जीवनसत्त्व ‘E’ ची माहिती

Vitamin E chi Mahiti

जीवनसत्त्व ‘E’ ची माहिती – Vitamin E information in Marathi

इंग्रजी नाव : Vitamin E.

अन्नातून मिळणारे घटक : लोणी, सफरचंद, अंडी, केळी, दूध, सोयाबीन, वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, मुळा, शतावरी (Asparagus) ,लाल भोपळा,रताळी, आंबा, पपई, सूर्यफूल तेल, Wheatgerm oil, पामतेल, शेंगदाणा, बदाम.

जीवनसत्त्व E मुळे शरीरास होणारे उपयोग – Vitamin E Benefits

  1. अँटी ऑक्सिडन्ट (Anti oxident) म्हणून याचा वापर करतात. त्यामुळे शरीराचे रक्षण होते. इन्झमॅटीक अॅक्टिव्हीटी (Enzymatic activities) पुढच्या पिढीत पाठवणाऱ्या गुणसूत्रांची क्षमता, सुदृढता वाढवते.
  2. स्नायूंची वाढ व्यवस्थित करते. स्नायूंना ताठरता कडकपणा किंवा घट्टपणा न येऊ देता हळूवारपणे स्नायूंच्या हालचालींच नियंत्रण करते. त्वचा तुकतुकीत व तजेलदार बनवते. हृदयाचे काय व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.

जीवनसत्त्व E च्या कमतरतेमुळे होणारे आजार – – Vitamin E Deficiency Symptoms

1) जीवनसत्त्व ‘इ’ च्या कमतरतेमुळे चेतासंस्थेशी निगडित असे आजार होतात.

  • Spinocevebellar ataxia (स्पायनोसिव्हेब्लर अँटेक्सिया)
  • Myopathies (मायोपॅथेसिस)
  • Dysarthria (डिसेर्येरिया)
  • Loss of vibratory sensation (लॉस ऑफ व्हायब्रेटरी सेन्सेशन)

2) जीवनसत्त्व ‘इ’ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो.

इतर माहिती :

आठ प्रकारांत असलेल्या जीवनसत्त्व ‘इ’ चे प्रामुख्याने दोन गटांत वर्गीकरण करतात.

  1. पहिले चार मिळून टोकोफेरॉल्स (Tocopherols), – टेकोफेरॉल (tocopherol) हा एक महत्त्वाचा पाण्यात विरघळणारा अँटी ऑक्सिडन्ट आहे. हा पेशीच्या आवरणाची काळजी घेतो व पेशींचे संरक्षण करतो.
  2. नंतरचे चार मिळून टोकोट्रीनॉल्स (Tocotrienols), त्यांचे लेखन साधारणतः अल्फा (alpha-a), बिटा (beta – b), गॅमा (gamma -g), SCCT (delta – d) – टोकोट्रिनॉल्स् (Tocotrienols) हा आपल्या चेतासंस्थेतील चेतांची म्हणजे पेशींची काळजी घेतो. त्यांना तुटण्यापासून वाचवतो,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top