विजेच्या तारांवर बसलेल्या पक्षांना करंट का लागत नसेल? चला जाणून घेऊया

Why do Birds Sit on Power Lines in Winter

म्हणतात की कोणत्याही गोष्टींशी खेळा पण चुकूनही विजेशी खेळू नका, सगळे कदाचित माफ करतील पण वीज कोणालाही माफ करत नाही, पण मग हा विचार येतो की जेव्हा मी एखाद्या पक्षाला विजेच्या तारांवर बसलेलं पाहतो तेव्हा डोकं काम करत नाही, जर वीज कोणालाच सोडत नाही, जसे तुम्ही स्त्री आहात की पुरुष, हिंदू आहात की मुस्लिम, गोरे आहात की काळे, कोणीही असो जर एखाद्याने विजेशी खेळण्याचा प्रयत्न केला तर वीज त्याचा प्राण घेऊनच सोडते. मग तारांवरील पक्षांना विजेमुळे काहीच कसं होत नाही. मलाच नाही तर बरेच लोकांना हा प्रश्न पडत असेल, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत पक्षांना तारांवर बसून सुध्दा करंट का लागत नाही, तर चला पाहूया..

पक्षी विजेच्या तारांवर बसतात तरीही त्यांना करंट का लागत नाही – Why Don’t Birds Get Electrocuted on Electric Wires

Why Don't Birds Get Electrocuted on Electric Wires
Why Don’t Birds Get Electrocuted on Electric Wires

सर्वात पहिले आपण पाहणार आहोत की करंट म्हणजे नेमकं काय असतं, करंट म्हणजे इलेक्ट्रॉन चे एका ठिकानकाहून दुसऱ्या ठिकाणी तारांच्या माध्यमातून वाहून जाणे म्हणजे करंट होय त्याला आपण मराठीत विद्युत धारा म्हणतो. हाच करंट आपल्या घरापर्यंत येतो आणि जमिनीत अर्थिंगच्या साहाय्याने जाऊन सर्किट पूर्ण करतो.

म्हणजे जेव्हा करंट चे सर्किट पूर्ण होते तेव्हा विजेचा प्रवाह हा घरातील तारांमधून प्रवाहित होत असतो.इलेक्ट्रॉन्स ना प्रवाहित होण्यासाठी एका पूर्ण सर्किट ची आवश्यकता असते, जर सर्किट पूर्ण झाले तरच विजेचा प्रवाह हा होत असतो. जर सर्किटच पूर्ण होत नसेल तर इलेक्ट्रॉन सुध्दा प्रवाहित होत नसतात. आणि इलेक्ट्रॉन्स जर प्रवाहित झाले नाहीत तर करंट सुध्दा लागणार नाही.

इलेक्ट्रॉन्स नेहमी तो रस्ता निवडतात ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नसतो. जर एखादी वस्तू इलेक्ट्रॉन्स च्या मध्ये असली तर इलेक्ट्रॉन्स धातुमधून आपला प्रवास सुरूच ठेवतात. आणि आपल्याला सुध्दा चांगल्या प्रकारे माहिती आहे, की धातू हे विजेचे सुवाहक असतात. म्हणजेच विजेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी धातू उपयोगी ठरतात.

जर एखादा पक्षी तारांवर बसलेला असला तर त्याला कोणत्याही प्रकारचा करंट म्हणजेच विजेचा झटका लागत नाही, कारण जेव्हा तो तारांवर बसलेला असतो तेव्हा त्याचा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी संपर्क नसतो. त्यामुळे त्याला करंट लागत नाही, पण तेच जर मनुष्याने विजेच्या ताराला हात लावला तर त्याला करंट लागतो त्याविरुद्ध जर मनुष्याने सुध्दा कोणत्याही गोष्टींशी संपर्क न ठेवता विजेच्या खुल्या ताराला हात लावला तर त्यालाही करंट लागणार नाही.

सांगायचे एवढंच आहे की जो पर्यंत सर्किट पूर्ण होत नाही तोपर्यंत करंट लागत नाही. करंट लागण्यासाठी अर्थींग असणे आणि सर्किट पूर्ण होणे आवश्यक असते. पण जेव्हा पक्षी तारांवर बसलेले असतात तेव्हा कोणत्याही प्रकारचे सर्किट पूर्ण होत नाही सोबतच कोणताही अर्थींग मिळत नाही म्हणून पक्षांना तारांवर बसलेले असल्यावर ही करंट लागत नाही.

वरील लेखातून आपल्याला माहिती झाले असेल की तारांवर बसलेल्या पक्षांना का करंट लागत नाही, तर आशा करतो लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका,सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here