ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय

Kusumagraj Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील थोर मराठी कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समिक्षक ‘कुसुमाग्रज’ उर्फ विष्णू वामन शिरवाडकर तसचं, तात्या शिरवाडकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या राज्यात होवून गेलेले एक अग्रगण्य मराठी कवी होते.

त्यांनी अनेक कवितांचे लिखाण केलं आहे. कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या बोलीभाषेत रचलेले कविता संग्रह खूप सुंदर आहेत. चला तर जाणून घेवूया अश्या महान महाराष्ट्रीयन ज्ञानपीठ विजेता कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या बद्दल.

महाराष्ट्रीयन कवी कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय – Kusumagraj Information in Marathi

Kusumagraj Information in Marathi
Kusumagraj Information in Marathi

कुसुमाग्रज’ यांचा अल्प परिचय – Vi Va Shirwadkar Information in Marathi

मूळ  नाव (Name) गजानन रंगनाथ शिरवाडकर
पूर्ण नाव (Kusumagraj Full Name) विष्णु वामन शिरवाडकर
जन्म (Birthday) २७ फेब्रुवारी १९१२
निधन (Death) १० मार्च १९९९ साली

कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती – Kusumagraj yanchya Vishayi Mahiti

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवी कुसुमाग्रज उर्फ वी. वा. शिरवाडकर यांचा जन्म सन २७ फेब्रुवारी १९१२ साली नाशिक येथे झाला. वी. वा. शिरवाडकर यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. परंतु दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कवी कुसुमाग्रज यांचे प्राथमिक शिक्षण हे पिंपळगाव येथेच झाले. यानंतर माध्यमिक शिक्षणाकरिता ते नाशिकला गेले त्याठिकाणी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल मधून आपल माध्यमिक शिक्षण पूर्ण केल.

तसचं, मुंबई विद्यापीठातून त्यांनी आपली मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण केली. सन १९३० साली वी. वी. शिरवाडकर शालेय शिक्षण घेत असतांना त्यांनी ‘रत्नाकर’ नावाच्या मासिकातून आपली पहिली कविता प्रसिद्ध केली. आपले बी. ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी  सन १९३४ ते १९३६ या कार्यकाळात चित्रपट व्याव्यसायात काम केलं.

यानंतर, कुसुमाग्रज हे नाशिक येथे स्थाईक झाल्यानंतर त्यांनी अनेक पुस्कांचे संपादन करण्यास सुरुवात केली. राज्यात सुरु असलेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या आंदोलनांत त्यांनी सहभाग घेवून त्यांनी सत्याग्रह केला. त्यांच्या परिवारात सहा भाऊ आणि एक बहिण असल्याने बहिण ही सर्वांची लाडकी होती.

कवी वि. वा. शिरवाडकर यांनी अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ हे नाव धारण केले. तेंव्हापासून त्यांची ओळख कुसुमाग्रज म्हणून पडली. सन १९३० साली झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची खरी सुरुवात या लढ्यापासून झाली असे म्हणतात.

कुसुमाग्रज हे महान कवी बरोबर एक समाजसुधारक देखील होते. त्यांनी दलितांच्या अनेक व्यथांचे लिखाण आपल्या कवितेतून केलं आहे. सन १९३३ साली ‘ध्रुव मंडळ’ ची स्थापना केली. तसचं, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत देखील केली होती.

मित्रांनो, कुसुमाग्रज यांचा लिखाण करण्यास खरी सुरुवात केली ती, मुंबई येथील मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. अ.ना. भालेराव यान भेटल्यानंतर. त्यांनी कुसुमाग्रज यांना लिखाण करण्यास प्रवृत्त केलं. महाराष्ट्रीयन कवी म्हणून ओळख निर्माण करणारे कुसुमाग्रज हळू हळू नाटक लिहू लागले.

ते एक यशस्वी नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले. मित्रांनो, अश्या या महान नाटककारच्या स्मरणार्थ नाशिक येथे ‘ कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकास सन १९७४ साली साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन लेखक आहेत. अश्या या महान लेखकाने आपल्या आयुष्यात अनेक कादंबऱ्यांचे लिखाण देखील केलं आहे.

सन १९६२ ते १९७२ या सालापर्यंत त्यांची पुणे येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तसचं, गोवा येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलंचे ते अध्यक्ष देखील होते. मित्रांनो, आपल्या लिखाण शैलीतून लहान मुलांकरिता बालकथा तसचं, बाल गीताचे लिखाण करणारे या महान लेखका बद्दल लिहाल तितक कमीच.

कुसुमाग्रज यांचा मृत्यु – Kusumagraj Death

अश्या या महान साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवींचे सन १९९९ साली त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here