आपल्याला तहान का लागते? जाणून घ्या या लेखातून

Panyache Mahatva in Marathi

आपल्याला माहिती आहे की पाणी हेच आपले जीवन आहे, पृथ्वीवरील प्रत्येक सजीव हा विना पाण्याचा राहूच शकत नाही, तो जर विना पाण्याचा राहिला तर काही दिवसात त्याची मृत्यू होईल म्हणूनच पाण्याला आपण जीवन संबोधतो. सुरुवातीला पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा संपूर्ण पृथ्वी ही पाण्याने व्यापलेली होती. आणि प्रत्येक जीवाची सुरुवात ही पाण्यातूनच झाली म्हणून सुध्दा पाणी एक प्रकारे आपले जीवनच आहे.

आपण ही ऐकत असाल की एका दिवसातून एवढं पाणी पिणे महत्वाचं आहे. आणि शरीराला दिवसातून पाण्याची एवढी मात्रा मिळणे आवश्यकच आहे. पण बरेच जणांना एक प्रश्न असतो की आपल्याला तहान का लागत असेल बर ? यामागे नेमकं कारण काय असेल बरं तर आजच्या या लेखातून आपण पाहणार आहोत की माणसाला तहान का लागते? तर चला पाहूया..

 शरीराला पाण्याची आवश्यकता का भासते – Why is water Important to Humans?

Why is water Important to Humans
Why is water Important to Humans

आपल्याला तहान का लागते? – Why we Feel Thirsty

मनुष्याचे शरीर ज्या पेशींपासून बनलेला आहे त्या पेशींमध्ये ७५% – ८०% पाणी भरलेलं असते, जेव्हा या पेशींमध्ये पाण्याची कमतरता भासते तेव्हा आपल्याला तहान लागते आणि आपल्याला तहान लागल्यावर पाणी पितो, आपण जे पाणी पितो त्या पाण्याने शरीरातील पाण्याची कमी भरून निघते. आणि आपल्या शरीराचे कार्य व्यवस्थित रित्या चालू राहते.

शरीरात पाण्याची कमतरता का भासते? – Why does body feel Dehydrated

ज्या प्रमाणे एखाद्या यंत्राला सतत कार्य केल्यामुळे त्यामध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता भासते. त्याला नेहमी नेहमी दुरुस्त करून किंवा त्यामध्ये ऑइल टाकून त्याला चालविल्या जाते. त्याचप्रमाणे आपले शरीर सुध्दा एखाद्या यंत्राप्रमाणे कार्य करत असते.

एका दिवसाला मानवी शरीरातून जवळजवळ ३ लिटर पाणी बाहेर पडते. आपल्या शरीरातील अर्धा लिटर पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर पडते. १ लिटर स्वासाच्या स्वरूपात बाहेर पडते. आणि दीड लिटर पाणी आपल्या मूत्राच्या स्वरूपात बाहेर पडते. असे मिळून एकत्रित रित्या ३ लिटर पाणी एका दिवसाला मानवी शरीर बाहेर टाकते.

त्यामुळेच जर आपण दिवसाला ३ लिटर पाणी पिले नाही तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते,म्हणून दररोज किमान ३-४ लिटर पाणी आपण पिले पाहिजे. जेणेकरून आपल्या शरीरातील सर्व क्रिया ह्या सुरळीत रित्या चालू राहतील.

माणूस पाण्याविना किती दिवस जिवंत राहू शकतो? – How many days can a person live without water

अन्नाशिवाय माणूस जवळ जवळ ४५ दिवस जिवंत राहू शकतो, झोपेशिवाय मनुष्य जवळ जवळ १० दिवस जिवंत राहू शकतो, परंतु पाण्याशिवाय मनुष्य ५-६ दिवसांपेक्षा जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही.

कारण पाणी माणसाच्या शरीरातील खूप महत्वाचे फॅक्टर आहे, पाणी नाही तर माणसाचे जीवन नाही, या निमित्ताने च एक चांगला संदेश ही दिला जाईल की पाण्याविना मनुष्य जीवन काहीही नाही म्हणून पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करा जेणेकरून आपल्याला भविष्यात पाण्याच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.

तर आपण वरील छोट्याश्या लेखात आपण पाहिले की आपल्याला तहान का लागते आणि आपल्या शरीरासाठी पाणी किती आवश्यक आहे, आशा करतो आपल्याला वरील लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा छोटासा लेख आवडला अस्वल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top