जाणून घ्या १२ जुलै रोजी येणारे दिनविशेष

 12 July Dinvishes

मित्रांनो, आपणास माहिती आहे आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील जास्तीत जास्त नागरिकांचा व्यवसाय हा शेती आहे. शेतकऱ्यांना शेती करत असतांना दरवर्षी अनेक  संकटाना सामोरे जावं लागत असते. शिवाय, देशाच्या बहुतेक भागातील शेती ही कोरडवाहू आहे. त्यामुळे तेथील शेतकरी हे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. तसचं, काही नैसर्गिक आपत्तीमुळे देखील शेतकऱ्यांचे नुकसान होतच असते.

या सर्व कारणामुळे केंद्र सरकारने आपल्या देशातील शेतकरी हतबल न होता त्याने आनंदाने शेती करावी याकरिता, सन १९८२ साली देशांत नाबार्ड बँकेची स्थापना केली. या बँके अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी शेती करण्यास स्वस्त दरात कर्ज मिळते. शेतकऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या नाबार्ड बँकेची सरकारने स्थापना करून त्यांना एकप्रकारे पाठबळच दिल आहे.

शिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १२ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 12 July Today Historical Events in Marathi

12 July History Information in Marathi
12 July History Information in Marathi

१२ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 July Historical Event

 • इ.स. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी सोबत मित्रत्वाचा तह केला.
 • इ.स. १७९९ साली शिख साम्राज्याचे शासक महाराजा रणजितसिंग यांनी लाहोर वर ताबा मिळविला व ते पंजाबचे नवीन सम्राट बनले.
 • सन १९२० साली पनामा कालव्याचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आलं. कारण, तो कालवा यापूर्वीच वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला होता.
 • सन १९६० साली झारखंड राज्यातील भागलपूर आणि रांची विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
 • सन १९८२ साली “ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांसाठी पतपुरवठा क्षेत्रात धोरण नियोजन आणि कार्यवाही करिता केंद्र सरकारने नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) बँकेची स्थापणा केली.
 • सन १९९५ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कारने गौरविण्यात आलं.
 • सन १९९८ साली फुटबॉल विश्वकपाच्या अंतिम सामन्यात फ्रांस देशाच्या फुटबॉल संघाने ब्राझील देशाच्या फुटबॉल संघचा ३-० ने पराभव केला.
 • सन १९९९ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • सन २००१ साली कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१२ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८१७ साली अमेरिकन निबंध लेखक, कवी आणि तत्वज्ञ हेनरी डेविड थोरेयू (Henry David Thoreau) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८५४ साली प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक व ईस्टमन कोडक कंपनीचे संस्थापक जॉर्ज ईस्टमैन (George Eastman) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८६४ साली अमेरिकेतील प्रसिद्ध पहिले कृष्णवर्णीय कृषी वैज्ञानिक, संशोधक तसचं, शिक्षणतज्ञ आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंगटन कार्वर (George Washington Carver) यांचा जन्मदिन.
 • सन १९०९ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्मदिन.
 • सन १९१३ साली प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक लेखक व माजी लष्कर अधिकारी मनोहर माळगावकर यांचा जन्मदिन.
 • सन १९२० साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी (16वे) सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा जन्मदिन.
 • सन १९६५ साली भारतीय क्रिकेट भाष्यकार आणि माजी यष्टिरक्षक क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्मदिन.
 • सन १९८२ साली अर्जुन पुरस्कार विजेता महिला टेबल टेनिसपटू अचंत शरत कमल यांचा जन्मदिन.
 • सन १९९७ साली युवा नोबल पारितोषिक विजेता पाकिस्तानी स्त्रीवादी शैक्षणिक कार्यकर्त्या महिला मलाला यूसुफजई यांचा जन्मदिन.

१२ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 July Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १४८९ साली दिल्ली येथील लोदी वंशाचे संस्थापक व शासक बहलूल खान लोदी यांचे निधन.
 • सन १९८२ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यिक व साहित्यिक परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद मिश्रा यांचे निधन.
 • सन १९९९ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध ‘जुबली स्टार’ आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते राजेंद्र कुमार यांचे निधन.
 • सन २०१२ साली प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू, अभिनेता आणि राजकारणी तसचं, हिंदी आणि पंजाबी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक व माजी राज्यसभा सदस्य दारासिंह रंधावा यांचे निधन.
 • सन २०१३ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते प्राण कृष्ण सिंकद उर्फ प्राण यांचे निधन.
 • सन २०१३ साली भारत वंशीय अमेरिकन शैक्षणिक आणि उद्योजक तसचं, बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक अमर गोपाल बोस यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top