5G काय आहे आणि भारतामध्ये याची सुरुवात कधी होईल, जाणून घ्या या लेखातून.

What is 5G Network

आजचे जीवन हे इंटरनेट शिवाय शून्य झाल, ज्याप्रमाणे सुरुवातीला या 2G इंटरनेट ची सुविधा उपलब्ध झाली. 2G नंतर 3G ची सुविधा आली, आणि आता आपण प्रत्येक जण वापरतो ती 4G ची इंटरनेट सुविधा. पण याच प्रकारे इतर देशांमध्ये 5G आणि त्यापेक्षा जास्त इंटरनेट च्या स्पीड ला वापरले जात आहे. पण आपल्याला माहीत आहे का जेव्हा 4G चे इंटरनेट भारतामध्ये उपलब्ध झाले होते, तेव्हा प्रत्येकाला 4G हँडसेट असलेला मोबाईल विकत घ्यावा लागला होता, पण जेव्हा भारतामध्ये 5G इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यास आपल्याला मागच्या सारखे हँडसेट बदलवण्याची आवश्यकता भासेल का? तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत, की 5G म्हणजे काय आणि भारतामध्ये हे कधी उपलब्ध होणार आहे. तर चला पाहूया..

5G म्हणजे काय आणि भारतात कधी होईल याची सुरुवात– Everything you need to know about 5G Speed

What is 5G Speed
What is 5G Speed

5G म्हणजे काय असते? – What is 5G Speed?

5G चा फुल फॉर्म होतो Fifth Generation म्हणजेच पाचवी पिढी. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशन ची पाचवी पिढी म्हणून ओळखल्या जाते. सोबतच वायरलेस नेटवर्क ची सुध्दा पाचवी पिढी म्हणून ओळखल्या जाते, ही सेवा 2G , 3G , 4G पेक्षा अधिक वेगवान आहे.

स्वस्त दरात उच्च दर्जा, कमी वेळात अधिक उत्तम स्पीड आणि वेगवान असलेलं नेटवर्क ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 5G मध्ये पाहायला मिळतात. ह्याची स्पीड 20 Gbits असणार आहे, म्हणजेच १ HD चित्रपट डाउनलोड करण्यासाठी १0 – 20 सेकंदाचा कालावधी लागणार आहे, सोबतच अपलोडिंग ची स्पीड सुध्दा जास्त असणार आहे.

यामुळे आपल्या मोबाइल वर एका सेकंदात २० गिगाबाईट इंटरनेट स्पीड मिळणार आहे, आणि आपली स्लो इंटरनेट स्पीड पासून सुटका होणार आहे. इंटरनेट वर असलेल्या हेवी ट्राफिक पासून सुध्दा या 5G  मुळे सुटका मिळणार आहे. यासाठी मोबाईल कंपन्यांना आपल्या सिस्टीम मध्ये बदलाव करून 5G सारख्या वायरलेस तंत्रज्ञानासाठी त्यांच्या मोबाइल डिव्हाईस ना अपग्रेड करावे लागेल. आणि मोबाईल कंपन्यांना ही एक प्रकारे स्पर्धा असणार आहे.

5G ची सेवा कधी पासून सुरू होणार? – When will the 5G Service Start

अमेरिकी देशांमध्ये ही सेवा २०२० च्या शेवटी सुरु होणार आहे, दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये सुध्दा ही सेवा २०२० च्या शेवटी सुरू होण्याची शक्यता आहे. आणि जगातील बऱ्याच देशांमध्ये ही सुविधा ह्या वर्षाच्या शेवटी सुरू होण्याची आशंका आहे, लवकरच आपल्याला या 5G इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे.

अमेरिकेच्या दूरसंचार कंपनीने ह्या 5G ची टेस्टिंग सुरूही केलेली आहे. अमेरिकेच्या स्प्रिंट नावाची कंपनी या सेवेला लोकांसाठी लवकर उपलब्ध करून देईल असे सांगण्यात येत आहे.

भारतामध्ये 5G सर्व्हिस कधी सुरू होईल? – When is 5G Speed coming to India 

भारताच्या दूरसंचार विभागाने या प्लॅन ला सहमती दर्शवत यावर काही पॉलिसी बनविण्याचे ठरविले आहे. सोबतच या विषयी भारतातील दूरसंचार कंपन्या Jio, Airtel. सारख्या कंपनी याविषयी पुढील प्लॅनिंग करत आहेत, एकवेळ नेटवर्क सेट झाल्यानंतर ग्राहकांना 5G चे हँडसेट असलेला मोबाईल असणे गरजेचे असेल आणि त्यांनंतर 5G नेटवर्क स्पीड चा आनंद घेतल्या जाऊ शकतो.

भारतामध्ये टेलिकॉम कंपन्यांना माहिती आहे की येथील ग्राहकांना 4G डेटा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे कोणतीही कंपनी 5G मध्ये निवेश करण्यापासून स्वतःला दूर ठेवेल, परंतु या सेवेला भारतामध्ये येण्यासाठी आणखी बरेच वर्षांचा कालावधी लागेल जवळजवळ २०२१-२२ पर्यंतही वेळ लागू शकते.

5G आल्यानंतर मोबाईल बदलण्याची गरज पडेल का? – Mobile Need to be Replaced after 5G

बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की 5G जर भारतामध्ये आले तर मोबाईल हँडसेट बदलावे लागेल का? तर उत्तर असेल कदाचित हो !

कारण जेव्हा 4G नेटवर्क नवीन आले होते तेव्हा मोबाईल चे हँडसेट बदलावे लागले होते, त्याचप्रमाणे 5G नेटवर्क आल्यानंतर सुध्दा आपल्याला मोबाईलला बदलावे लागेल.

तर आजच्या लेखात आपण पाहिले की 5G नेटवर्क काय असते आणि हे भारतात कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे. आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top