…म्हणून स्कूल बस चा रंग पिवळा असतो.

Why Are School Buses Yellow

मुलांना शाळेत घेऊन जाणारी स्कुल बस तर आपण पाहिली असेलच, जी पिवळ्या रंगाची एक बस असते आणि शाळेतील लहान मुलांना ती ने-आण करण्याचे काम करते. ज्या प्रत्येक स्कूल बस वर ती बस ज्या स्कूल ची आहे त्या स्कूल चे नाव असते.

आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळते कि ज्याप्रमाणे ट्राफिक सिग्नल मध्ये वेगवेगळा रंग पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे स्कूल बस चा रंग सुद्धा आपल्याला पिवळा पाहायला मिळतो. मग स्कूल बस चा रंग पिवळा का असतो. आणि या स्कूल बस ची सुरुवात केव्हापासून झाली.

तर चला जाणून घेवूया. कि का स्कूल बस चा रंग पिवळा असतो.

स्कूल बस चा रंग पिवळाच का असतो? येथे आहे कारण – Why are School Buses Yellow

Why are School Buses Yellow
Why Are School Buses Yellow

स्कूल बस चा वापर सर्वात आधी १९ व्या शतकात उत्तर अमेरिकेत झाला होता. तेव्हा स्कूल बस सारखे वाहन नव्हते पण स्कूल पासून दूर राहणाऱ्या मुलांसाठी टांगा गाडीची सुविधा केलेली होती, तेव्हा मुलांना ने-आण करण्यासाठी टांगा गाडी चा उपयोग केल्या जात असे.

त्यानंतर २० व्या शतकात लाकडी मोटार गाड्यांना पिवळा आणि नारिंगी रंग दिला जात होता कारण या गाड्या बाकी गाड्यांपेक्षा वेगळ्या दिसायला हवा.

स्कूल बस ला पिवळा रंग का असतो? – Why Are School Buses Yellow

कारण पिवळा रंग हा उर्जेचे प्रतिक मानल्या जातो, सोबतच हा रंग बाकी रंगांपेक्षा दिसायला वेगळा आहे आणि त्याची वेवलेन्थ हि ६५०mm इतकी आहे, च्यामुळे हा रंग पसरत नसून आणि दुरून सुद्धा दिसायला सोपी जातो. आणि डोळ्यांना सर्वात आधी बाकी रंगांपेक्षा पिवळा रंग लवकर दिसतो, च्यामुळे स्कूल बसेस चा रंग पिवळा ठेवला जातो.

आपल्या देशातच स्कूल बसेस चा रंग पिवळा नसून विदेशात सुद्धा स्कूल बसेस चा रंग पिवळाच आहे, मग ते अमेरिका, असो कि कॅनडा.

स्कूल बसेस साठी न्यायलयाने जारी केलेले आहेत काही नियम – School Bus Safety Rules

1) ज्या स्कूल ची बस असेल त्या स्कूलचे नाव स्कूल वर असणे आवश्यक आहे.
2) स्कूल बस मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
3) स्कूल बस मध्ये प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे,
4) स्कूल बसची स्पीड ४० किलोमीटर प्रती तासाच्या वर जायला नको.

या नियमांचे पालन शाळेला करावे लागते. हे नियम उच्च न्यायालयाने २०१२ ला हे नियम जारी केले होते. या नियमांचे पालन करणे प्रत्येक स्कूल ला अनिवार्यच नसून तर त्यांचे कर्तव्य आहे.

अश्या प्रकारे स्कूल बस चा कलर तसेच त्या विषयी काही नियम आपण या लेखात पाहिले.तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत,
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here