Friday, June 9, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १० मार्च रोजी येणारे दिनविशेष

10 March Dinvishesh

आजच्या तारखेला घडलेल्या संपूर्ण इतिहासकालीन तसेच आधुनिक घटनांची माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. आज दिनांक १० मार्च या दिवशी भारतात तसेच संपूर्ण जगतात भरपूर काही ऐतिहासिक घटना घडल्या आहेत, ज्या इतिहासामध्ये जमा झाल्या आहेत. चला तर आपण पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत.

भारतात १० मार्च हा ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल’ (सी. आय. एस. एफ) राईझिंग डे म्हणून दर वर्षी साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या १० मार्च रोजी येणारे दिनविशेष – 10 March Today Historical Events in Marathi

10 March History Information in Marathi

१० मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 March Historical Event

  • सन १८०१ साली ग्रेट ब्रिटन या देशांत सर्वप्रथम जनगणना करण्यात आली होती.
  • सन १८३१ साली फ्रेंज देशाच्या सेनेची स्थापना करण्यात आली होती.
  • सन १८४७ साली हवाई साम्राज्याने सर्वप्रथम अधिकृत नाणी तयार केली होती.
  • सन १८६२ साली अमेरिकेत कागदी चलन आमलात आणले गेले.
  • सन १८७६ साली अमेरिकन संशोधक अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलीफोन(दूरध्वनी) चा शोध लावला होता.
  • सन १९२२ साली प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राष्ट्रपिता महात्मा गांधीना राजद्रोहाच्या आरोपा खाली कैद करून, सहा वर्ष तुरुंग वासाची शिक्षा देण्यात आली होती.
  • सन १९२२ साली चीनने परमाणु अप्रसार संधीवर हस्ताक्षर केले होते.
  • सन १९२९ साली मिस्र देशाच्या सरकारने देशातील महिलांकरिता घटस्फोट संबंधी मर्यादित अधिकार दिले
  • सन १९४५ साली द्वितीय विश्व युद्धादरम्यान अमेरिकन वायुदलाने जपानची राजधानी टोकियो येथे भीषण बॉंब हल्ले केले होते. त्यामुळे टोकियो मधील एक लाखापेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले होते
  • सन १९५२ साली केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पुण्यामधील पिंपरी या ठिकाणी हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पेनिसिलीन कारखान्याची पायाभरणी करण्यात आली होती.
  •  सन १९६९ साली आफ्रिकी-अमेरिकन नागरिक तथा मानव अधिकारी संघर्षवादी नेता तसेच, अमेरिकन गांधी म्हणून प्रसिद्ध असणारे महान व्याक्ती मार्टिन लुथर किंग यांची हत्या करणारा गुन्हेगार जेम्स अर्ल रे याला पकडून ९९ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली होती.
  • सन १९७२ साली वेलकम थियेटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर या नाट्यगृहात सादर करण्यात आला होता.
  • सन १९७७ साली युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध लागला होता.
  • सन १९८५ साली बेन्सन अँड हेजेज वर्ल्ड चॅम्पियनशिप ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा  भारताने जिंकली होती.
  • सन २००३ साली उत्तर कोरिया देशाने क्रूज मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली
  • सन २००७ साली युक्रेन देशाचा बुद्धिबळ खेळाडू वैसिलीइवानचुक यांना हरवून विश्वनाथ आनंद प्रथम स्थानी झेप घेतली होती.
  • सन २०१० साली भारतीय संसदेच्या वरचे सभागृह म्हणजे राज्यसभेत महिला आरक्षण  विधेयक मंजूर झाले.

१० मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 March Birthday/ Jayanti/ Birth Anniversary

  • सन १६२८ साली इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी लादेन यांचा जन्म.
  • सन १९१८ साली हिंदुस्थानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार सौदागर नागनाथ गोरे यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली मराठी कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली विद्यागत भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष उडुपी रामचंद्र राव यांचा जन्मदिन.
  • सन १९३४ साली भारतातील प्रख्यात समाजसुधारक लल्लन प्रसाद व्यास यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली माजी केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली क्यानडा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ‘किम कैम्पबेल’ यांचा जन्मदिवस.
  • सन १९५७ साली अल कायदा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक ओसाम बिन लादेन याचा जन्म
  • सन १९७० साली भारतीय राजनीतिज्ञ व जम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा जन्मदिन.
  • सन १९७४ साली ट्विटर(TWITTER) चे सह-संस्थापक बीझ स्टोन यांचा जन्म.

१० मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 March Death/ Punyatithi/Smrutidin

  • सन १८७२ साली इटालियन राजकारणी, पत्रकार तसेच इटलीचे एकीकरण करण्यासाठी, कार्यकर्ते आणि इटालियन क्रांतिकारक यांच्या चळवळीचे पुढारी जोसेफ मॅझिनी यांचे निधन.
  • सन १८९७ साली भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्र कवयत्री तसेच, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे निधन.
  • सन १९५९ साली पुना विद्यापीठाचे माजी कुलगुरू मुकुंद रामराव जयकर यांचे निधन.
  • सन १९७१ साली कोकण मधील महात्मा गांधी यांचे अनुयायी सीताराम पटवर्धन उर्फ अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. लोक त्यांना कोकण गांधी म्हणून देखील ओळखत असतं.
  • सन १९९९ साली मराठी कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, मानवतावादी व्यतिरिक्त स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांच्या मुक्तीचे लेखन कर्ते विष्णू वामन शिरवाडकर यांची पुण्यतिथी.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Previous Post

जाणून घ्या स्पेशल पनीर मसाला रेसिपी

Next Post

जाणून घ्या ११ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
11 March History Information in Marathi

जाणून घ्या ११ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Mawa Barfi Recipe in Marathi

मावा बर्फी बनविण्याची विधी

Importance of Sports in Marathi

आपल्या जीवनातील खेळाचे महत्व

Vijender Singh Biography

विजेंदर सिंग यांचा जीवन परिचय

Thank You Message

माझी मराठी ला दिलेल्या प्रेमासाठी मनःपूर्वक आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved