• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Why Sea Water is Salty 

ह्या कारणामुळे समुद्राचे पाणी खारे आणि नद्यांचे पाणी पिण्यासारखे असतं

July 23, 2020
23 January History Information in Marathi

जाणून घ्या 23 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 23, 2021
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
22 January History Information in Marathi

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 22, 2021
What to Know Before Investing

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

January 21, 2021
21 January History Information in Marathi

जाणून घ्या 21 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 21, 2021
Ramacha Palna

प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा संग्रह

January 20, 2021
20 January History Information in Marathi

जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 20, 2021
Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार

January 19, 2021
19 January History Information in Marathi

जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 19, 2021
Dattacha Palana

दत्ताचा पाळणा संग्रह

January 18, 2021
Morning Habits to Start the Day Right

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

January 18, 2021
18 January History Information in Marathi

जाणून घ्या 18 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 18, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, January 23, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

ह्या कारणामुळे समुद्राचे पाणी खारे आणि नद्यांचे पाणी पिण्यासारखे असतं

Why Sea Water is Salty 

पाण्याला आपले जीवन म्हटल्या गेले आहे. आपलेच नाही तर पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सजीवला जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी नसेल तर पृथ्वीवरील हिरवळ तसेच सजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, म्हणून आपल्या आजूबाजूला आपण बरेचदा पाणी वाचविण्यासाठी जागरूकता मोहीम पाहत असतो. कारण म्हणतात ना ‘जल है तो कल है’ म्हणजेच आज जर पाणी वाचवले तर उद्याचे आपले भविष्य वाचेल.

आज पाण्याविषयी आपण बोलतच आहोत तर आपल्या आजच्या लेखाचे शीर्षक आपण वाचलेच असेल आणि बरेचदा आपल्याला सुध्दा हा प्रश्न पडला असेल की, समुद्राच्या पाण्यात आणि नदीच्या पाण्यात एवढा अंतर का असतो, की समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसते आणि नदीचे पाणी पिण्यायोग्य असते. जर पाहिले तर नदीचे पाणी समुद्रालाच जाऊन मिळते. तर आजच्या लेखात या विषयी थोडीशी माहिती पाहूया.

समुद्राच्या पाण्यात आणि नदीच्या पाण्यात एवढा फरक – Why Sea Water is Salty

Why Sea Water is Salty 
Why Sea Water is Salty

परंतु हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी समुद्राविषयी माहिती पाहावी लागेल की समुद्राचे निर्माण कश्या प्रकारे झाले, त्यामध्ये एवढं सार पाणी कोठून आले, आणि एवढं सारं पाणी आल्यानंतर ते पाणी खारे कसे काय झाले. तर जर वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून पाहिले असता आपल्याला असे माहिती पडते की समुद्राचा जन्म म्हणजेच समुद्राचे निर्माण हे ५० ते १०० करोड वर्षांपूर्वी झाले आहे.

बिग बँग थेरी नंतर सुरवातीला आपली पृथ्वी ही एक आगीचा गोळा होती हे आपणा सर्वांना माहिती आहे त्यांनंतर या हा आगीचा गोळा थंड होण्यासाठी हजारो वर्ष लागली, पृथ्वी थंड होताना निघालेल्या वायूंमुळे त्या वायूचे रूपांतर वायू असणाऱ्या ढगांमध्ये झाले. हे वायू असणारे ढग पृथ्वीच्या चहूकडे वातावरणात पसरले आणि जेव्हा हे ढग भारी झाले तेव्हा लाखो वर्षे पृथ्वीवर सतत पाऊस पडत राहिला.

या पावसामुळे पृथ्वीवर निर्माण झालेले खड्डे या पावसाने भरून निघाले, आणि या भरलेल्या खड्ड्यांना आपण आज समुद्र म्हणून संबोधत आहोत. याच समुद्रात असंख्य जीव आपले अस्तित्व घेऊन जगत आहेत, समुद्रात ब्लु व्हेल पासून तर छोट्याश्या माश्या पर्यंत हजारो प्रजाती राहतात. ज्या प्रमाणे समुद्र आहे त्याच प्रमाणे नदी नाले आहेत पण फरक एवढाच आहे की समुद्रात असणारे पाणी मोठ्या प्रमाणात आहे, आणि नदी नाल्यांमध्ये हेच पाणी समुद्राच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात असते.

