आकाशातून विमानासोबत कुठे गायब झाली असणार ही महिला पायलट ८३  वर्षांपासून अजून कोणालाही कळले नाही हे गुपित

Amelia Mary Earhart

आपण दैनंदिन जीवनात बरेचश्या अश्या घटना ऐकतो, की ज्यामध्ये विमान क्रॅश होते आणि पायलट जखमी होतात, आणि ते विमान कश्यामुळे क्रॅश झाले, त्यांनंतर यावर शोध सुरू होतो. आणि काही दिवसातच विमान क्रॅश होण्यामागचे कारण समोर येते आणि सर्वांना माहिती होते पण इतिहासात ८३ वर्षापूर्वी एक अशी घटना घडली की त्या घटनेसारख्या घटना खूप कमी पहायला मिळतात. एखादी व्यक्ती विमानाची उडाण घेतो आणि तो त्यांनंतर हवेतच कुठे तरी गायब होतो आणि गायब झालेल्या त्या व्यक्तीचा शोध सुध्दा लागत नाही. अशीच काहीशी घटना आजच्या लेखात आपण पाहणार आहोत एक अशी घटना ज्या घटनेवर आपला विश्वास सुध्दा बसणार नाही. तर चला पाहूया.

 महिला पायलट एमेलिया मैरी एयरहर्ट – Amelia Mary Earhart American First Female Aviator

Amelia Earhart
Amelia Earhart

जगात विमानाविषयी घडलेल्या अघटित घटना ऐकायला मिळतात, परंतु एक अशी घटना ज्या घटनेला ८३ वर्ष पूर्ण झालेत तरी सुध्दा या घटनेविषयी आणि त्या घटनेत गायब झालेल्या पायलट विषयी कोणालाच अजूनही माहीती नाही.

ही घटना आहे एका महिला पायलट ची ज्या विमान उडवण्यात तरबेज होत्या. आणि बाकी वैमानिकांपेक्षा त्यांच्या जवळ विमान चालविण्याचे एक वेगळे कौशल्य होते, पण एक दिवस त्यांनी नेहमीसारखी आपल्या विमानासोबत भरारी घेतली आणि त्यांच्यासोबत असं काय अघटित घडलं कि त्या अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेला विमानाच्या क्षेत्रातील एक रहस्यमय घटना म्हणून ओळखल्या जाते. या महिला पायलट चे नाव होते एमेलिया मैरी एयरहर्ट. आणि या महिलेला जादूगर पायलट म्हणून सुध्दा ओळखल्या जातात असे.

कारण त्यांनी सर्वात आधी अटलांटिक महासागराला पार करण्याचे धाडस केले होते. आणि त्या अटलांटिक महासागराला पार करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी हे अलौकिक कार्य २० मे १९३२ साली करून दाखविले होते. यानंतर त्यांना ‘क्वीन ऑफ द एयर’ असे संबोधले जाऊ लागले.आणि त्यानां सयुंक्त राज्य सशस्त्र सेना यांच्या “डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस” या पुरस्काराने गौरविण्यात आलं

अटलांटिक महासागराला पार करणे हि त्यांची एकच उपलब्धी नसून त्यांनी अनेक असे कार्य विमानाच्या क्षेत्रात केले होते. त्यांनी आकाशात सुध्दा अनेक इतिहास रचले होते, जसे विमानाने १८,४१५ फूट उंचीवर जाऊन इतिहास रचला तेव्हाच्या काळात एवढ्या उंचीवर कोणीही विमान उडवले नव्हते. तेच नाही तर त्यांनी मेक्सिको सिटी पासून तर न्यूयॉर्क पर्यंत एकटीने एवढे लांब अंतर पार केले होते. आणि त्यामध्ये सुध्दा त्या पहिल्या महिला बनल्या होत्या ज्यांनी हे अंतर पार केले होते.

एमेलिया यांना विमान उडविण्याची एवढी आवड होती की त्यांनी स्वतःसाठी एक जुने विमान विकत घेतले होते. आणि त्यावर त्या ट्रेनिंग करत असत.त्यांनी त्यांच्या त्या दोन सीट च्या विमानाचे नाव केनरी ठेवले होते. याच जहाजाने त्यांनी १४,००० फूट उंच जाऊन सर्वात आधी इतिहास रचला होता.

त्यांनंतर त्यांच्यासोबत एक घटना घडली आणि तो दिवस त्यांच्या जीवनाचा शेवटचा दिवस होता. आणि ती दिनांक होती २ जुलै १९३७. हा दिवस त्यांच्या जीवनातील शेवटचा दिवस ठरला, विमानाची झेप घेतली आणि विमान मध्य-प्रशांत सागराच्या हॉवलैंड बेटाजवळ त्याच्या  विमानाच्या सोबत गायब झाल्या. यानंतर अमेरिकेच्या सरकार ने त्यांना शोधण्याचे भरपूर प्रयत्न केले, त्या बेटाजवळील प्रत्येक ठिकाण शोधून काढण्यात आले पण त्यांचा शोध लागला नाही. यानंतर ५ जानेवारी १९३९ ला त्यांना मृत घोषित केले. पण अजूनही हे रहस्यच राहिले आहे की शेवटी त्या आणि त्यांचे विमान कुठे गायब झाले.

अजूनही हे एक रहस्यच राहिले आहे. कोणीही याचा शोध करू शकले नाही आहे. तर वरील लेखात आपण या रहस्यमय घटनेबद्दल थोड्याश्या प्रमाणात माहिती पाहिली. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here