12 May Dinvishes
मित्रांनो, आज जागतिक परिचारिका दिन. दरवर्षी ब्रिटीश समाजसुधारक व परिचारिक संस्थेच्या संस्थापिक व परिचारिका व्यवस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस १२ मे हा जागतिक परिचारिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका होत. त्याने केलेले कार्य खरच खूप महान आहे. शिवाय आज आपण या लेखाच्या माध्यमातून काही विशेष व्यक्तीच्या जन्मदिन, निधन आणि त्यांच्या कार्य बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १२ मे रोजी येणारे दिनविशेष – 12 May Today Historical Events in Marathi
१२ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 May Historical Event
- इ.स. १४५९ साली राठोड कुळातील राजपूत प्रमुख राव जोधा यांनी जोधपूर शहराची स्थापना केली.
- इ.स. १६६६ साली पुरंदर येथील तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज मुघल बादशाहा औरंगजेब यांची भेट भेण्यासाठी आग्रा येथे पोहचले.
- सन १९०९ साली सेवानंद बाळूकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत उर्फ अण्णासाहेब खेर आणि वी.ग.केतकर यांनी एकत्रितपणे पुणे या ठिकाणी पोरक्या मुलांसाठी अनाथ विद्यार्थीगृहाची स्थापना केली.
- सन १९१५ साली भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस यांनी जपानी नौका सानुकी मारू यातून प्रवास करून भारत देश सोडून जपान येथे आश्रय घेतला.
- सन १९५२ साली स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले सत्र चालू झाले.
- सन १९६५ साली मानवरहित सोव्हिएत अंतरिक्ष यान लुना 5 ची चंद्रावर मऊ लँडिंग साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतांना ते चंद्रावर कोसळले.
- सन १९९८ साली केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वय ५८ वर्षावरून ६० वर्ष करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला.
- सन २०१० साली एस.एच.कपाडिया यांनी भारताचे ३८ वे सर न्याधीश म्हणून कारभार सांभाळला.
१२ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८२० साली ब्रिटिश समाजसुधारक आणि सांख्यिकीविज्ञानी तसचं, आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका व परिचारिका व्यवस्थापिका आणि प्रशिक्षक फ़्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७५ साली भारतीय हिंदू धर्माचे गाढे गाढे अभ्यासक व कलकत्ता विद्यापीठाचे तत्त्वज्ञ कृष्णचंद्र भट्टाचार्य यांचे निधन.
- इ.स. १८९९ साली भारतीय योग प्रशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्मदिन.
- सन १९०५ साली भारतीय कृतीशील विचारवंत, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँन्डइंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्मदिन.
- सन १९२६ साली भारतीय जनता पक्षाचे माजी कोषाध्यक्ष व राजकारणी तसचं, पश्चिम बंगाल राज्याचे २२ वे राज्यपाल वीरेंन जे. शाह यांचा जन्मदिन.
- सन १९३० साली भारतीय मराठी- इंग्लिश डॉक्टर व लेखिका, तारा वनारसे यांचा जन्मदिन.
- सन १९३३ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय बॅडमिंटन नंदू नाटेकर यांचा जन्मदिन.
- सन १९४५ साली भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोनाकुप्पाकटील गोपीनाथन बाळकृष्णन यांचा जन्मदिन.
- सन १९५४ साली भारतीय राजकारणी आणि तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री करुप्पा गौंडर पलानीस्वामी यांचा जन्मदिन.
- सन १९८९ साली भारतीय क्रिकेटपटू शिख पांडे यांचा जन्मदिन.
१२ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 May Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १८०९ साली ब्रिटिश भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि व्हिक्टोरिया क्रॉसचे प्राप्तकर्ता जनरल सर ह्यू हेनरी गफ यांचे निधन.
- सन १९७० साली नोबल पारितोषिक विजेते जर्मन कवी व नाटककार नोली सॅच यांचे निधन.
- सन १९९३ साली भारतीय हिंदी भाषिक कवी शमशेर बहादूर सिंग यांचे निधन.
- सन १९९६ साली भारतीय वंशातील झिम्बाब्वे येथील ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञ रिचर्ड केंडल ब्रूक यांचे निधन.
- सन २०१४ साली भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि ओडिया फिल्म इंडस्ट्रीत निर्माता सरत पुजारी यांचे निधन.