पोलीस कॉन्स्टेबल पासून एक I.P.S अधिकारी बनण्याची एक प्रेरक कहाणी

Vijay Singh Gurjar

ज्या स्वप्नाला देशातील बहुसंख्य विध्यार्थी आपल्या उराशी बाळगून रात्रंदिवस मेहनत करत असतात, पण त्यांच्यापैकी कठोर मेहनत करणाऱ्यांनाच या पदावर विराजमान व्हायला मिळतं. अश्याच एका मेहनती व्यक्तीची कथा आपण या लेखातून पाहणार आहोत. ज्या व्यक्तीच्या परिवारात शिक्षकाची नोकरी खूप मोठी समजली जायची. आणि परिवाराच्या उदरनिर्वाह करण्यासाठी ज्यांना वडिलांनी शिक्षक बनण्यासाठी प्रोत्साहन दिले होते, पण म्हणतात ना मोठे स्वप्न असणाऱ्यांना छोट्या स्वप्नांमध्ये समाधान मिळत नाही, त्यांना आपले स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे असतात.

अशीच एक कथा आहे ज्यामध्ये एक व्यक्ती स्वतःला सिध्द करताना पोलीस कॉन्स्टेबल पासून तर I.P.S पर्यंत चा प्रवास गाठतो. तर चला आजच्या गगनभरारी विशेष मध्ये एक नवीन कथा.

I.P.S विजय सिंह गुर्जर यांचा यशापर्यंतरचा प्रवास – I.P.S Vijay Singh Gurjar Infomation in Marathi 

I.P.S Vijay Singh Gurjar
I.P.S Vijay Singh Gurjar

विजय सिंह गुर्जर प्रारंभिक जीवन Vijay Singh Gurjar Biography in Marathi

विजय सिंग गुर्जर, राजस्थान च्या झुँझनू जिल्ह्यातील देवीपुरा गावचे राहणारे, गावातील मध्यम वर्गीय परिवारात त्यांचा जन्म झाला. वडील लक्ष्मण सिंग शेतकरी होते, तसेच त्यांची आई गृहिणी होती. घरामध्ये एकूण ५ मुले, त्यांच्यापैकी विजय हे तिसऱ्या क्रमांकाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी गावामध्येच पूर्ण केले.

विजय सिंह गुर्जर यांचे शिक्षण  Vijay Singh Gurjar Education 

त्यांनंतर वडिलांनी वर्ग ११ वी मध्ये त्यांचा प्रवेश संस्कृत विषयासाठी केला. कारण त्यांच्या वडिलांना असे वाटायचे की संस्कृत हा विषय मुलाला शिक्षक बनविण्यासाठी योग्य ठरेल, कारण त्यांना त्यांच्या मुलाला परिवाराच्या उदरनिर्वाहा साठी शिक्षक बनवायचे होते.त्यांनी संस्कृत मधून आपले (B.A)पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनंतर त्यांनी सरकारी नोकरी साठी आपले प्रयत्न सुरू केले, राजस्थान च्या पोलीस भर्ती, शिक्षक भर्ती, तसेच भारतीय सेनेच्या वेगवेगळ्या भर्ती या सगळ्यांमध्ये प्रयत्न केले. पण त्यांच्या हाती निराशाच लागली.

विजय सिंह गुर्जर यांचे करिअर – Vijay Singh Gurjar Career 

तेव्हाच २००९ मध्ये निघालेल्या दिल्ली पोलीस भर्ती साठी त्यांच्या मित्राने त्यांना या भर्ती विषयी सांगितले.आणि दिल्लीला येऊन या पेपर साठी कोचिंग लावण्याचे सुध्दा त्यांच्या मित्राने त्यांना सुचवले. त्यांनंतर विजय यांचे दिल्लीच्या पोलीस भर्ती मध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. आणि जेव्हा त्यांनी ही गोष्ट आपल्या घरच्यांना कळवली तेव्हा त्यांच्या घरचे विशेष करून वडील सर्वात जास्त आनंदी होते. आणि होणारही ना कारण त्यांच्या मुलाला एक सरकारी नोकरी मिळाली होती.

एवढंच नाही तर काही दिवसानंतर त्यांनी आणखी एक परीक्षा दिली त्यामध्ये त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवडल्या गेले. ज्याप्रमाणे मी सुरुवातीला आपल्याला सांगितले की ज्यांचे स्वप्न मोठे असतात ते काहीही करून स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात. या परीक्षेनंतर त्यांच्या मध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी ठरवले की आता आपल्याला सिव्हिल सर्व्हिस साठी प्रयत्न करायचे. आणि I.A.S. किंवा I.P.S बनून देशाची सेवा करायची.

