कवठ फळाची संपूर्ण माहिती

Kavat Fruit in Marathi

निसर्गात अनेक मोठ्या झाडांपैकी एक झाड म्हणजे कवठ होय.निसर्गात औषधी युक्त मोठे  झाड म्हणजे कवठ होय. जुन्या काळापासून तर आजही बऱ्याच खेडेगावात या फळाचा आवडीने उपयोग केला जातो. शहरात मात्र हे फळ थोडे दिसेनासे झाले असले तरी आयुर्वेदात याचा आजही फार मोठा वाटा आहे कारण कवठ हे औषधी फळ म्हणून ओळखले जाते. बरीच लोक याचा गर वाळवून त्यात मध मिसळूनही खातात.

कवठ फळाची संपूर्ण माहिती – Wood Apple in Marathi

Wood Apple in Marathi
Wood Apple in Marathi
हिंदी नाव: कबिट
इंग्रजी नाव: Wood Apple

कवठाचा औषधी उपयोग – Benefits of Wood Apple

  1. कच्च्या कवठाचा उपयोग अतिसार व जुलाब कमी होण्यासाठी होतो.
  2. पिकलेल्या कवठाचे चूर्ण अजीर्णावर वापरतात.
  3. तसेच आयुर्वेदात पंचकपिया, कपिया अष्टक ही औषधे या झाडापासून बनवितात.
  4. कवठाचा पाला व फळ पित्तशामक असते.
  5. गांधीलमाशी. गोम किवा विचू चावल्यास त्यावर कवठाचा गर लावल्यास वेदना कमी होतात.
  6. कवठाच्या पानांचे तेल औषधी असते.
  7. अंगावर पित्त उठले तर कवठाच्या पानांचा रस लावल्याने आराम मिळतो .
  8. कवठ कच्चे खळे तर सर्दी, खोकला, डोकेदुखी यावर गुणकारी आहे

कवठ फळाची झाडाची माहिती  – Wood Apple Tree

या झाडाची उंची साधारणपणे ४० ते ५० फूट उंच असते. पानांचा रंग पांढरट हिरवागार असतो. झाडाला टोकदार काटे असतात. याचे आवरण खूप कठीण असते. याची झाडे सर्व देशांत आढळतात.

लागवड –

कवठाचे झाड मध्यम कोरडे तसेच कोरड्या हवामानात पण वाढू शकते. कवठाच्या स्वतंत्र बागा नसतात. या झाडाच्या लागवडीसाठी क्षारयुक्त जमीनसुध्दा चालते. या झाडांच्या बिया पेरल्यापासून रोपे उगवण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. कवठाच्या झाडाची वाढ हळूहळू होते. लागवडीनंतर ६-७ वर्षानी फळे येतात, तर कलम केलेल्या झाडांना ३ वर्षांनी फळ येते. या झाडाचे फूल पांढरे व सुवासिक असते.

फळे – Fruits

कवठाच्या फळांचा हंगाम दसऱ्यापासून पाडव्यापर्यंत चालू राहतो. एका झाडाला २०० ते २५० फळे येतात. हे फळ गोलाकार व कठीण कवचाचे असते. फळात पिवळसर बदामी गर असतो. त्यात बिया रुतून बसलेल्या असतात.

इतर माहिती – Other Information 

कवठाच्या झाडाचे कितीतरी उपयोग आहेत, या झाडापासून डिंक मिळतो, पाने व बियांपासून सुगंधी द्रव्ये तयार करतात. या झाडाचे लाकूड टणक व कठीण असते, याचा उपयोग इमारती व शेतीची अवजारे इ. साठी, तसेच जळण म्हणून होती, पूर्ण पिकलेल्या फळांतील बी लगेच पेरणीसाठी वापरतात, जास्त जुने बी लागवडीयोग्य राहत नाही. या झाडाची लागवड योग्य प्रकारे केली तर याच्या फळांचा उपयोग विक्रीसाठी करता येतो. कमी खर्चात अधिक लाभ देणारे हे झाड आहे

कवठ बद्दल  काही प्रश्न – Wood Apple Qize

Q. कवठ हे फळ कोणत्या महिन्यात लागते ?

उत्तर: फुलांचा हंगाम फेब्रुवारी-एप्रिल त्यानंतर २-३ महिन्यांनंतर म्हणजेच दसरा सणापासून ते पडावा या सनापर्यंत हे फळ तुम्हाला पाहायला मिळतात. घनकवची (कठिण सालीचे फळ) मृदुफळ पाच ते सात सेंमी. व्यासाचे मोठे, गोल, कठिण व करड्या रंगाचे फळ असते.

Q. कवठाचा झाडाच्या डिंका पासून नेमका उपयोग काय?

उत्तर: झाडातून मिळणारा डिंक अर्धपारदर्शक व थोडासा तांबूस भुरा असतो. त्यापासून चित्रकारासाठी जलरंग व इतर रंग तयार करता येतात.

Q. कवठाच्या लाकडाचा उपयोग कुठे होतो ?

उत्तर: हे लाकूड मजबूत व कठीण असल्याने याचा उपयोग घर बाधनी, तेलाचे घाणे, शेतीचे अवजारे इत्यादी साठी उपयोग होतो.

Q. कवठाचे शास्त्रीय नाव काय?

उत्तर: फेरोनिया एलेफंटम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here