महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबाची आरती

Pandurangachi Aarti

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील भगवान पांडुरंग (Pandurangachi Aarti) यांना भगवान कृष्ण यांचा अवतार मानले जाते. महाराष्ट्र राज्यातील सर्व संतांचे ते प्रेरणास्थान आहेत. तसचं, राज्यातील सर्व भाविकांची त्यांच्या चरणी अन्यन श्रद्धा आहे.

आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या अनेक भागातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शना करिता पायी येतात. तसचं, राज्याच्या विविध भागातील पालख्या देखील त्याठिकाणी दर्शनाकरिता येत असतात. सुमारे एक महिना प्रवास केल्यानंतर या पालख्या त्या ठिकाणी पोहचतात.

आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे होणारा पालखी सोहळा पाहण्याजोगा असतो. भाविकांची अतोनात गर्दी याठिकाणी पाहायला मिळते. लोकांच्या गर्दीमुळे चंद्रभागेला जणू पूर आल्याचा भास होतो. पंढरपूर प्रमाणेच राज्यातील अनेक विठ्ठल मंदिरात आपणास अशीच काही गर्दी पाहायला मिळते.

आषाढी एकादशी निमित्ताने मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. मंदिरातील विठ्ठल मूर्तीची  विधिवत पूजा अर्चना करून मूर्तीला छान कपडे परिधान केले जातात. मिठ्ठ्ल मूर्तीच्या माथी चंदनाचे टिळक लावून गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. या दिवशी विठ्ठलाचे रूप पाहण्याजोगे असते.

मंदिरात महाआरतीचे आयोजन देखील केले जाते. सर्व भाविक एकत्रपणे या आरतीचा लाभ घेतात. आज आम्ही इथे आपल्या साठी विठोबाची आरती (Vitthal Aarti) घेवून आलो आहोत.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबाची आरती – Vitthalachi Aarti

Vitthal Aarti
Vitthal Aarti

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥१॥

जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥धृ०॥

तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥२॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा॥३॥

ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती॥५॥

आपल्या महाराष्ट्र राज्यात पायदळ पंढरीची वारीला जाणे ही परंपरा खूप जुनी आहे. संत तुकोबाराय, संत एकनाथ, ज्ञानेश्वर महाराज आदी संताच्या काळापासून ही परंपरा आपल्या राज्यात सुरु आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारे पंढरपूर येथील भगवान विठ्ठल यांची मूर्ती कमरेवर हात देवून विटीवर उभी आहे.

तसचं, त्या मूर्तीच्या कानात आकर्षक स्वरूपी मासोळीची जोडी आहे. ही विठ्ठल मूर्ती जणू आपणास तिच्याकडे आकर्षित करीत असल्याचा आपणास भास होतो.

पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती खूप प्राचीन कालीन असून मूर्तीची निर्मिती काळ्या पाषाणापासून करण्यात आली आहे. आपल्या राज्यातील अनेक संत आपल्या कीर्तनाला सुरवात करण्याआधी ‘पंढरीनाथ महाराज की जय’  या प्रकारे प्रभू विठ्ठ्लांची आराधना केल्यानंतरच कीर्तनाला सुरवात करतात.

भगवान विठ्ठल यांच्या प्रती लोकांच्या मनात भक्ती रुजवण्याचे खरे काम केलं आहे ते राज्यांतील संतानी, ते नियमित आपल्या कीर्तनातून लोकांना विठ्ठल मूर्तीची महिमा सांगत असतात. भगवान विठ्ठल यांच्या प्रती पठन केलेली विठ्ठल आरती म्हणजे साक्षात विठ्ठल प्रभूची केलेली स्तुती होय.

आरतीच्या माध्यमातून संपूर्ण विठ्ठल चरित्राचे वर्णन केलं गेलं आहे. आपण नियमित विठ्ठलाच्या आरतीचे पठन करीत असतो.

आरतीचे पठन केल्याने विठ्ठल मूर्ती प्रसन्न होवून आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी लोकांची विठ्ठल मूर्ती पायी धार्मिक भावना आहे. शिवाय, आरती म्हटल्याने आपल मन देखील प्रसन्न होते. या आरतीत त्यांचे संपूर्ण वर्णन करण्यात येते.

शिवाय, आपणास दुसऱ्या विठ्ठल ग्रंथाचे वाचन करावे लागत नाही. आरती म्हणजे भगवान विठ्ठल यांची एका प्रकारे केलेली आराधनाच होय. म्हणून आपणास देखील या आरतीचे नियमित पठन करता यावे याकरिता आम्ही या आरतीचे लिखाण केलं आहे. धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here