जीवनसत्त्व ‘सी’ ची माहिती

Vitamin C chi Mahiti

जीवनसत्त्व ‘क’ हे पाण्यात विरघळणारे आहे. तसेच ते उष्णतेमुळे व ज्वलनामुळे कमकुवत होते. याचा उपयोग सर्वसाधारणपणे वाढीसाठी होतो, जीवनसत्त्व ‘क’ ला एल-एस्कॉर्बिक अॅसिड (Lascorbicacid) असे म्हणतात.

जीवनसत्त्व ‘सी’ ची माहिती – Vitamin C information in Marathi

Vitamin C information in Marathi
Vitamin C information in Marathi

इंग्रजी नाव : Vitamin ‘C’

मिळणारे अन्न-घटक – 

लिंबू, काळी द्राक्षे, संत्री, पेरू, आवळा, चिंच हरभरे, करवंदे, टोमॅटो, काकडी, कोबी, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, सर्व आंबट फळे. थोडक्यात म्हणजे, या जीवनसत्त्वाची चव आंबट असते व रंग पांढरा असतो.

जीवनसत्त्व ‘सी’ मुळे शरीरास होणारे उपयोग – Vitamin C Benefits in Marathi

 1. निरोगी शरीर ठेवण्यास मदत होते.
 2. शरीराची योग्य रीतीने वाढ होते.
 3. दात निरोगी व मजबूत राहतात.
 4. हिरड्या मजबूत राहून दातांचे संरक्षण करतात.
 5. रक्तवाहिन्या मजबूत व निरोगी राहतात.
 6. आईचे दूध वाढण्यास उपयोगी पडते तसेच मेंदू किडनी, अॅड्रीनल ग्लँडस्, बकरीज, लिव्हर, डोळ्यांची रॉटना येथे शोषले जाते. कोलॅजेन तयार करते, पेशी बांधून ठेवते, जखमा भरते, सर्दी, पडसे, इन्फेक्शन कमी करते, श्वसनविकार बरे करते, ताण कमी करते.

जीवनसत्त्व ‘सी’ च्या उणिवेमुळे होणारे आजार – Vitamin C deficiency in Marathi

 1. स्कही नावाचा आजार होतो.
 2. हिरड्या सूजणे, लाल होणे, त्यातून रक्त येते.
 3. दात-हिरड्यांतून सैल होतात व दात हलतात.
 4. डोक्याचे केस कोरडे होतात व तुटतात. केस गळायला लागतात, डोक्यात कोंडा होतो.
 5. शरीराची त्वचा कोरडी होते. त्वचेची चमक किंवा तेज कमी होते.
 6. भरपूर अशक्तपणा येतो.
 7. शरीराला झालेली जखम लवकर भरून येत नाही. ती चिघळत जाते.
 8. जीवनसत्त्व ‘क’ च्या कमतरतेमुळे कुठल्याही आजाराची किंवा रोगाची लागण लवकर होते. त्यात ऋतू बदलणे वगैरेंमुळे झालेला आजार बरा न होता तो काही ना काही कारणांनी वाढत जातो.

इतर माहिती :

सर्वसाधारणपणे जीवनसत्त्व ‘क’ हे अँटी ऑक्सिडन्ट (anti oxidant) म्हणून वापरतात. ते पेशीच्या संरक्षणाची काळजी घेते. त्यांना दुरुस्त करते. त्यांची निगा राखते. रक्तात लोह शोषून घेण्यासाठी मदत करते. म्हणूनच डॉक्टर लोहाबरोबर ‘क’ जीवनसत्त्व घेण्याचा सल्ला देतात.

आपले शरीर हे जीवनसत्त्व क निर्माण करीत नाही व शरीरात साठवूनसुद्धा ठेवत नाही. जीवनसत्त्व ‘क’ सुद्धा पाण्यात विरघळणारे असल्यामुळे ते समाविष्ट असणारा भाजीपाला किंवा फळे कापण्यापूर्वी धुवून घ्यावीत.

जीवनसत्त्व ‘क’ मिळणारे पदार्थ – Vitamin C Food

पपई 60 mg
स्ट्रॉबेरी 60 mg
संत्री 53 mg
लिंबू 53 mg
कोबी 48 mg
पालक 30 mg
मोसंबी 30 mg
टोमॅटो 10 mg
द्राक्षे 10 mg
अॅप्रिकॉट 10 mg
अलूबुखार 10 mg
टरबूज 10 mg
केळी 9 mg
कांदा 7.40 mg
काकडी 3 mg
शतावरी 6 mg
बकऱ्याचा भेजा (उकडलेला) 17 mg
बकऱ्याची कलेजी (शिजवलेली) 12 mg
गाईचे दूध 2 mg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here