“मतदानाविषयी जागरुकतेसाठी काही घोषवाक्ये”

Voting Awareness Slogans 

मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्कच नाही तर अधिकार सुद्धा आहे, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे खूप आवश्यक आहे, जर आपण मतदान करण्याचा हक्क बजावला नाही तर देशात कमी टक्केवारीमध्ये मतदान होईल सोबतच तुम्हाला माहीतच आहे ज्याप्रमाणे एका मार्कची किमंत असते त्या प्रमाणे एक वोट हे खूप महत्वाचे असते,

एका मतामुळे विकास घडवणारी पार्टी जिंकता जिंकता राहू शकते. मतदान करणे हा आपल्याला संविधानाने दिलेला अधिकारच आहे, म्हणून त्या अधिकाराचा योग्य वापर करून आपण मतदान करायला हवे.

आजच्या लेखात आपण मतदानाविषयी काही विशेष घोषवाक्ये पाहणार आहोत. ज्या समाजामध्ये जागरुकता पसरविण्यासाठी उपयोगी येतील.

“मतदानाविषयी जागरुकतेसाठी काही घोषवाक्ये” – Voting Awareness Slogans in Marathi

Voting Awareness Slogans in Marathi

तर चला सुरुवात करूया!

  1. वोट आपले द्यायचे आहे, कर्तव्य आपले बजावायचे आहे.
  2. वोट हे अधिकारच नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे.
  3. एका मताने बनते आणि पडते सरकार, म्हणून तुमचे मत जाऊ नका देऊ बेकार.
  4. आपल्या एका मताने बदल घडेल, त्यामुळेच समाज सुधारेल.
  5. सोडा आपले सर्व काम, चला करू आपले मतदान.
  6. सुरुवात करूया, मतदार बनूया.
  7. करा आपल्या मताचे दान, हीच आहे लोकशाही ची शान.
  8. मतदान करा सर्व नर-नारी, कारण आहे ती प्रत्येकाची जिम्मेदारी.
  9. बनवा आपले मन, मतदान करा प्रत्येक जन.
  10. जे वाटतील दारू, साड्या आणि वोट, त्यांना कधीच नका करू वोट.
  11. जो देईल नोट, त्याला कधीच करू नका वोट.
  12. जाती वर ना धर्मावर, बटन दाबा कर्मावर.
  13. वृध्द असो कि जवान, प्रत्येकाने करा आपले मतदान.
  14. घरी घरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरूक बनवू. 
  15. तुम्ही कुणाचीही खुर्ची हलवू शकता, तुमच्या बोटाचा वापर करून.
  16.  तुमच्या हातात आहे ताकत, योग्य उम्मेदवाराला द्या आपले मत.
  17. लोकशाहीचे एकच अनुष्ठान, करा आपले मतदान.
  18. १८ वर्षाची वय केली पार, घेऊन घ्या मताचा अधिकार.
  19. तोच देश होईल महान, ज्या देशात १०० टक्के मतदान.
  20. दारू पैसा आहे त्यांच हत्यार, आता नाही चालेल हा विचार.

मतदार राजा जागा हो आणि देशाच भविष्य घडवण्यात आपले मतदान करून योगदान दे. या मतदानामुळेच आपल्या देशातील स्थिती बळकट होण्यास मदत होईल. मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडावे आणि मतदान करावे.

आणि समाजामध्ये जागरुकता पसराविण्यासाठी सहकार्य करा.

आशा करतो आपल्याला आजचे लिहिलेले घोषवाक्ये समाजामध्ये जागरुकता पसरविण्यासाठी मदत करतील, आपल्याला लिहिलेले घोषवाक्ये आवडली असतील तर यांना आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका.

आणि आमच्या majhimmarathi.com ला अवश्य भेट दया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top