ह्या गोष्टींमुळे पंतप्रधानांसाठी असलेले सिक्युरिटी गार्ड ठेवतात त्यांच्याजवळ काळी ब्रिफकेस, काय असते त्या ब्रिफकेस मध्ये जाणून घ्या या लेखातून.

Nuclear Briefcase India

भारतच नाही तर कोणत्याही देशाचे प्रधानमंत्री जेव्हा काही कारणास्तव बाहेर जातात तेव्हा त्यांच्या सिक्युरिटीसाठी असणाऱ्या व्यक्तीं जवळ काळी ब्रिफकेस आपल्याला पाहायला मिळते, बरेचदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री कोणत्या सभेला किंवा कोणत्या कार्यक्रमात जाताना त्यांच्या सिक्युरिटीसाठी असलेल्या व्यक्तींजवळ आपल्याला ही काळी ब्रिफकेस अवश्य दिसली असेल.

बरेचदा तर त्यांच्या फोटोमध्ये सुध्दा आपल्याला ही ब्रिफकेस असणारी व्यक्ती आणि ब्रिफकेस पाहायला मिळते, परंतु बरेच लोकांना या ब्रिफकेस मध्ये काय असते याविषयी माहिती नसेल, आपल्याला अशाही अफवाह ऐकायला मिळतात की या काळ्या ब्रिफकेस मध्ये न्यूक्लियर बॉम्ब चे बटन असते आणि जेव्हा वाटल संकट येत आहे तेव्हा त्याला ऑन केल्या जातं.

आपल्या माहिती साठी अश्या प्रकारची कोणतेही बटन वगैरे त्या ब्रिफकेस मध्ये नसते, या फक्त अफवाह आहेत, आणि या अफवांवर हुशार व्यक्तीने कधीही विश्वास ठेवू नये. पण खरच त्या ब्रिफकेस मध्ये जर बॉम्ब चे बटन नसते तर काय असते. तर आजच्या या लेखात आपण पहाणार आहोत की सिक्युरिटी जवळ असणाऱ्या काळ्या ब्रिफकेस मध्ये नेमकं काय असते आणि त्याचा वापर काय असतो? तर चला पाहूया..

प्रधानमंत्रांच्या सिक्युरिटी गार्ड च्या ब्रिफकेस मध्ये काय असते – What is in the briefcase of Prime Minister’s Bodyguards

what is in the briefcase of Prime Minister bodyguards
what is in the briefcase of Prime Minister bodyguards

प्रधानमंत्री यांच्या सुरक्षिततेसाठी ती काळी ब्रिफकेस असते ती ब्रिफकेस नसून एक पोर्टेबल बुलेट प्रूफ शिल्ड असते या शिल्ड चा वापर प्रधानमंत्र्याच्या वैयक्तिक सुरक्षितेसाठी केला जातो, म्हणजेच पंतप्रधान यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची आशंका झाली आणि हल्ला झाला तर या बुलेट प्रूफ शिल्ड चा वापर केला जातो. या शिल्ड ला सिक्युरिटी हाताने उघडून प्रधानमंत्र्यांना आजूबाजूने कव्हर करून घेतात आणि ही शिल्ड कोणत्याही प्रकारचा हमला झाल्यास त्यापासून सुरक्षा करू शकते.

या ब्रिफकेस मध्ये आतून एक छोटासा पॉकेट असतो, ज्यामध्ये बंदूक ठेवण्यासाठी थोडीशी जागा असते, आणि हल्ल्याच्या वेळेस या ब्रिफकेस चा ढाल म्हणून काम केल्या जाते, आणि म्हणूनच सिक्युरिटी पंतप्रधान यांच्या आजूबाजूला नेहमी उपस्थित राहतात. जेणेकरून हल्ला झाला तर लवकर त्यापासून वाचता येईल.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना या लेखाला शेयर करायला विसरू नका.सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here