरीरातील उष्णता कमी करणारा म्हणून ओळखला जातो. वाळा चवीने थोडा पण गोड रसांचा आहे. अश्या प्रकारे आपण येथे वाळा विषयी बरीच माहिती पहिली आहे.

वाळा विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ About Vala Plant

Q. वाळ्याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

उत्तर – वाळ्याचे शास्त्रीय नाव (व्हेटिवेरिया जिजेनिआयडिस्) Vetiveria zizanoides हे आहे.

Q. वाळ्याची लागवड ही कशी केली जाते ?

उत्तर – वाळ्याची लागवड छोटा नागपूर, भारताच्या दक्षिण भागात नदयांच्या काठी व पाणी असणाऱ्या भागात केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top