“विजयदुर्ग किल्ला” मराठयांच्या इतिहासाचा साक्षीदार

Vijaydurg Fort Information Marathi

महाराष्ट्र म्हटलं कि सुरुवातीला आठवतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्यामध्ये जवळपास ३०० हुन अधिक किल्ले होते. यातील काही किल्ले स्वतः महाराजांनी बांधले तर काही जिंकलेले होते. महाराजांनी जिंकलेला असाच एक किल्ला म्हणजे विजयदुर्ग.

या किल्ल्याचे सुरुवातीचे नाव ‘घेरिया’ असे होते. शत्रूवर विजय मिळवून हा किल्ला काबीज केल्याने त्याचे नामकरण विजयदुर्ग असे करण्यात आले. चला तर मग या किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्य जाणून घेऊयात.

“विजयदुर्ग किल्ला” मराठयांच्या इतिहासाचा साक्षीदार – Vijaydurg Fort Information Marathi

Vijaydurg Fort Information Marathi
Vijaydurg Fort Information Marathi

विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास – History of Vijaydurg Fort in Marathi

या किल्ल्याची निर्मिती ११९३ ते १२०५ दरम्यान शिलाहार राजवंशाचे राजे राजा भोज (दुसरे) यांनी केली. त्यानंतर अनेक सत्ता या किल्ल्याने बघितल्या. परंतु १६५३ साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाही सल्तनतच्या मुठीत असलेला हा किल्ला जिंकला. आणि या विजयाचे प्रतीक म्हणून या किल्ल्याचे नामकरण ‘विजयदुर्ग’ करण्यात आले. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले असल्याने विजयदुर्ग महाराजांच्या आरमार सैन्यासाठी फार महत्वाचा होता.

विजयदुर्ग स्वराज्यात सामील झाल्यानंतर त्याचा पार कायापालट झाला. सुरुवातीला ५ एकराचे क्षेत्रफळ असलेला विजयदुर्ग आता १७ एकरमध्ये विस्थारीत करण्यात आला. किल्ल्याची तटबंदी ३ पदरी भिंतींनी भक्कम करण्यात आली. जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा किल्ला अभेद्य राहावा.

विजयदुर्ग किल्ल्याचे स्थान – Vijaydurg Fort Location

विजयदुर्ग किल्ला तालुका देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये स्थित आहे वाघोटन नदीकिनारी वसलेला आहे. विजयदुर्गला तीन बाजूंनी अथांग समुद्राने वेढलेले आहे.

विजयदुर्ग किल्ल्याचे बांधकाम – Vijaydurg Fort Architecture

विजयदुर्ग किल्ला म्हणजे त्याकाळातील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना होय. शत्रूंपासून रक्षणाकरिता किल्ल्याची तटबंदी अगदी भक्कम केलेली आहे. शिवाय, सुरक्षा भिंत जवळपास ३०० फूट उंच आहे. किल्ल्याच्या भिंती ८ ते १० मी उंच असून येथे एकूण २७ बुरुज आहेत.

एवढेच नव्हे तर, असे म्हटल्या जाते, कि विजयदुर्ग जेवढा पाण्याच्या वर आहे तेवढाच खाली सुद्धा आहे. याचे कारण म्हणजे किल्ल्याच्या भिंती पाण्याखाली सुमारे १० मी. खोल बांधलेल्या आहेत.

शत्रूंच्या अचानक हल्ल्यापासून सुरक्षितपणे बचावासाठी किल्ल्यामध्ये एक छुपी सुरंग देखील आहे. हि सुरंग शेजारील गावात निघते. सुरंगात हवेची ये-जा होण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. परंतु सद्यपरिस्थितीत हि सुरंग काही प्रमाणात ढासळलेली दिसते.

विजयदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे – Vijaydurg Fort Places to see

खरे पाहता हा संपूर्ण किल्लाच आकर्षक आहे. तरी देखील किल्ल्यातील खालील काही गोष्टी अत्यंत आकर्षक आणि विलोभनीय आहेत.

  • किल्ल्यावरील बुरुज
  • तोफगोळे
  • विविध दरवाजे
  • तलाव
  • गुहा
  • दारुगोळा साठवून ठेवण्याचे गोदाम इ.

विजयदुर्ग किल्ल्याला कसे जाल : How to Reach Vijaydurg Fort

येथे येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमधून एस.टी. बस किंवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत. जर आपण रेल्वे मार्गाने प्रवास करत असाल, तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली आहे. येथून विजयदुर्ग अंदाजे ८० किमी वर आहे. कणकवली स्टेशनहून आपल्याला खाजगी वाहन किंवा एस.टी. बस करता येईल.

विजयदुर्ग किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी : Best Time to visit Vijaydurg Fort

पर्यटकांसाठी हा किल्ला वर्षभर सुरु असतो, परंतु ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान येथे जास्त प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते. निसर्गाचे सौंदर्य आणि आल्हादायक वातावरणाची मज्जा लुटायची असेल तर या कालावधी मध्ये येथे जरूर भेट द्या.

विजयदुर्ग किल्ला सुरु असण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क – Vijaydurg Fort Timing and Entry Fee

हा किल्ला सकाळी १० ते सायंकाळी ५:३० पर्यंत सुरु असतो. भारतीय पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क ५ रु. तर विदेशी पर्यटकांसाठी हा शुल्क २५० रु. आहे.

विजयदुर्ग किल्ल्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न : Quiz on Vijaydurg Fort

१. विजयदुर्ग किल्ला कुणी बांधला? (Who Built Vijaydurg Fort?)

उत्तर: हा किल्ला शिलाहार वंशाचे राजे राजा भोज (दुसरे) यांनी बांधला व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे पुनः निर्माण केले.

२. विजयदुर्ग किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय?

उत्तर: घेरिया.

३. विजयदुर्ग किल्ल्याचे नामकरण कसे करण्यात आले?

उत्तर: महाराजांनी शत्रूवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून किल्ल्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवण्यात आले.

४. विजयदुर्ग किल्ला कुठे वसलेला आहे?

उत्तर: तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.

५. विजयदुर्ग किल्ला कुठल्या नदीकिनारी वसलेला आहे?

उत्तर: वाघोटन नदी.

६. विजयदुर्ग किल्ल्याची निर्मिती केव्हा करण्यात आली?

उत्तर: या किल्ल्याची निर्मिती ११९३ ते १२०५ दरम्यान करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top