या नवीन स्वप्नांना घेऊन त्यांनी दिल्लीच्या संगम विहार येथे आपली ड्युटी जॉईन केली. ड्युटी जॉईन करण्याअगोदर त्यांनी SSC चा पेपर दिला होता.  ड्युटी च्या १०-११ व्या महिन्यानंतर त्यांची पोस्टिंग केरळ मध्ये झाली.

जेव्हा ते दिल्लीला आले होते तेव्हा त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. परंतु केरळ मध्ये आल्यानंतर त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळायला लागला. पण तेथे त्यांना हिंदी भाषेतील पुस्तकांची कमतरता भासू लागली, आणि त्यामुळे त्यांना दिल्ली ला येणे जाणे करावे लागले. ड्युटी ला वेळ देऊन परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ देणे कठीण असते पण कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता, त्यांनी मेहनत केली. आणि त्यानंतर त्यांनी SSC ची परीक्षा दिली आणि या वेळेस त्यांची रँक पहिल्या पेक्षा चांगली आल्याने त्यांची निवड दिल्लीच्या आयकर विभागात झाली. आणि तेथे त्यांचे पद होते आयकर निरीक्षक. या पदाला त्यांनी २०१४ मध्ये दिल्लीला येऊन स्वीकारले.

त्यानंतर त्यांनी स्वतःला सिव्हिल सर्व्हिस साठी तयार करण्याचे ठाणले, सुरुवातीला त्यांनी कोचिंग क्लास सुध्दा जॉईन केले पण तेथील शिकवणे त्यांना फारसे आवडले नाही, त्यांनंतर त्यांनी निर्णय घेतला. की आता स्वतः सेल्फ स्टडी करूनच या पोस्ट ला मिळवण्याचे प्रयत्न करू पण ते शक्य झाले नाही. सुरुवातीच्या तीन प्रयत्नांमध्ये ते मुख्य परीक्षा सुध्दा उत्तीर्ण होऊ शकले नाही.

विजय सिंह गुर्जर यांचा विवाह Vijay Singh Gurjar Marriage 

त्यांनंतर त्यांची हिम्मत तुटायला आली. कारण घरचे त्यांच्यावर लग्नाचे प्रेशर टाकत होते, त्यांचा साखरपुडा हा २०१२ मधेच झाला होता. आणि त्यांनंतर त्यांनी २०१५ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर त्यांना त्यांच्या पत्नी आणि एका मित्राने पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांनी २०१६ ला एक आणखी प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात आले. पण यावेळेस फक्त ८ मार्क कमी असल्याने त्यांची निवड झाली नाही. आता पूर्णपणे खचून त्यांनी स्वतःची सर्व पुस्तके रद्दी मध्ये विकण्याचा विचार केला.

एक दिवस रद्दी वाल्याची वाट पाहता पाहता, मागून त्यांच्या पत्नीने त्यांना म्हटले की एवढे प्रयत्न केले फक्त आणखी एक वेळ जर प्रयत्न केला तर. आणि या शब्दांनी त्यांच्या मध्ये एक नवीन आशा जागृत केली. आणि त्यांनंतर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि यावेळेस मागील वेळेला झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा प्रयत्न केले. आणि या वेळेस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्यांची ५७४ नंबर ची रँक आली होती. यानंतर त्यांच्या आंनदाला पारावार नव्हता.

हि बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या गावामध्ये पसरली आणि मग काय पंचक्रोशीतील लोकांच्या आनंदाला पारावारच उरला नाही, आणि मग गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी एका कर्यक्रमाचे आयेजन केले. त्या कार्यक्रमात कमीत कमी ३ हजार लोकांनी सहभाग घेतला होता, कारण एवढ्या मोठ्या पदावर त्यांच्या गावामधून पहिल्यांदा कोणी तरी उत्तीर्ण होऊन आले होते. त्यांनंतर आज ते एक आयपीएस अधिकारी बनून जीवन जगत आहेत आणि देशाची सेवा करत आहे.

त्यांनी त्यांच्या अपयशाला एक संधी मानले आणि जीवनात पुढे जात राहिले. तसेच आपल्या जीवनात सुध्दा बऱ्याच समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो पण हार न मानता त्या संधीचा योग्य उपयोग करून जीवनात प्रयत्न केले तर यश आपल्या चरणाशी लोळत येईल.

आशा करतो आपल्याला गगनभरारी मध्ये लिहिलेली ही छोटीशी कथा आवडली असणार, आपल्याला जर ही कथा आवडल्यास या कथेला आपण आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here