• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या १२ जून रोजी येणारे दिनविशेष

12 June Dinvishes

मित्रांनो, आज जागतिक बालकामगार विरोधी दिवस आहे. सन २००२ साली याची सरुवात करण्यात आली. आपण नेहमीच लहानपण देगा देवा असे म्हणत असतो. कारण बालपणाचा जो काळ असतो तो खरचं खूप सुखाचा काळ असतो. या काळात खूप अविस्मरणीय असे क्षण आपण अनुभवत असतो. ना कसली चिंता असते, ना कसली काळजी मस्त खुशालीचे जीवन जगत असतो. लहानपणी कोणत्याच गोष्टीची चिंता नसते.

बालपणाचा काळ हा खूप सुखद अनुभव देणार काळ असतो. परंतु, प्रत्येकाच्या नशिबी हे बालपणीचे स्वातंत्र्य नसते. आपण बाहेरील जगात पाहतो की, एखाद्या सिग्नल जवळ कुठे हॉटेल मध्ये तर कुठे घरकामाच्या ठिकाणी लहान मुले ही काम करीत असतात. जसे काही त्यांचे बालपण त्यांच्याकडून हिरावून घेतले आहे. १४ वर्षाच्या आतील जी मुले आपल्या व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करतात त्यांना बालकामगार असे म्हणतात.

या गोष्टीला आळा घालण्यासाठी व जगात याबद्दल जनजागृती करण्याकरता सयुक्त राष्ट्राच्या सभेने दरवर्षी १२ जून या दिवशी जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. तसचं, आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १२ जून रोजी येणारे दिनविशेष – 12 June Today Historical Events in Marathi

12 June History Information in Marathi
12 June History Information in Marathi

१२ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 June Historical Event

  • इ.स. १८१२ साली फ्रांस शासक नेपोलियन बोनापार्ट(Napoleon Bonaparte) यांनी रशियावर आक्रमण केले.
  • सन १९६४ साली दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वर्णद्वेषी विरोधी नेता नेल्सन मंडेला(Nelson Mandela) यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली.
  • सन १९७५ साली झालेल्या निवडनुकांमध्ये भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी सरकारी यंत्रणेचा वापर केला असल्याचा त्यांना दोषी ठरविण्यात आले व त्यांची निवडणूक अवैध ठरविण्यात आली.
  • सन १९९६ साली भारतीय पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केलं.
  • सन १९९८ साली भारत व पाकिस्तान देशांनी आपआपल्या देशांत केलेल्या आण्विक चाचण्यांमुळे जी-८ च्या सदस्य देशांनी या देशांना कर्ज न देण्याचा निर्णय घेतला.
  • सन २००१ साली भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान सरहद्दी बद्दल चर्चा करण्यात आली.
  • सन २००२ साली जागतिक बालकामगार विरोधी दिनाला सुरुवात झाली.
  • सन २००७ साली कॅनडा देशांत होणाऱ्या जीव विज्ञान ऑलम्पियाड स्पर्धेत चार भारतीय विद्यार्ध्यांची नियुक्ती करण्यात आली.
  • सन २०१६ साली प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी ऑस्ट्रेलिया देशांतील सिडनी या ठिकाणी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते पद पटकाविले.

१२ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९४ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी प्राच्यविद्या संशोधक, बौद्ध धर्माचे अभ्यासक व पाली भाषेतील विद्वान साहित्यिक पुरुषोत्तम विश्वनाथ बापट यांचा जन्मदिन.
  • सन १९१७ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कथा, कादंबरीकार तसचं, केसरी वृत्तपत्राचे माजी उपसंपादक भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली प्रसिद्ध भारतीय कन्नड लेखक, नाटककार, रंगमंच कलाकार, दिग्दर्शक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सी. के. नागराजा यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली हिंदू धर्मीय समर्थक व सनातन धर्मवादी नथुराम गोडसे यांचे छोटे बंधू गोपाल विनायक गोडसे यांचा जन्मदिन.
  • सन १९६६ साली ए. एफ. सी प्रो डिप्लोमा प्राप्त योग्य फुटबॉल प्रशिक्षक तसचं, ऐझवल एफ.सी. चे मुख्य प्रशिक्षक संतोष कश्यप यांचा जन्मदिन.
  • सन १९७२ साली लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी हास्य विनोदी रंगमंच कलाकार व चित्रपट अभिनेता भालचंद्र कदम यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली प्रसिद्ध भारतीय पत्रकार आणि समालोचक तसचं, आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक अंजना ओम कश्यप यांचा जन्मदिन.
  • सन १९८५ साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय हॉकी खेळाडू सबा अंजुम करीम यांचा जन्मदिन.

१२ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 June Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९६४ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व भाषातज्ञ तसचं, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन.
  • सन १९७२ साली महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित आठ खंडांच्या ग्रंथाचे लिखाण करणारे महान लेखक डी.जी. तेंडूलकर यांचे निधन.
  • सन १९७६ साली पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संस्कृत साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय संस्कृत-तंत्र अभ्यासक, भारतीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गोपीनाथ कविराज यांचे निधन.
  • सन २००० साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, अभिनेता, पटकथा लेखक, संगीतकार व चित्रपट निर्देशक आणि वक्ता पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे निधन.
  • सन २००३ साली अमेरिकन चित्रपट अभिनेता ग्रेगरी पेक (Gregory Peck) यांचे निधन.
  • सन २०१५ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित चंडीगड येथील प्रसिद्ध रॉक गार्डनचे निर्माता व रचनाकार नेकचंद सैनी यांचे निधन.
  • सन २०१७ साली भारतीय साहित्यीय क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट नोबल पुरस्कार म्हणून समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेता तसचं, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय तेलगु भाषिक लेखक व कवी सी. नारायणा रेड्डी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved