अपराधी व्यक्तीच्या तोंडाला का लपविल्या जाते? जाणून घ्या या लेखातून

Why Faces of Criminals are Covered

दैनंदिन जीवनात मीडियावर किंवा वृत्तपत्रांमध्ये आपण पाहत असतो की एखादा गुन्हा करून जेव्हा अपराध्याला पकडल्या जात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा लावून त्याचा चेहरा लपवला जातो, जर तो अपराधी आहे तर त्याला लोकांसमोर दाखवलं पाहिजे त्यांनंतर त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, जर असं होतं नसेल तर अपराधी व्यक्तींची संख्या वाढेल त्यांना वाटेल की आपला चेहरा जगासमोर येत नाही तर आपण शिक्षा भोगल्या नंतर सुध्दा पुन्हा अपराध करणे शक्य आहे.

अश्याच प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येत असतील की हे तर अपराध्या व्यक्तीसाठी एक प्रकारची सूट आहे, तर अश्या पैकी कोणतीही गोष्ट नाही, त्यांच्या चेहऱ्याला का झाकलं जातं. यामागे सुध्दा कारण आहे तर आजच्या या छोट्याशा लेखात आपण पाहणार आहोत की नेमके असे काय कारण असेल की तो व्यक्ती अपराधी असून सुध्दा त्याचा चेहरा सर्वांपासून लपविल्या जातो. तर चला पाहूया यामागे नेमकं कारण काय असतं.

अपराधी व्यक्तीचा चेहरा लपवण्या मागचं कारण काय – Why Hide Face of Criminals

Why Hide Face of Criminals
Why Hide Face of Criminals

बऱ्याच लोकांच अस मत आहे की पोलिसांनी अपराधी व्यक्तीचा चेहरा मिडियासमोर तसेच लोकांसमोर दाखवायला हवा, जेणेकरून त्या अपराध्याला कोणीही ओळखू शकणार. पण आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो की त्या अपराध्याचा चेहरा लपविण्या मागे काही कारणे आहेत जसे ‘मानवाधिकार हक्क’ आपल्या संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीला तोपर्यंत अपराधी म्हणून घोषित केल्या जात नाही जोपर्यंत त्याला कोणतेही न्यायालय शिक्षा देत नाही.

कधी कधी तर अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा पीडित व्यक्ती पोलीस स्टेशन ला तक्रार (FIR) करतो, आणि तेव्हा अपराधीला सुध्दा ओळखू शकत नाही. अश्या वेळेस पोलीस अपराधी ओळखण्याची परेड सुध्दा करतात. ज्यामध्ये पीडित व्यक्तीला अपराधी आणि काही लोकांनां दाखवल्या जाते. जर अगोदरच अपराधी व्यक्तीचा चेहरा सर्वांसमोर आला तर पीडित व्यक्तीने केलेल्या ओळखीवर विश्वास कसा ठेवल्या जाईल म्हणून अपराधी व्यक्तीचा चेहरा लपविल्या जातो.

तर आशा करतो आपल्याला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here