• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 14, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

‘अ’ जीवनसत्वाची मराठीत माहिती

A Jivansatva in Marathi

‘अ’ जीवनसत्वाची मराठीत माहिती – Vitamin A Information in Marathi

इंग्रजी नाव: Vitamin A

‘अ’ जीवनसत्त्व मिळणारे अन्नघटक – Vitamin A Foods in Marathi

गाजर, कोबी, पालक, पपई, दूध, लोणी, बकऱ्याची कलेजी, अंडी, माशांचे तेल (Cord liver oil), आंब्याची कोय, रताळे.

जीवनसत्त्व ‘अ’ मुळे शरीरास होणारे उपयोग – Vitamin A Benefits

जीवनसत्त्व ‘अ’ चा उपयोग रातांधळेपणा व अन्य दृष्टिदोष घालवण्यासाठी होतो. रोजच्या आहारात योग्य वापर केल्यास रातांधळेपणा होतच नाही. म्हणूनच आहारात गाजर, पपई, पालक इ. ठेवल्यास जीवनसत्त्व अ भरपूर मिळते.

  • शरीराच्या योग्य वाढीसाठी जीवनसत्त्व ‘अ’ चा उपयोग होतो.
  • शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो.
  • निरोगी दृष्टीसाठी उपयुक्त.
  • त्वचेला तजेला येतो.
  • जीवनसत्त्व ‘अ’ च्या गोळ्या किंवा लस स्वरूपात दिले जाते; तरीही ते नैसर्गिक पदार्थांमधून घेणेच चांगले असते.

जीवनसत्त्व ‘अ’ च्या कमतरतेमुळे होणारे आजार – Vitamin A Deficiency Diseases

  • शरीराची योग्य वाढ होत नाही,
  • शरीर निरोगी राहात नाही.
  • रातांधळेपणा व डोळ्यांचे इतर विकार जडतात.

कमतरतेचे दुष्परिणाम – Vitamin A deficiency

‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता मुख्यतः दोन कारणांमुळे होते

  1. ‘अ’ जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे किंवा बालकांला मातेचे दूध लवकर बंद केल्यामुळे दुधातून मिळणारे अ-जीवनसत्त्व न मिळाल्याने डोळ्यातील रेटीना (दृश्यपटल) वाढीला अडथळा  निर्माण होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो. त्यामुळे संबंधित व्यक्ती रात्रीच्या वेळी स्पष्ट पाहू शकत नाही.
  2. मेद पदार्थाचे पचन न झाल्यामुळे ‘अ’ जीवनसत्त्व शरीरात जात नाही; त्याचे रक्तात शोषण होत नाही; त्यामुळे ही कमतरता होते व त्या व्यक्तीमध्ये रातांधळेपणा येतो. दररोजच्या आहारातील आवश्यक पातळी 700 ते 900 mg. आवश्यक असते.
  3. हस्व व दीर्घ दृष्टी दोष निर्माण होतो.

पोषण : दृष्टी, हाडांची वाढ, फुप्फुसे, रक्त यांचे पोषण व शरीराचे जंतुसंसर्गापासून संरक्षण.

इतर माहिती :

जीवनसत्त्व ‘अ’ दोन स्वरूपांत मिळते.

  • Retinol (रेटीनॉल) : हे मिळण्याचा मुख्य स्रोत प्राणी आहे. पिवळ्या रंगाचा असून पाण्यात विरघळणारा नाही. मेदात विरघळणारा आहे.
  • Carotenes (कॅरोटिन्स्) हे चार प्रकारचे असतात. हे असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. यात Retinol, retinal, retinic acid तसेच काही Provitamine सुद्धा असतात.

जीवनसत्त्व ‘अ’ ची अजून वेगवेगळी कार्ये आहेत. यात Retinol चा retinoic acid मध्ये रूपांतर करणे, या Retinoic acid चा उपयोग चांगल्या त्वचेसाठी होतो. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.

सर्वसाधारणपणे जीवनसत्त्व ‘अ’ हे खालील घटकांत किती स्वरूपात आहे, ते दिले आहे

माशांच्या तेलात30,000 mg
बकऱ्याची कलेजी8058 mg
कोंबड्याची कलेजी3296 mg
माशांची कलेजी6500 mg (72%)
गाजर835 mg (93%)
रताळे709 mg (79%)
पालक469 mg (52%)
अंडी146 mg (16%)
दूध28 mg (3%)

सर्वसाधारणपणे 1/3 मुलांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता असते.

Editorial team

Editorial team

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved