भारतीय ध्वजाला तिरंगा का म्हटलं जातं? त्यामध्ये तर चार रंग असतात. जाणून घ्या या लेखाच्या माध्यमातून

Indian Flag is called Tiranga

भारतातील लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे की आपला भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे. आणि प्रत्येकाला त्या तिरंग्याच्या अभिमान आहे.   फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी ला तिरंग्याला फडकवल्या जात नाही तर प्रत्येक भारतीयांच्या हृदयात तिरंगा आहे. आणि जवळ जवळ सर्वांनाच हेच माहिती आहे की ह्यामध्ये तीन रंग असतात, पण तिरंग्याच्या पाहिले तर त्यामध्ये चार रंगांचा समावेश असतो, एक केशरी, पांढरा, हिरवा आणि अशोक चक्राचा निळा. पण ह्या चौथ्या रंगाविषयी कोणीही बोलत नाही. मग चार रंग असूनही आपल्या ध्वजाला तिरंगा का म्हटल्या जात.

आपल्याही मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल, तर मित्रहो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की आपल्या भारतीय ध्वजात चार रंग असूनही त्याला तिरंगाच का म्हटल्या जात. आशा करतो आपल्याला लेख आवडेल. तर चला पाहूया..

म्हणून भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे – Why Indian Flag is Called Tiranga

Why Indian Flag is Called Tiranga
Why Indian Flag is Called Tiranga

तिरंगा म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे आपल्या देशाचा ध्वज उभा राहतो, मस्त उंच उंच फडकणारा गगनचुंबी असा. प्रत्येकाला आपल्या तिरंग्याच्या अभिमान आहे कारण तो आपल्या देशाचा अभिमान आहे. आणि सर्वांना जवळ जवळ हेच माहिती आहे की तिरंग्यात तीन रंग असतात पण तिरंग्यात तीन नाही तर चार रंग असतात. सर्वात आधी आपण प्रत्येक रंगाविषयी माहिती पाहू की प्रत्येक रंग आपल्याला कशाची शिकवण देतो आणि प्रत्येक रंग कशाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जातो.

तिरंग्यामध्ये असणारे तीनही रंग कशाप्रकारे स्वतःला दर्शवतात ते पाहूया सर्वात आधी येतो केशरी रंग आणि केशरी रंग आपल्याला त्याग, कर्तुत्व आणि साहस या दोन गोष्टींना दाखवते. म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींना दर्शवण्याचे काम तिरंग्यातील पहिला केशरी रंग दाखवतो.

त्यानंतर पांढरा रंग शांतता, प्रकाश आणि सत्याच प्रतीक म्हणून ओळखल्या जातो. तसेच आपल्याला पांढरा रंग शांततेच प्रतीक आहे. आणि सर्व त्याला या गोष्टीसाठी ओळखतात.

त्यानंतर आपल्या तिरंग्यात येतो हिरवा रंग आणि हिरवा रंग आपल्याला समृद्धी, विश्वास, आणि प्रगती या सर्व गोष्टींना दाखविण्याचे कार्य करते. म्हणजेच या सर्व गोष्टींचे प्रतीक हा हिरवा रंग आहे.

आता आपल्या तिरंग्यात असलेले अशोक चक्र आपल्याला काय दर्शवते, तर आपले अशोक चक्र आपल्याला हे दर्शवते की सर्व धर्म एकत्र आहेत आणि ते चक्र आणखी दर्शवते ते म्हणजे चकाप्रमाणे नेहमी पुढे चालत राहणे.

अशोक चक्र आपल्या ध्वजाचे चौथे प्रतीक आहे. आणि त्या अशोक चक्राचा रंग निळा आहे पण मग तरीही ध्वजामध्ये चार रंग असताना का याला तिरंगा म्हटल्या जात. तर त्यामागे असे कारण आहे की तिरंग्यामध्ये असलेल्या अशोक चक्राला रंग म्हणून नाही तर एक चौथे प्रतीक म्हणून मानल्या जाते ह्यामुळे या चक्राला रंग म्हणून उद्देशल्या जात नाही.

म्हणूनच आपल्या देशाच्या ध्वजाला तिरंगा म्हणून ओळखले जाते. तर वरील लेखात आपण तिरंग्याविषयी थोडीशी माहिती पहिली आशा करतो आपल्याला ह्या लेखात दिलेली माहिती आवडली असणार आपल्याला दिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here