लीप वर्ष म्हणजे काय? आणि ४ वर्षातून एकदाच का येते लीप वर्ष? जाणून घ्या या लेखातून

Leap Year Mhanje Kay

कॅलेंडर नुसार जर पाहिले तर दरवर्षी ३५६ दिवसांचं एक वर्ष असत आणि प्रत्येक वर्षात फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतात म्हणजेच फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा बनलेला असतो. पण जेव्हा लीप वर्ष येतं किंवा लीप वर्ष साजरं केल्या जात तेव्हा याच फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसां ऐवजी २९ दिवसांचा समावेश आपल्याला दिसून येतो. जर एखाद्या व्यक्तीच्या जन्म २९ फेब्रुवारी ला झाला तर त्या व्यक्तीला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ४ वर्षाची वाट पाहावी लागते. मग यावर एक प्रश्न उभा राहतो की लीप वर्षात २९ आणि बाकी वर्षात २८ दिवस का असतात. असे का होते तर आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत, की लीप वर्ष ४ वर्षातून एकदा का येते? आणि या मागे नेमकं काय कारण आहे? तर चला पाहूया..

लीप वर्ष ४ ववर्षातून एकदा का येत – What is Leap Year Information in Marathi

What is Leap Year
What is Leap Year

लीप वर्ष म्हणजे नेमकं काय असते? – What is a Leap Year?

लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाला ४ ने निःशेष भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. उदा. २०२०, २०२४, २०२८.

२०२० ला ४ ने निःशेष भाग जातो म्हणजेच २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसांच्या ऐवजी २९ दिवसांचा समावेश असतो. म्हणजेच येणारे २०२४, २०२८ ह्या वर्षांमध्ये सुध्दा फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा दिसणार आहे, लीप वर्ष सरळ म्हणजे ज्या वर्षाला ४ ने निःशेष भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात.

साधारणतः वर्षात ३६५ दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतात. परंतु लीप वर्षात ३६६ दिवस असतात आणि फेब्रुवारी महिना हा २९ दिवसांचा असतो.

लीप दिवस म्हणजे काय? आणि कोणत्या दिवसाला लीप दिवस म्हणतात? – What is Leap Day?

४ वर्षातून फेब्रुवारी महिन्यात आलेल्या अधिकच्या दिवसाला लीप दिवस म्हणतात. आणि तो लीप दिवस म्हणजे २९ फेब्रुवारी असतो. लीप दिवस सुध्दा ४ वर्षातून एकदाच येतो. कारण तोही लीप वर्षाचा एक भाग आहे.

काय होते असे की ४ वर्षातून एकदा लीप वर्ष येतें? – Why is Leap Year every 4 years

पृथ्वीला सूर्याची एक परिक्रमा करण्यासाठी ३६५ दिवस आणि ६ तासांचा कालावधी लागतो. आणि प्रत्येक वर्षात वरील ६ तासांचा वेळ गृहीत धरल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक ४ वर्षात एक दिवस जास्तीचा होतो आणि लीप वर्ष ३६६ दिवसांचे बनते.

आपल्याला माहीतच आहे की २४ तासांचा एक दिवस असतो आणि प्रत्येक वर्षाचे अधिकचे ६ तास जर आपण एकत्र केले तर चार वर्षातून एक दिवस जास्तीचा बनतो आणि ज्या वर्षात ३६६ दिवस असतात त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात, आणि जो अधिकचा दिवस वाढतो त्या दिवसाला लीप दिवस असे म्हणतात.

लीप वर्ष कसे ओळखतात ? आणि काय आहेत लीप वर्ष ओळखायचे नियम? – How to calculate Leap Year

लीप वर्ष कसे ओळखायचे आणि त्याला ओळखण्याचे काय नियम आहेत हा प्रश्न आपल्याला आलाच असेल, तर चला पाहूया काही नियम ज्यामुळे लीप वर्ष ओळखण्यात मदत होईल.

लीप वर्ष २ नियमांवर सहजरित्या ओळखल्या जाऊ शकते – Rules for Calculating Leap Year

१) पहिले म्हणजे ज्या वर्षाला ४ ने निःशेष भाग जाईल त्या वर्षाला लीप वर्ष म्हणून ओळखावे जसे १९९६ ला ४ ने निःशेष भाग जातो तर आपण १९९६ या वर्षाला लीप वर्ष म्हणू शकतो.

२) दुसरा नियम म्हणजे जर एखाद्या वर्षाला ४०० ने निःशेष भाग गेला तर त्या वर्षाला सुध्दा लीप वर्ष म्हणता येईल, आणि ४०० ने निःशेष भाग न गेल्यास त्या वर्षाला लीप वर्ष म्हणता येणार नाही.

आशा करतो वरील लीप वर्षाविषयी दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला जर लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here