खरंच चंदनाच्या झाडावर साप राहतात का? जाणून घ्या या लेखातून.

Saap Chandanachya Zadavar ka Rahatat

आपण बरेचदा ऐकले असेल की साप चंदनाच्या झाडावर राहतात आणि चंदनाच्या झाडाला लिपटून राहतात. पण यामागे अस काय कारण असेल की चंदनाच्या झाडा वर का राहतात साप तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत यामागे नेमकं कारण काय आहे तर चला पाहूया..

चंदनाच्या झाडावर साप राहतात का? – Why Snakes live on Sandalwood (chandan) Tree?

Why Snakes live on Sandalwood(chandan) Tree
Why Snakes live on Sandalwood (chandan) Tree

साप फक्त चंदनाच्या झाडावरच नाही तर चमेली आणि आणखी इतर झाडांवर आपले वास्तव्य करतात. पण काही लोकांचे असे म्हणणे आहे की साप चंदनाच्या झाडावर त्याच्या सुगंधा कडे आकर्षित होऊन त्यावर राहतात. पण जर विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिले असता सापाला कोणत्याही गोष्टीचा वास चांगल्या प्रकारे घेता येतो, आणि त्याची वास घेण्याची शक्ती अधिक चांगली असते. साप त्याच्या नाकाच्या आणि जिभेच्या वरच्या बाजूने आजूबाजूचा वास घेऊ शकतो.

जेव्हा साप त्याची जीभ बाहेर काढतो तेव्हा तो कोणाला घाबरवण्यासाठी काढत नसून आजूबाजूच्या वातावरणाचा वास घेण्यासाठी काढत असतो. या वासाच्या आधारावर तो सुगंध येणाऱ्या झाडांजवळ जातो पण साप फक्त चांगल्या सुगंधासाठी या झाडांजवळ जात नाही,

आता आपण म्हणाल की वासासाठी जात नाहीत तर कश्यासाठी जातात तर आपल्या माहितीसाठी साप हे बहुतेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सापांना थंड आणि अंधाराच्या ठिकाणी राहायला आवडतं. आणि साप अश्या प्राण्यांमध्ये येतो ज्यांना आपल्या शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून रहावे लागते.

हे प्राणी एखाद थंड ठिकाण तसेच बिळ आणि पाणी अश्या ठिकाणी राहणं पसंत करतात. ज्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान हे कंट्रोल ठेवता येईल. आणि चंदनाच्या झाडाचे तापमान हे खूप कमी असते त्यामुळे साप सुध्दा ह्या झाडांवर राहणे पसंत करतात.

आपल्याला या लेखातून समजले असेल की साप चंदनाच्या झाडावर का राहतात. आशा करतो लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्या नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here