जाणून घ्या १० एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

10 April  Dinvishesh

मित्रानो, आजचा दिवस हा इतिहासात घडलेल्या ऐतिहासिक घटनेकारिता प्रसिद्ध आले. आजच्या दिवशी सन १९१२ साली ब्रिटन देशातील साऊथॅम्प्टन हार्बर येथून जगप्रसिद्ध जहाज टायटॅनिकने आपला प्रवास सुरु केला. आरएमएस टायटॅनिक हा व्हाइट स्टार लाइन द्वारा संचालित एक ब्रिटिश प्रवासी जहाज होता. सन १५ एप्रिल १९१२ साली पहाटेच्या वेळी उत्तर अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाले. या जहाजात जवळपास २२२४ प्रवासी आणि चालक दल होते, तसचं, १५०० हून अधिक प्रवासी मरण पावले होते. सन १९९७ साली या घटनेवर आधारित चित्रपट देखील बनवण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, काही ऐतिहासिक घटना, जन्म, निधन तसचं काही महत्वपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १० एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 10 April Today Historical Events in Marathi

10 April History Information in Marathi

१० एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –10 April Historical Event

 • इ.स. १८७५ साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी एकेश्वरवादी भारतीय हिंदू चळवळ म्हणजे आर्य समाजाची स्थपना केली.
 • सन १८८९ साली भारतीय कलाविष्कार,जिम्नॅस्ट, बलूनिस्ट, पॅराशूटिस्ट आणि देशभक्त रामचंद्र चटर्जी गरम फुग्यातुन उड्डाण करणारे तसचं, पॅराशूटमध्ये उतरणारे पहिले भारतीय नागरिक ठरले.
 • इ.स. १९१२ साली ब्रिटन देशातील साउथैंप्टन हार्बर येथून जगप्रसिद्ध जहाज टायटॅनिकने आपला प्रवास सुरु केला.
 • सन १९५५ साली अमेरिकन चिकित्सक आणि वैद्यकीय संशोधक जोनस साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
 • इ.स. १९८२ साली भारतीय संचार उपग्रह एनसॅट -१ ए याचे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
 • सन २००१ साली भारत व इराण या दोन देश दरम्यान तेहरान घोषणा पात्रांवर हस्ताक्षर करण्यात आले.

१० एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७५५ साली जर्मनी येथिल होमियोपॅथी चिकित्सक पद्धतीचे जनक व चिकित्सक ख्रिश्चन फ्रेड्रिच सॅम्युअल हॅन्नेमन तथा सॅम्युअल हॅन्नेमन यांचा जन्मदिन.
 • सन १८४३ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचा जन्मदिन
 • इ.स. १८४७ साली पुलित्झर पुरस्काराचे प्रणेता अमेरिकन पत्रकार तसचं सेंट लुईस पोस्ट-डिस्पॅच आणि न्यूयॉर्क वर्ल्ड या वृत्तपत्राचे प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचा जन्मदिन.
 • सन १८९४ साली बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९७ साली पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री तसचं, क्रांतीकार प्रफुलचंद्र सेन यांचा जन्मदिन.
 • सन १९०१ साली भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष तसचं, भारतीय अर्थशास्त्रज्ञ, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९०७ साली भारतीय महाराष्ट्रीयन संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी लेखक मोतीराम गजानन रंगणेकर यांचा जन्मदिन
 • सन १९२८ साली परमवीर चक्र सन्मानित भारतीय सैन्य दलाचे माजी लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९३५ साली भारतीय जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायीका, शास्त्रीय शैली ख्याल आणि हलकी शास्त्रीय शैली ठुमरी आणि भजन गानसम्राज्ञी किशोरी रवींद्र आमोणकर यांचा जन्मदिन.
 • सन १९५२ साली भारतातील महाराष्ट्र राज्यातील राजकारणी व माजी मुख्यमंत्री नारायण तात्या राणे यांचा जन्मदिन
 • इ.स. १९७२ साली एस्टोनिया देशातील संघनक प्रोग्रामर व सॉफ्टवेअर डेव्हलपर तसचं, स्काइप अप्लिकेशनचे सहसंस्थापक प्रीट कसेसालु यांचा जन्मदिन.

१० एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –10 April  Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १३१७ साली महाराष्ट्रीयन वारकरी संप्रदायाचे खंदे समर्थक हिंदू संत व अभंग लेखक संत गोरा कुंभार यांचे निधन.
 • सन १६८७ साली समर्थ रामदास स्वामी यांच्या मानसकन्या, प्रवचनकार थोर विदुषी वेणाबाई यांचे निधन.
 • इ.स. १९३७ साली भारतातील समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि कादंबरीकार तसचं, मराठी भाषेतील पहिल्या विश्वकोश व महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे मुख्य संपादक श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन.
 • सन १९४९ साली भारतीय उपखंडातील जीवाश्म वनस्पतीचे अभ्यासक भारतीय पुरावनस्पती शास्त्रज्ञ तसचं, राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे माजी अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन.
 • इ.स. १९६५ साली स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषीमंत्री व सामाजिक कार्यकर्ता डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन.
 • सन १९९५ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व भारतातील चौथ्या क्रमांकाचे पंतप्रधान रणजीत देसाई यांचे निधन
 • इ.स. २००० साली भारतीय राष्ट्रीय कवी व संस्कृतचे ज्ञानी पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here