दिपावली सणाचा पहिला दिवस “वसुबारस” – Vasubaras In Marathi

Vasubaras In Marathi

हिंदु संस्कृतीत पुर्ण वर्षभर सणांची रेलचेल असते. हा सण होत नाही तर दुसरा दत्त म्हणुन पुढे उभाच असतो. चैत्रातल्या गुढीपाडव्यापासुन सुरू होणाऱ्या सणांची ही मालिका फाल्गुनातल्या होळी रंगपंचमीने संपते न् संपते तोच पुन्हा चैत्र गुढी उभारायला तयार !

या सणांमधे सणांचा राजा म्हणुन ज्या सणाची ओळख आहे तो म्हणजे दिपावली !

मुख्यत्वे पाच दिवसांचा जरी हा सण समजला जात असला तरीदेखील या सणाचे आगमन होते ते वसुबारस या दिवसानेच !

दिपावली सणाचा पहिला दिवस “वसुबारस” – Vasubaras In Marathi

Vasubaras Information in Marathi

वसुबारस सणाबद्दल संपूर्ण माहिती – Vasubaras Information In Marathi

वुसबारस… गाय गोऱ्याची बारस म्हणुन देखील ओळखला जातो अश्विन कृष्ण व्दादशीला येणारा हा दिवस गोवत्स व्दादशी म्हणुन देखील ओळखतात.

वसुबारस हा दिवस साजरा करण्यामागे एक पुराणकथा सांगीतली जाते.

ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी त्यातुन पाच कामधेनुंची उत्पत्ती झाली होती. या कामधेनुंमधे नंदा नावाची एक कामधेनु होती तीला उद्देशुन वसुबारस हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

असं म्हणतात की मानवाच्या जन्मोजन्मीच्या ईच्छा पुर्ण व्हाव्यात आणि गायीच्या अंगावर जेवढे केस आहेत तितकी वर्ष स्वर्गात वास्तव्य करता यावे म्हणुन गोवत्स व्दादशीचा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली

आपला देश शेतीप्रधान व कृषीप्रधान असल्याने या दिवसाचं एक आगळंवेगळं महत्व समजल्या जातं. हिंदु संस्कृतीत गायीला गोमाता समजले जाते तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा वास आहे आणि म्हणुन गायीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता वसुबारस हा दिवस साजरा केल्या जातो.

पुजाविधी – Vasubaras Puja Vidhi

दिवाळीच्या दिवसांमधे पहाटे उठुन दारात रांगोळी रेखाटावी दिवे लावावेत. तिन्ही सांजेला गायीचे पाय धुवुन गाय वासराची पुजा करावी. तीला हळद कुंकु, फुलं, अक्षता वाहाव्यात फुलांचा हार घालावा निरांजन ओवाळावी. गायीच्या वासराची देखील अश्याच पध्दतीनं पुजा करावी गोडाधोडाचा घास भरवावा.

गायीभवती प्रदक्षिणा घालावी. अनेक ठिकाणी गाय वासरू उपलब्ध होत नाहीत त्यावेळी आपल्या घरी देवपाटाजवळ गायवासराचे चित्र रेखाटावे आणि पुजा करावी.

गायीचे दुध ( दुधापासुन दही, ताक, लोणी, तुप ) अमृतासमान मानले जात असुन अनेक रोगांवर रामबाण उपाय देखील आहे. अश्या गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता या दिवसाचे महत्व सांगीतले आहे. आपल्या मुलांना चांगल्या आरोग्याचा लाभ व्हावा आणि ते सुखी व्हावे म्हणुन सुवासिनी या दिवशी पुजा करतात.

या दिवशी दुधापासुन बनविलेले पदार्थ खात नाहीत.

सवाष्ण स्त्रिया वसुबारस या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खातात.

अनेक ठिकाणी गायीला लक्ष्मीचे रूप देखील मानले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष गाय न भेटल्यास या दिवशी अनेक जण मातीची, पितळीची अन्यथा चांदीची गाय बनवुन तीची पुजा करतात.

अनेक जण गोशाळांमधे अथवा गोरक्षण संस्थांमधे जाउन गायीची पुजा करतात आणि तिला नैवेद्य भरवितात.

Read More:

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी वसुबारस या सणाबद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा वसुबारस या सणाबद्द्ल माहिती /vasubaras Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top