एच.टी.एम.एल म्हणजे काय?

वेबसाईट तयार करण्यासाठी बऱ्याच भाषांचा वापर केला जातो. त्यापैकी एक म्हणजे एचटीएमएल. एचटीएमएल हि एक वेब डिजाइन भाषा आहे. या भाषेचा वापर वेबसाईट किवां वेब अप्लिकेशन बनविण्यासाठी केला जातो. एचटीएमएल चा फुल फॉर्म hypertext markup language असा होतो. जर तुम्हाला वेब डिजाइन करायची असेल तर तुम्हाला हि भाषा शिकणे आवश्यक आहे. या भाषेच्या मदतीनी तुम्ही कुठलीही वेबसाईट तयार करू शकता. हि भाषा शिकण्यास सोपी आहे. जर तुम्हाला एचटीएमएल शिकायची असेल तर या साठी ऑनलाईन कोर्स सुद्धा उपलब्ध आहेत.

एच.टी.एम.एल म्हणजे काय? – What is HTML?

एच.टी.एम.एल चा इतिहास – History of HTML

HTML या भाषेला टीम बर्नर्स-ली ने १९८९ मध्ये विकसित केले. आणि मोझाक ब्राउजर द्वारे या भाषेला लोकांपर्यंत पोहचवले गेले. या भाषेचा वापर करून वेबसाईट चे frontend बनविल्या जाते. हि अत्यंत प्रसिद्ध भाषा आहे. जिच्या सहाय्याने आपण वेबसाईट सहज बनवू शकतो. हि भाषा शिकण्यास अत्यंत सोपी असून सहज शिकता येते. २००८ मध्ये या भाषेचे नवीन version काढण्यात आले. या versions मध्ये काही सुधारित बदल करण्यात आले जे मागील आवृत्ती मध्ये नव्हते.

वेब डिजाइन भाषा एचटीएमएल चे वैशिष्टे / Features of html

एचटीएमएल द्वारे आपण सहज आपल्या वेबसाईट मध्ये graphics, video आणि audio टाकून वेबसाईट ला अधिक interactive बनवू शकतो. एचटीएमएल च्या या नवीन फीचर्स मुळे कोडींग करणे अधिक सोपे झाले आहे.

  1. Vector Graphics
  2. header and footer
  3. application programming language (API)
  4. Error handling
  5. Browser support
  6. Offline application cache

एचटीएमएल tag म्हणजे काय ?

html मध्ये असे काही शब्द आहेत जे आधीपासून तयार असतात. त्यांचा वापर करून आपण एचटीएमएल मध्ये कोडींग करू शकतो. या मध्ये प्रत्येक tag च एक वेगळ महत्व असते. एचटीएमएल पाच मध्ये १२० tag आहेत आणि यांच्या मदतीनी आपण वेबसाईट चा frontend बनवण्यास मदत होते.

उदाहरणार्थ : <html> हे tag सुरवात करण्यासाठी वापरले जाते आणि </html> हे बंद करण्यासाठी वापरले जाते.

एचटीएमएल चा वापर कशासाठी केला जातो :

html चा मुख्य वापर हा वेब डिजाईनिंग साठी केला जातो. एचटीएमएल चा उपयोग विविध मोबाईल अप्लिकेशन आणि आणि वेब अप्लिकेशन तयार करण्यासाठी केला जातो. तसेच एचटीएमएल चा वापर वेबपेज तयार करण्यासाठी सुधा केला जातो. एचटीएमएल हि एक frontend भाषा म्हणून सुद्धा वापरली जाते.

एचटीएमएल भाषेचे वैशिष्ट :

  • एचटीएमएल हि प्रसिद्ध भाषा असून शिकण्यास सोपी आहे.
  • HTML हि एक platform independent language आहे. म्हणजे तुम्ही या भाषेला एकदा लिहल या नंतर तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिम वरती वापरू शकता.
  • एचटीएमएल हि केस सेन्सेटीव भाषा नाही आहे. म्हणजे तुम्ही tag छोट्या अक्षरात किवा क्यापिटल लेटर वापरून सुद्धा लिहू शकता, पण एचटीएमएल मध्ये सहसा छोट्या शब्दांचा वापर केला जातो.
  • वेबपेज वरती ऑडीओ, ग्राफिक्स आणि video या सर्व गोष्टींचा वापर करून वेबपेज आकर्षक बनवण्यासाठी एचटीएमएल ची मदत होते.

तर अश्या प्रकारे आपण जाणून घेतले कि एक एचटीएमएल म्हणजे काय असत, त्याचा वापर कुठे आणि कसा केला जातो. एचटीएमएल ची वैशिष्ट्य काय आहेत. या सर्व गोष्टींबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतल मला आशा आहे. तुम्हाला हि माहिती आवडली असेल आणि तुम्हाला हि माहिती.

FAQ About HTML

Q. HTML म्हणजे काय?

उत्तर: एचटीएमएल (हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज) हि एक भाषा आहे. जिचा वापर वेबपेज तयार करण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही कोणती वेबसाईट उघडता तेव्हा तुम्हाला तुमच्या समोर जी स्क्रीन दिसते ती एचटीएमएल च्या मदतीने तयार केली जाते. एचटीएमएल ला frontend तयार करण्यासाठी वापरले जाते.

Q. HTML वैशिष्ट्ये काय आहेत?

उत्तर: HTML ची वैशिष्ट्ये:
हे शिकणे सोपे आणि वापरण्यास सोपे आहे.
हे platform independent आहे.
वेब पृष्ठावर प्रतिमा, व्हिडिओ आणि ऑडिओ जोडले जाऊ शकतात.
मजकुरात हायपरटेक्स्ट जोडता येतो.
ही एक मार्कअप भाषा आहे.

Q. HTML कोड कसा लिहावा?

उत्तर:
step 1: नोटपॅड open करा
2: TextEdit (Mac) उघडा फाइंडर > Applications > TextEdit. …
3: काही HTML लिहा. खालील HTML कोड नोटपॅडमध्ये लिहा किंवा कॉपी करा: …
4: HTML पृष्ठ जतन करा. तुमच्या संगणकावर फाइल सेव्ह करा. …
5: तुमच्या ब्राउझरमध्ये HTML पृष्ठ पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here