तुम्हाला माहिती आहे का भारतात विमानाचा शोध कोणी लावला?

Who Invented Aeroplane in India

मनुष्य जसजसा प्रगती करू लागला तसतसा “वेग” हा त्या प्रगतीचा अविभाज्य भागच बनत गेला. जे हवे ते त्वरीत, लवकर, वेगात. मग तो एखादा शोध असो, त्या शोधावरचे संशोधन असो, ते त्वरीत हवे आणि यातुन हळुहळु आपल्या जीवनाला गती अर्थात वेग मिळत गेला. या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या वेगामुळे दळणवळणाच्या साधनांमध्ये अतिशय नवनवे शोध लागले बैलगाडीपासुन सुरू झालेला हा दळणवळणाचा प्रवास विमानावर येउन ठेपला एकदाचा! पण हे सगळं वाटतं तितकं सोपं खरच होतं का? तर अजिबात नाही.

आज मनुष्य क्षणात इकडुन तिकडे जाण्याचा विमानाचा हा प्रवास, त्याचा इतिहास, अद्भुत, रोमांचक आणि अविस्मरणीय असाच आहे. विमानाचा जन्म कसा झाला याचा शोध घ्यायला जेव्हां आपण निघतो तेव्हां क्षणात ओठांवर नाव येतं ते राईट बंधुंचं. पण थोडं थांबा! पौराणिक काळापासुन अनेक धर्मांमधे विविध देवतांची उडती वाहने, रामायणातील प्रसिध्द ‘पुष्पक विमान’ असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय ईतिहासात सापडतात.

तुम्हाला माहिती आहे का भारतात विमानाचा शोध कोणी लावला? – Who Invented Aeroplane in India

Who Invented Aeroplane
Who Invented Aeroplane

आधुनिक जगातील पहिले विमानोड्डाण अमेरिकेच्या राईट बंधुंच्याही आधी एका भारतियानं केल्याची माहिती मिळते. तुमचा विश्वास बसत नाहीये?  पण असं म्हणतात की मुंबईतील वेदविदया पारंगत श्री.शिवकर बापुजी तळपदे (Shivkar Bapuji Talpade) यांनी भारव्दाज मुनींच्या “वैमानिक शास्त्र”  या पुरातन ग्रंथावरून एका विमानाची निर्मीती केली होती आणि मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सगळयांच्या समोर 1895 साली जुन महिन्यात त्या विमानाचे यशस्वी उड्डाण सुध्दा करून दाखवलं. या विमानाला त्यांनी ‘मारूतसखा’  असं नामकरण देखील केलं होतं.

मानवरहीत हे विमान 1500 फुट उंचीवर जाऊन नंतर खाली आलं. पुढे 1903 साली म्हणजे साधारण 8 वर्षांनी राईट बंधुंच्या विमानाने केवळ 120 फुटांचे उड्डाण केले होते आणि ते खाली येतांना कोसळलं देखील.

साधारणतः असं मानलं जातं की पक्ष्यासारखं आकाशात उडण्याचं माणसाचं स्वप्नं राईट बंधुंनी 17 डिसेंबर 1903 ला विमान बनवुन पुर्ण केलं आणि विमानाचा शोध हा पाश्चिमात्य लोकांनी लावला आहे. आज यात किंचीतही शंका नाही की विमानाची प्रगती अत्यंत विकसीत अवस्थेत पोहोचली आहे. पण महाभारताच्या काळात आणि त्याच्या आधीही संपुर्ण भारतवर्षात विमानविदयेचा विकास झाला होता इतकेच नाही तर अंतरिक्षात राहण्याकरता नगररचना देखील झालेली होती याचे प्राचीन वा.डमयात अनेक संदर्भ आजही आपल्याला सापडतात.

राईट बंधुंनी विमानाचा शोध लावुन या जगाला अत्यंत वेगवान प्रवासाचं जे स्वप्नं दाखवलं ते आज प्रत्यंक्षात साकार झाल आणि मनुष्य या गतीमान दळणवळणाचा एक भाग झाला. राईट बंधुच्या वडिलांनी त्यांना लहानपणी एक खेळण्यातलं विमान आणुन दिलं, त्याच्यासोबत खेळता खेळता त्यांच्या चाणाक्ष बुध्दीने त्या खेळण्यातल्या विमानाच्या काही बाबी हेरल्या जसं की या विमानाला पक्षांना असतातं तसेच पंख आहेत, सरळ दिशेला हे उडतं ते अगदी पक्ष्यासारखं आणि त्यांचा मेंदु कामाला लागला ही त्या काळी नव्या निर्मीतीची जणु नांदीच होती.