नदी नाल्यांमध्ये सुध्दा समुद्राचेच पाणी असते. आपण लहानपणी विज्ञानात शिकलो आहोत ‘निसर्ग चक्र’ किंवा ‘पाण्याचे चक्र’ म्हणून ज्यामध्ये आपल्याला शिकवले गेले होते की समुद्रा मध्ये असलेल्या पाण्याची सूर्याच्या प्रकाशामुळे वाफ होऊन ती वाफ ढगांच्या आकारात रूपांतरित होऊन त्या वाफेचे मोठं-मोठाले ढग निर्माण होतात आणि त्याच ढगांमधून आपल्या जमिनीवर पाणी पडते. जमिनीवर पडलेलं पाणी काही प्रमाणात जमिनीत मुरते. त्यांनंतर बाकीचे पाणी जमिनीवरून वाहत जात नदी नाले या पाण्याच्या स्रोतांना जाऊन मिळते.

नदी नाल्यांतून हे पाणी सतत समोर वाहत असल्याने या पाण्यात जमिनीतील खनिजे  समाविष्ट होतात. आणि त्यांनंतर हे पाणी सुध्दा पिण्यासाठी योग्य ठरत. पण काहीही झाले तरी सुध्दा हे नदी नाल्यांचे पाणी शेवटी जाऊन समुद्राला मिळतं आणि आपल्याला माहितीच आहे की समुद्राचे पाणी हे पिण्यायोग्य नसतं.

त्यामागे कारण असे आहे की आपल्याला समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात  सोडियम आणि क्लोराईड यांचे प्रमाण मिळते आणि यांचे प्रमाण जास्त असण्यामागे एक कारण हे सुध्दा आहे की जेव्हाही नदी नाल्यांचे पाणी जाऊन समुद्राला मिळतं तेव्हा त्या पाण्यामध्ये असलेले हे सोडियम आणि क्लोराईड यांची थोड्या थोड्या प्रमाणात समुद्रात असलेल्या पाण्यात साठवणूक होत जाते आणि या मोठ्या प्रमाणात झालेल्या साठवणुकी मूळे आपल्याला समुद्राचे पाणी खारे पाहायला मिळते. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने यामागे एक पौराणिक कथा असलेलं सुध्दा आपल्याला पाहायला मिळते, ज्या कथेच्या आधारावर समुद्राचे पाणी खारे आहे असे पुराणात सांगितल्या गेले आहे.

ती पौराणिक कथा अशी की एक दिवस समुद्र देवाने माता पार्वती ला विवाहासाठी बोलणी केली परंतु माता पार्वतीने भगवान शंकरांना आधीच आपले पती मानले होते. त्यांनंतर समुद्र देवानी भगवान शंकरांना अपशब्द बोलले आणि एक प्रकारे त्यांच्या विषयी वाईट बोलले आणि हे सर्व माता पार्वतीला सहन झाले नाही, त्यांनंतर माता पार्वतीने समुद्र देवाला श्राप दिला की ज्या गोड्या पाण्यावर तुला अहंकार आहे ते पाणी आजपासून पिण्यायोग्य राहणार नाही, आणि तेव्हापासून समुद्राचे पाणी हे पिण्यायोग्य राहिले नाही. अशी यामागे एक पौराणिक कथा असल्याची मान्यता आहे.

तर वरील लेखात आपण पाहिले की समुद्राचे पाणी हे खारे का असते आणि नदीचे पाणी पिण्यायोग्य का असते, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

Related Posts

How Astronauts Live In Space
Information

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

Living in Space मित्रहो, अवकाश म्हटल म्हणजे आपल्या समोर बरेच प्रश्न येतात. जसे, कसे असेल तिथले वातावरण?  पृथ्वीच्या बाहेर जीवन...

by Editorial team
January 22, 2021
What to Know Before Investing
Information

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

What to Know Before Investing एक सुंदर प्रकारचे जीवन जगण्याची इच्छा ही सर्वाचीच असते, परंतु त्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे...

by Editorial team
January 21, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2020 MajhiMarathi.Com

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2020 MajhiMarathi.Com