जगातील सर्वात काळा पदार्थ कोणता? नक्की वाचा

Darkest Material in the World

आपल्या लेखांमध्ये आपण बरेचशा अश्या गोष्टी पाहिल्या आहेत ज्या गोष्टींची, वस्तूंची, पदार्थांची जगामधून एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. त्यांच्या मध्ये असलेल्या विशेषतांमुळे. मग ते लाकूड असो, की जगातील सर्वात महाग पदार्थ असो. याचप्रकारे आजच्या लेखात सुध्दा आपण पाहणार आहोत की संपूर्ण जगातून सर्वात जास्त काळा रंग असलेला पदार्थ कोणता आहे.

आणि या सर्वात जास्त काळ्या रंगाच्या पदार्थाची निर्मिती केव्हा झाली याविषयी सुध्दा थोडीशी माहिती या लेखातून पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या हा छोटासा लेख आवडणार तर चला पाहूया. जगातील सर्वात काळ्या रंगाचा पदार्थ.

वेंटाब्लॅक हा जगातील गर्द काळ्या रंगाचा पदार्थ – Vantablack Darkest Material in the World

Vantablack Darkest Material in the World
Vantablack Darkest Material in the World

जर आपण काही लोकांचे काळ्या रंगाविषयी मत विचारले तर आपल्याला नेहमी ऐकायला मिळाले असेलच की काळा रंग हा अशुभ असतो, काळ्या रंगाचे कपडे आपण शुभप्रसंगी घातले तर लोक लगेच बोलतात, हे काय काळ्या रंगाचे कपडे दुसऱ्या कुठल्या रंगाचे कपडे नव्हते कि काय तुला!

म्हणजे एक प्रकारे काळा रंग हा अशुभ रंग आहे हे काही लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे. पण मग विचार पडतो की जर काळा रंग अशुभ आहे, तर शाळेतील ज्या फलकांवर विध्यार्थ्यांना शिकविल्या जात, त्या फलकांचा रंग सुध्दा काळाच असतो, आणि याच फलकांवर शिकून बरेच लोकांचं भविष्य उज्वल झाले आहे, मग काळा रंग अशुभ आणि इतर दुसरा रंग शुभ कसा काय?

पण जाऊद्या आपला तो विषय नाहीच! आपण सुध्दा बऱ्याच अश्या गोष्टी आपल्या आजूबाजूला ऐकलेल्या असतील, आपल्याला माहिती आहे का, काळ्या रंगाचा फायदा सुध्दा आहे! कसा आता आपण म्हणणार, तर काळ्या रंगाचा फायदा असा आहे की हा काळा रंग उष्णतेला शोषून घेणारा आहे, म्हणून थंडीच्या दिवसांत या रंगाच्या कपड्यांचा वापर आपण करू शकता, शोषून घेतलेली उष्णता बाहेर हा रंग जाऊ देत नाही. आणि गर्मीला शरीरात टिकवुन ठेवण्याचे कार्य करते.

काळ्या रंगाला जरीही अशुभ मानल्या जात असेल तरीही हा काळा रंग बरेच लोकांच्या पसंतीचा रंग आहे. सोबतच काळ्या रंगाला बाकी रंगांपेक्षा विशेष महत्व मिळते, कारण काळा रंग हा सर्व रंगांचे मिश्रण करून बनलेला रंग आहे. आपण आजपर्यंत काळ्या रंगाच्या अनेक वस्तू, किंवा पदार्थ पाहिले असतील, जसे लाकडी कोळसा, दगडी कोळसा, इत्यादि. पण काळ्या रंगाचा सुध्दा असा एक पदार्थ आहे जो जगातून सर्वात जास्त काळा आहे. एवढा काळा की प्रकाशाला जवळजवळ ९९ टक्के शोषून घेतो. या वर आपण विचार करू शकणार की हा पदार्थ किती काळा असेल.

जगातील सर्वात काळ्या रंगाच्या पदार्थाला “वेंटाब्लॅक” म्हणून ओळखले जाते. या पदार्थाला २०१४ मध्ये नव्या प्रकारे निर्माण केल्या गेले. या पदार्थाला निर्माण करणारी नॅनोटेक कंपनी सरे नॅनोसिस्टम होती, या कंपनीने या पदार्थाला आता बाजारात स्प्रे च्या रुपात सुध्दा लाँच केलेलं आहे. आपल्या माहितीसाठी हा पदार्थ कार्बन च्या नॅनोट्यूब पासून बनवलेला एक पदार्थ आहे.

या पदार्थामध्ये एवढ्या नॅनोट्युब चा वापर केला जातो की यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रकाश या पदार्थावर राहू शकणार. आणि यामुळेच संपूर्ण पदार्थावर काळा रंग दिसून येतो. काही वर्षांपूर्वी बीएमडब्ल्यू  (Vantablack BMW) च्या एका गाडीला या पदार्थाचा उपयोग करून बनविल्या गेली होती, आणि ही जगातील सर्वात आधीची काळी कार बनली होती.

पदार्थाच्या नॅनोट्युब ची जेवढी जाडी जास्त असेल तेवढा जास्त पदार्थ काळा दिसतो. या पदार्थाची जाडी २० नॅनोमिटर पेक्षा जास्त असते म्हणजेच मानवी केसापेक्षा ३५०० पटीने जाड असते. म्हणजे आपण विचार करू शकता, की किती तरी पटीने हा पदार्थ काळा असणार बाकी काळ्या रंगांपेक्षा.

तर आशा करतो हा लेख आपल्याला जगातील काळ्या रंगा विषयी माहिती देणारा ठरला असेल, आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अध्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here