जगातील पहिल्या विमानाचा शोध – First Aeroplane in World

राईट बंधुनी 1903 साली एक विमान बनवलं होतं पण याला पुर्णपणे नियंत्रीत केल्या जाऊ शकत नव्हतं मात्र त्यांनी 1905 साली जे राईट फ्लेयर 3 बनवले त्याला पुर्णपणे नियंत्रीत करता येउ शकत होतं. त्यानंतर 1906 साली अल्बेर्टो सेंटोस डुमोंट यांनी असा दावा केला की त्यांनी पहिले विमान बनवले आहे , त्यानंतर त्यांच्या विमानाने अवघ्या 22 सेकंदात 220 मीटर उंच जाण्याचा विश्वरेकॉर्ड  बनवला होता.

विमान बनवण्यापुर्वी राईट बंधुचा सायकल निर्मीती आणि दुरूस्तीचा व्यवसाय होता. सायकल निर्मीती केली असल्यामुळे त्यांना काही गोष्टींचे चांगले ज्ञान होते त्यांना हे माहीत होते की हलकी पण मजबुत मशीन बनवण्याकरता लाकडासोबत आणि धातु सोबत कसे काम करावे लागते. त्यांना हे देखील माहीत होते की विमान हलके असायला हवे आणि निरंतर नियंत्रणात ठेवता यायला हवे आणि असे विमान बनवण्याकरता खुप अभ्यासाची आवश्यकता त्यांना पडणार होती.

सतत चे संशोधन आणि अभ्यासाने विल्बर राइट यांनी 1903 साली विमान बनवले कॅरोलीना च्या किट्ठी हाॅक किना.यावर त्याचे यशस्वी उड्डाण करण्याकरता ते सज्ज झाले पण दुर्देवाने म्हणा किंवा काही त्रुटी राहिल्याने त्याचे यशस्वी उड्डाण होउ शकले नाही.

पहिल्या प्रयोगात अपयश मिळाल्यावर राईट बंधुनी त्यावर पुनः अभ्यास करण्यास सुरूवात केली. तोपर्यंत त्यांच्या पहिल्या प्रयोगामुळे त्यांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली होती. ऑक्टेव चॅन्युट सारख्या काहीच लोकांनी त्यांच्या प्रयोगाची किंमत आणि महत्व जाणलं होतं. पुढची दोन वर्ष त्यांनी त्यांच्या डिझाईन वर काम करणे सुरू ठेवले.

1905 पर्यंत त्यांनी राईट फ्लायर बनवले या दरम्यान चॅन्युट ने त्यांना विमान उडवण्याच्या स्पर्धांमधे भाग घेण्यास आग्रह केला पण राईट बंधुनी या वेळेस काळजी घेतली ती आपण बनवलेल्या मशीन चे पेटेंट बनवण्याची जेणेकरून त्यावर कुणी हक्क दाखवायला नको.

राईट बंधुंचे नाव हळुहळु संपुर्ण अमेरिकेत आणि युरोपात पसरले. अश्या लोकांकरता ते आदर्श होते जे लोक विमान बनवण्याकरता काम करत होते. राईट बंधुनी जेव्हां राईट फ्लायर 3 ला सार्वजनिक केले तेव्हा कितीतरी जणांना त्यांच्या कामामुळे प्रेरणा मिळाली. पुढे त्यांनी अमेरीकी सैन्यदलाशी चर्चा करून युध्दप्रसंगी विमानाचा उपयोग करत सेना पायलटांना प्रशिक्षीत करण्याकरता पुढाकार देखील घेतला.

हळुहळु विमान हे आजच्या जगातील एक महत्वाचं जलद दळणवळणाचं साधन बनलं. प्रवासी , माल , युध्दसाहित्य आदींची वाहतुक करण्याकरता विमानाचा परिणामकारक वापर आज करता येतो. विमान आकाशात उडण्याकरता आणि आकाशातुन उतरण्याकरता विमानतळाचा वापर होतो.

ढोबळमानाने विमानाच्या रूपाचा विचार केल्यास विमानाचे धड, पंख आणि शेपुट अशी विभागणी आपल्याला करता येते. धडामधे प्रवासी, माल, युध्दसाहित्य, वैमानिक कक्ष, इंधन आणि नियंत्रणसाधनं असतात. पंखांचा उपयोग मुख्यतः तरंगण्याकरता होतो तसच उड्डाण आणि वळण्याकरता तर शेपटाचा उपयोग मुख्यतः वळण्याकरता केला जातो.

काळाबरोबर विमानाने देखील कात टाकली आहे. आता जुन्या बोईंग 777 प्रवासी विमानासोबत, युध्दप्रसंगात वापरले जाणारे अत्याधुनीक सोई सुविधांनी सज्ज असे विमान, तसच पाण्यावर उतरणारे विमान असे कितीतरी नवीन सुधारणा असलेली विमानं आज आपल्याकरता सज्ज आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top