जीवनसत्त्व ‘D’ ची माहिती

Vitamin D chi Mahiti

जीवनसत्त्व ‘D’ ची माहिती – Vitamin D information in Marathi

Vitamin D information in Marathi
Vitamin D information in Marathi

इंग्रजी नाव : Vitamin D.

मिळणारे अन्न-घटक : अंडी (त्यातला पिवळ भाग), दूध, लोणी, मासे, माशांचे तेल (fish-liver oil), सकाळचे कोवळे ऊन,

जीवनसत्त्व D मुळे शरीरास होणारे उपयोग – Vitamin D Benefits

  1. हाडांची बळकटी वाढवते. हाडांतील कॅल्शिअमचे प्रमाण वाढवते.
  2. शरीरातील रंगद्रव्ये हे सूर्यप्रकाशातून जीवनसत्त्व ‘ड’ बनवण्याचे काम करते.
  3. अस्थमा, क्षयरोग होऊ नये म्हणून मदत करते. म्हणजे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढवते.

जीवनसत्त्व D च्या कमतरतेमुळे होणारे आजार – Vitamin D Deficiency Symptoms

  1. जीवनसत्त्व ‘ड’ च्या कमतरतेमुळे रिकेट्स (Rickets) नावाचा आजार होतो. यामध्ये शरीरातील लांब हाडे मऊ होतात. ती वाकडी होतात. पाय फेंगडे होतात. त्यांना बाक किंवा गोलावा येतो; यालाच मुडदूस म्हणतात,
  2. जीवनसत्त्व ‘ड’ कमी झाल्यास क्षयरोग (Tuberculosis) होण्याची शक्यता असते.
  3. अस्थमा होण्यासही या जीवनसत्त्वाचा अभाव कारणीभूत होतो.
  4. डोक्यावरील केस अकाली गळतात.

इतर माहिती :

जीवनसत्त्व ‘ड’ चे प्रामुख्याने दोन गटांत वर्गीकरण करतात-

  1. जीवनसत्त्व ड. (Ergocaluferol), यात फॉस्फरस घटक जास्त असतो.
  2. जीवनसत्त्व ड, (cholecalciferol) यात कॅल्शियम हा घटक जास्त असतो,

असेही सांगितले जाते, की जीवनसत्त्व ‘ड’ मुळे हाडांतील कॅल्शियमची घनता वाढवली जाते आणि त्यामुळे फॅक्चर हो ण्याचे प्रमाण कमी होते.

गरोदरपणातसुद्धा बाळाच्या योग्य वाढीसाठी जीवनसत्त्व ‘ड’ दिले जाते; जेणेकरून बाळाच्या हाडांची योग्य वाढ व्हावी, हे जीवनसत्त्व कॅल्शियमसोबत दिल्याने त्याचा चांगला फायदाही होतो, जीवनसत्त्व ‘ड’ चा उपयोग हिवाळ्यात येणाऱ्या तापाला आळा घालण्यासाठी होतो. लागण (infection) होण्यापासून बचाव करतो.

जर शरीरात जीवनसत्त्व ‘ड’ कमी झाले तर क्षयरोग (Tuberculosis) होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आता जीवनसत्त्व ‘ड’ चे आणखी काही नवीन प्रकार प्रचलित झाले आहेत. जीवनसत्त्व ड, (Humisterol), जीवनसत्त्व ड (Ergocalciferol), जीवनसत्त्व ड, (Cholecalciferol) (dehydrocholestrol हे त्वचेच्या आत तयार होते. जीवनसत्त्व ड, (22-dihydroegro-calciferol)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here