पब्लिक टॉयलेट चे दरवाजे लहान असण्यामागे हे कारण आहे! जाणून घ्या या लेखातून

Why are Public Toilet Doors Short?

आपल्या दैनंदिन जीवनात अश्या बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपल्या आजूबाजूला असतात परंतु आपल्याला त्या गोष्टींविषयी माहिती नसते किंवा त्या बारीक गोष्टींकडे आपण एवढं लक्षच देत नसतो, परंतु प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण अवश्य असत, आणि अश्याच काही गोष्टींमागचे कारण जाणून घेण्यासाठी आपला मेंदू नेहमी तत्पर असतो.

आपण बरेचदा मॉल किंवा ऑफिसेस मधील टॉयलेट  बघितले असतील, त्या टॉयलेट चे दरवाजे खालच्या बाजूने छोटे असल्याचे आपल्याला दिसून आले असेलच पण या मागचं नेमकं कारण काय असेल, की पब्लिक टॉयलेट चे दरवाजे खालच्या बाजूने छोटे असतात? तर आजच्या या छोट्याशा लेखात आपण पाहणार आहोत की यामागे नेमके कोणती कारणे असतील तर चला पाहूया..

पब्लिक टॉयलेटचे दरवाजे छोटे का असतात – Why are Public Toilet Doors Short?

Why are Public Toilet Doors Short
Why are Public Toilet Doors Short

पब्लिक टॉयलेट चे फक्त दरवाजेच नाही तर टॉयलेट सुध्दा थोडस खुले असते, त्यामध्ये वरच्या बाजूला सुध्दा हवा येते, पब्लिक टॉयलेट म्हटले की दिवसभर त्यांचा वापर हा सुरूच असतो, मग दिवसभराच्या वापरानंतर पब्लिक टॉयलेट ची आतील स्टाईल किंवा फरशी खराब होतेच आणि पब्लिक टॉयलेट चे दरवाजे छोटे असल्यामुळे तेथील स्टाईल किंवा फरशी ची बाहेरूनच योग्य ती साफसफाई केल्या जाऊ शकते, हे सुध्दा एक छोटस कारण आहे पब्लिक टॉयलेट चे दरवाजे छोटे असण्यामागच.

अशाही काही परिस्थिती समोर आलेल्या आहेत की टॉयलेट मध्ये मेडिकल ची तात्काळ गरज भासते आणि टॉयलेट चे दरवाजे पूर्णपणे बंद असल्यामुळे कोणाला बाहेर माहितीही होत नाही त्यासाठी सुध्दा पब्लिक टॉयलेट चे दरवाजे हे लहान किंवा छोटे असतात.

सोबतच बरेच लोक या ठिकाणाचा गैरवापर करतांना आढळतात आणि सार्वजनिक ठिकाणी काही गोष्टी करणे कायद्याने गुन्हा मानले जाते, त्यामुळे सुध्दा पब्लिक टॉयलेटचे दरवाजे हे छोटे आणि लहान असतात जेणेकरून पब्लिक टॉयलेटचा कोणीही गैरवापर करणार नाही.

बरेचदा टॉयलेट मध्ये लहान मुलं आतून दरवाजा बंद करून घेतात आणि त्यांना तो दरवाजा उघडता येत नाही, अश्या परिस्थिती मध्ये काय करावे सुचत नाही मग शेवटी त्या टॉयलेटचा दरवाजा तोडून लहान मुलांना बाहेर काढण्याच्या अनेक गोष्टी आपण पहिल्या आहेत. म्हणून पब्लिक टॉयलेटचे दरवाजे छोटे तसेच लहान ठेवण्यात येतात.

तर या लेखातून आपल्याला समजायला मदत झाली असेल की पब्लिक टॉयलेट चे दरवाजे लहान का असतात, आशा करतो लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास  या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here