Wednesday, July 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ११ मार्च रोजी येणारे दिनविशेष

11 March Dinvishesh

११ मार्च ला घडलेल्या संपूर्ण ऐतिहासिक तसेच आधुनिक घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

जाणून घ्या ११ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 11 March Today Historical Events in Marathi

11 March History Information in Marathi

११ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 March Historical Event

  • सन १३९९ साली दिल्ली समवेत संपूर्ण उत्तर भारतात हाहाकार माजवून सुलतान तैमुर लंग यांनी सिंधू नदी पार केली होती.
  • सन १८१८ साली इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला होता.
  • सन १८८१ साली ब्रिटीश कालीन भारतातील कोलकाता येथील थोर समाज सुधारक रामनाथ टागोर यांची प्रतिमा कोलकाता येथील टाऊन हॉल मध्ये स्थापित करण्यात आली.
  • सन १८८६ साली आनंदीबाई जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली होती.
  • सन १८८९ साली थोर महिला समाजसुधारक पंडिता रमाबाई यांनी ब्रिटीश शासन काळात मुंबई मध्ये विधवा आणि कुमारीकांसाठी “शारदा सदन” या शाळेची निर्मिती केली.
  • सन १९१७ साली इराक ची राजधानी बगदादवर ब्रिटीश लष्कराने ताबा केला होता.
  • सन १९१८ साली मॉस्को हे शहर रशियाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते.
  • सन १९३५ साली बँक ऑफ कॅनडा चे गठन करण्यात आलं होत.
  • सन १९९३ साली उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
  • सन १९९९ साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात स्थित असलेल्या नॅसडॅक शेअर बाजारात (रोखे बाजार) स्थान मिळविणारी इन्फोसिस पहिली भारतीय कंपनी ठरली.
  •  सन २००१ साली भारतीय बॅटमेंटन पटू पी. गोपीचंद यांनी तब्बल एकवीस वर्षानंतर ‘ऑल इंग्लंड बॅटमिंटन’ स्पर्धेचे विजितेपद भारताला मिळवून दिले.

११ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 March Birthday/ Jayanti/ Birth Anniversary

  • सन १८४० साली बंगाली भाषेत संगीत नाटकाला सुरुवात करणारे तत्वज्ञानी, लेखक, अनुवादक, कवी, गणितज्ञ व संगीतकार तसेच देवेंद्रनाथ टागोर यांचे थोरले पुत्र द्विजेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.
  • सन १८६३ साली मराठ्यांच्या शाही गायकवाड घराण्यातील बडोदा प्रांताचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस.
  • सन १८७३ साली अमेरिकन चित्रपटसृष्टीचे प्रणेते तसेच,  युनिव्हर्सल स्टुडीओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली मराठी भाषिक कवी, कथालेखक आणि नाटककार शंकर गोविंद साठे यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली ब्रिटीश कामगार नेते तसेच युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान हॅरोल्ड विल्सन यांचा जन्मदिवस.
  • सन १९२५ साली हैदराबादच्या रियासते वर हल्ला करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक म्हणजेच मदनसिंग मतवाले यांचा जन्मदिन.
  • सन १९२७ साली रेमन मैग्सेस पुरस्कार विजिता भारतीय महिला चिकित्सक वी.शांता यांचा जन्मदिवस.
  • सन १९४२ साली पंजाब राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अमिरिंदर सिंग यांचा जन्मदिन.
  • सन १९५४ साली पद्मश्री पुरस्कार विजेते व पत्रकार विनोद दुआ यांचा जन्मदिन.
  • सन १९७० साली भारतीय इलेक्ट्रॉनिक गाड्यांची निर्मिती करणाऱ्या उद्योग क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती तसेच,  सह-संस्थापक, सन मोबिलिटीचे उपाध्यक्ष, आणि भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक गाडी आरईव्हीए ची निर्मिती करणारे व रेवा इलेक्ट्रिक कार(गाडी) कंपनी लिमिटेडचे संस्थापक “चेतन मैनी” यांचा जन्मदिवस.
  • सन १९८५ साली श्रीलंकन गोलंदाज अजंता मेंडीस यांचा जन्मदिन.
  • ११ मार्च या दिनी निधन पावणाऱ्या भारतीय इतिहासकालीन तसेच जगातील सर्व थोर व्यक्तींसंबंधी संपूर्ण माहिती आपण येथे घेणार आहोत.

११ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 March Death/ Punyatithi/Smrutidin

  • सन १६८९ साली मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांची मुगल बादशाहा औरंगजेब यांनी हत्या केली होती.
  • सन १९५५ साली नोबल परितोषिक विजेते स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि औषधनिर्माणशास्त्रज्ञ तसेच, पेनिसिलिन आणि लाइसोझाइम चा शोध लावणारे महान शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन.
  • सन १९५७ साली उत्तर आणि दक्षिण ध्रुव सर करणारे पहिले अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड इव्हेलिन बर्ड यांचे निधन.
  • सन १९६५ साली गुजराती कथाकार व कादंबरीकार ‘गौरीशंकर गोवर्धनराम जोशी’ (टोपण नाव धुमकेतू) यांचे निधन.
  • सन १९८० साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि उत्तर प्रदेश राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री चंद्रभानु गुप्ता यांचे निधन.
  • सन १९९३ साली हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved